शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

४.२ जिल्हाधिकरी

४.२ जिल्हाधिकरी 

* भारतातील प्रादेशिक प्रशासन व्यवस्थेचा पायाभूत घटक जिल्हा हा आहे आणि जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो.

* जिल्ह्यातील महसूल गोळा करणे आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे ही त्याची प्रमुख कार्ये पूर्वी होती. आणि आजही त्याच्यावर ती जबाबदारी आहे.

* शासनाने विकास कार्यक्रम आणि सामाजिक जबाबदाऱ्या यामुळे महसूल गोळा करणारा अधिकारी [ याच कारणामुळे कलेक्टर म्हणजे गोळा करणारा हे नाव त्याला पडले.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा विकास 

* मुघलांच्या काळात ' करोरी फौजदार ' या नावाने ओळखला जाणारा जिल्हाप्रमुख असे. १९७२ साली ईस्ट इंडिया कंपनीने कंपनीच्या नियंत्रणाखाली प्रदेशाचे महसूल प्रशासन पूर्णपणे आपल्या अधिकाऱ्यामार्फत चालविण्याचा निर्णय घेतला.

* हेस्टिंग्ज त्यावेळी गव्हर्नर होता त्याने १९७२ साली जिल्ह्यात कलेक्टर नेमण्यास प्रारंभ केला. यानंतर सन १८६१ पर्यंतच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांचे स्थान बळकट करण्याचेच प्रयत्न सरकारकडून झाले.

* आजही जिल्हाधिकारी प्रशासनातील महत्वाचा अधिकारी म्हणून असून त्याला महसूल, कायदा व सुव्यवस्था यापुरतीच कार्ये नसून नियोजन, समूह विकास, नागरी पुरवठा, निवडणूका, जनसंपर्क ठेवून कार्ये करावी लागतात.

जिल्ह्याधिकाऱ्याची नेमणूक 

* जिल्हाधिकारी हा साधारणपणे भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी असतो. राज्यसेवेतील अधिकारी बढतीद्वारे अखिल भारतीय सेवेत अधिकारी बनल्यास त्याचीही नेमणूक जिल्हाधिकारी म्हणून होत असते.

* म्हणजेच प्रत्यक्ष भरती आणि बढती अशा दोन्ही मार्गानी अखिल भारतीय प्रशासकीय सेवेत आलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक जिल्हाधिकारी या पदावर होत असते.

* अखिल भारतीय सेवेत ६ ते ८ वर्षात कार्य केलेल्या अशा अनुभवी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते.

* तसेच UPSC या परीक्षेद्वारे प्रत्यक्ष निवड केली जाते त्यासाठी प्रथम पूर्व परीक्षा घेण्यात येते, त्यानंतर पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची मुख्य परीक्षेसाठी निवड केली जाते. तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुलाखत घेऊन त्या उमेदवाराची जिल्हाधिकारी पदावर नेमणूक केली जाते.

जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये 

* करवसुली - जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचा तो प्रमुख असतो. जिल्ह्यातील सर्व शेतीचा शेतसारा गोळा करणे, तसेच भूअभिलेखासंबंधी सर्व बाबी, भूसंपादन, शासकीय मालमत्तेचे व्यवस्थापन इत्यादी.

* जिल्हा प्रशासक - राज्यशासनाच्या प्रशासनबाबत यंत्रणेचा जिल्हाधिकारी मुख्य प्रतिनिधी असतो. जिल्हा व शासनाचे हितसंबंध जोपासणे, प्रशासनाबद्दल लोकांची गाऱ्हाणे ऐकणे, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकी घेणे व मार्गदर्शन करणे, जिल्हा कोषागार आणि मुद्रांक यांचा प्रमुख म्हणून कार्य पाहणे.

* जिल्हा दंडाधिकारी - जिल्हा दंडाधिकारी या नात्याने जिल्ह्यातील कनिष्ठ स्तरावरील न्यायालयावर पर्यवेक्षण करणे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणे.

* जिल्हा विकास अधिकारी - विकास योजनांच्या अंमलबजावणीस मार्गदर्शन करणे आणि त्या पूर्ण करणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य बनलेले आहे. जिल्हा विकास आराखडा तयार करणे व त्यानुसार कार्य करतात.

* जिल्हा नियोजन - जिल्हा नियोजन करण्यासाठी ' जिल्हा नियोजन मंडळ ' असते. जिल्हा अधिकारी हा त्याचा अध्यक्ष असतो. काही राज्यात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो.

* समन्वयक - राज्यशासनाचा अनेक खात्याच्या जिल्हा स्तरावर असणारे कार्यक्रम आणि योजना यांच्या वेगवेगळ्या खात्याच्या जिल्हा स्तरावरील कार्यात समन्वय राखण्याचे काम जिल्हाधिकाऱ्याला करावे लागते.

* नागरी पुरवठा - कमी दरात जीवनावश्यक वस्तूंचा लोकांना पुरवठा करण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था अस्तित्वात आहे. रास्त दुकाने यांच्या कार्याचे व्यवस्थापन जिल्हा पुरवठा अधिकारी करतो. जिल्हा पुरवठा अधिकारी हा जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम करीत असतो.

* जिल्हा कोषागार पर्यवेक्षण - जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा कोषागार कार्यालयाचे काम चालते.

* आपत्ती व्यवस्थापन - पूर, अवर्षण, जंगलातील वणवा, भूकंप, अशा आपत्तीच्या वेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद तो भूषवितो. आणि त्या समितीला अधिकार देण्याचे कार्य करतो.

* निवडणूक अधिकारी - सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी हा ' जिल्हा निवडणूक अधिकारी ' म्हणून जबाबदारी पार पडतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.