बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

देशात २७ किमीचे इकॉनॉमिक कॉरिडॉर - २०१६

देशात २७ हजार किमीचे इकॉनॉमिक कॉरिडॉर - २०१६ 

* केंद्र सरकारने देशात २७ हजार लांबीच्या ४४ महामार्गाचा इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून विकास करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.

* या महामार्गावर ३० मोठ्या शहरांचा विकास करण्यात येणार आहे, ज्याप्रमाणे वाजपेयी सरकारने गोल्डन क्वाड्रीलॅटरल म्हणजेच सुवर्ण चतुष्कोण योजना आखली होती त्यात १३ हजार किमी महामार्गाचा विकास केला गेला.

* त्याचप्रमाणे ही त्यानंतरची सर्वात मोठी महामार्ग विकास कार्यक्रम म्हणून इकॉनॉमिक कॉरीडोरकडे पहिले जात आहे.

* हे महामार्ग मॅनुफॅक्चरिंग क्लस्टर्स, बंदरे, आणि अन्य औद्योगिक वसाहतीतून जातील, त्यामुळे त्यांना इकॉनॉमिक कॉरिडॉर हे नाव देण्यात येईल. ही योजना येत्या ६ वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.

* या योजनेला निधी मिळवण्यासाठी रस्ते विकास उपकर,  कर्ज व खाजगी गुंतवणूक या उपायांचा वापर केला जाऊ शकतो.

* महामार्गाना जोडणारे आणखी १५ हजार किमीचे लांबीचे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. एकमेकांना जोडणारे ४० कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत.

* ते ४४ इकॉनॉमिक कॉरिडॉरला तसेच सुवर्ण चतुष्कोण यांना जोडले जाऊन या महार्गावरून ८०% माल वाहतूक होईल.

* राष्ट्रीय महामार्गाना व इकॉनॉमिक कॉरिडॉर यांना इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि फिडर कॉरिडॉरचे स्वरूप दिले जाईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.