शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

नागपूर - मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्ग प्रकल्प - २०१६

नागपूर - मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्ग प्रकल्प - २०१६

* राज्य शासनाने नागपूर - मुंबई ७१० किलोमीटर द्रुतगती समृद्धी महामार्ग बांधण्याचा ४६ हजार कोटीचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

* हा प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण केला जाणार आहे, केवळ रस्ते बांधणीतून शहरे जोडणे आणि दळणवळणाची साधने उपलब्द करून देणे हाच एकमेव हेतू या प्रकल्पाचा नसून संपूर्ण राज्य समृद्ध करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.

* हा प्रकल्प देशातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे, काम पूर्ण झाल्यावर केवळ सहा तासात नागपूर - मुंबई अंतर कापणे शक्य आहे.

* महामार्गाच्या बाजूला कृषी प्रक्रिया उद्योग, आय टी गृहबांधणी आणि इतर पूरक उद्योग याची उभारणी केली जाणार असून कोटींची गुंतवणूक राज्यात अपेक्षित आहे.

* राज्यात ४५% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, या महामार्गाचा सगळ्यात जास्त फायदा शेती क्षेत्राला होणार असून त्यांचा शेतमाल मुंबईला नेणे सहज शक्य होणार आहे.

* या प्रकल्पात प्रथमच भूसंपादन याच्या ऐवजी भू संचनयाचा पर्याय शेतकऱ्यांना देण्यात आला असून शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह प्रकल्पात भागीदार म्हणून सहभागी होणार आहेत.

* हा महामार्ग १० जिल्ह्यातून जाणार असून २४ जिल्ह्याना जोडणार आहेत, १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५४ गावामधून तो जाणार नाही.

* या महामार्गांतर्गत ५० उड्डाणपूल, पादचारी, बैलगाड्यासाठी ३०० वर भुयारी मार्ग असणार आहे.

* रस्त्यालगत उभारण्यात येणारे कृषी समृद्धी केंद्र हा या प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा आहे, सुमारे एक हजारात नवीन शहर वसविण्यात येणार आहे.

* यामुळे उद्योग कारखाने, हॉटेल्स, पम्प, मनोरंजन मॉल, या ठिकाणी रोजगाराची संधी मिळणार आहे.

* प्रकल्पाची उदिष्टे - ग्रामीण भागात उद्योग उभारणी, स्थलांतर रोखणे, भूसंपादन नव्हे भूसंचयन, शास्वत विकासाची हमी, शेतकऱ्याची भागीदारी.

* या जिल्ह्यातून जाणार महामार्ग - नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना,औरंगाबाद, अहमदनगर, नासिक, ठाणे या जिल्ह्यातून जाणार.

* या जिल्ह्याना जोडणार - चंद्रपूर, गोंदीया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर, रायगड.

* अंमलबजावणीचे टप्पे - एकूण खर्च ४६००० हजार कोटी, आखणीचा अंतिम टप्पा सप्टेंबर २०१६, कामाची सुरवात एप्रिल २०१७, काम पूर्ण करणे मार्च २०२०.

* सद्याची स्थिती - अधिसूचना ७ सप्टेंबरला जारी, वाहतुकीशी संबंधित सर्वेक्षण पूर्ण, कृषी समृद्धी केंद्राच्या निश्चित, ४४० हेक्टार वनजमीन संपादनाचा प्रस्ताव सादर

* आवश्यक जामीन - महामार्गासाठी ८५२० हेक्टर, रस्त्यालगत सुविधांसाठी १,५०० हे, कृषी समृद्धी केंद्र १०,८०० हे, एकूण लागणारी जमीन २०,८२० हे, वनजमीन ३९९ हे, शेतजमीन १७,४९९, पडीत जमीन २९२२ हे.

[ ठळक वैशिष्ट्ये ]

* आशिया खंडातील सर्वात मोठा द्रुतगती मार्ग

* नैसर्गिक आपत्ती व युद्धसदृश्य स्थितीत विमान उतरवण्यासाठी तीन धावपट्ट्या

* प्रतितास १५० किमीने वाहने धावणार.

* सीसीटीव्ही, संपूर्ण महामार्ग वायफाय

* अडथळाविरहित वाहतूक, पथकर नाके, पोर्चमार्गावर

* ओएफसी केबल्स, सेवा वाहण्यासाठी स्वतंत्र मार्गिका

* महामार्गालगतचे जिल्हे समृद्धी महामार्गाशी ४/६ पदरी रस्त्यानी जोडणार

* वर्धा व जालना येथील ड्रायपोर्ट - जेएनपिटी बंदराला जोडणार

* रस्त्यासाठी स्थानिक बांधकाम सामुग्री, प्लास्टिक, फ्लाय चा वापर

* कृषी समृद्धी केंद्र - १ हजारांमध्ये एकरमध्ये नवनगर, २० ते २५ हजार लोकांना रोजगार, आवश्यक त्या सर्व आधुनिक सेवा, शेतकऱ्यांसाठी गोदामे, माती परीक्षण, फळ प्रक्रिया उद्योग, गुरांचे दवाखाने, शीतगृहाची व्यवस्था. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.