मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

महाराष्ट्रात लघुउद्योगाचे १२ क्लस्टर मंजूर - २०१६

महाराष्ट्रात लघुउद्योगाचे १२ क्लस्टर मंजूर - २०१६

* लघुउत्पादनाला जागतिक दर्जा प्राप्त व्हावा तसेच जागतिक दर्जाची सुविधा आणि प्रक्रिया मिळण्यासाठी वर्षभरात १२ क्लस्टरला मंजुरी मिळाली.

* केंद्र सरकारच्या क्लस्टर डेव्हलोपमेंट योजनेअंतर्गत राज्य सरकारने १२ क्लस्टरला मंजुरी दिली. या १२ क्लस्टर मध्ये पुण्यातील आंबेगाव, आणि नांदेड येथे अशी दोन क्लस्टर मंजूर करण्यात आली आहेत.

* मनुका प्रक्रियेसाठी पंढरपूर व कवठेमहांकाळ, रत्नगिरीतील लांजा आणि कोल्हापुरातील शृंगारवाडी येथे काजूसाठी, राबरासाठी औरंगाबाद, खवा प्रक्रियेसाठी उस्मानाबाद, राईस मिलसाठी गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे सुरु करण्यात येणार आहे.

* गुळासाठी गोंदिया, तयार कपड्यासाठी अमरावती, आणि नुकतेच जव्हारमध्ये वारली चित्र यासाठी क्लस्टर मंजूर करण्यात आले.

* या क्लस्टरमुळे स्थानिक उत्पादनांच्या अडचणी दूर होणार असून ब्रॅंडिंगपासून मार्केटिंगपर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्द होणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.