बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत देशात महाराष्ट्र प्रथम - २०१६

व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत देशात महाराष्ट्र प्रथम - २०१६

* सिंगापूरमधील एशिया कॉम्पिटिटेटिव्ह इन्स्टिटयूट [ ACI ] यासंबंधी अभ्यास करून अहवाल तयार केला असून त्यांनी हा अहवाल सादर केला.

* भारतात सुलभतेने व्यवसाय करण्याच्या मुद्यावर महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वोच्च स्थानी आहे.

* व्यवसाय सुलभता, स्पर्धात्मकता, थेट विदेशी गुंतवणूक, अनेक पैलूच्या बाबतीत सर्वच बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. एसीआयचे रिसर्च फेलो शशिधरण यांनी २१ राज्यांच्या अर्थव्यवस्थांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढला.

* या अहवालानुसार अनुक्रमे भारतातील महाराष्ट्र, दिल्ली एनसीआर, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक ही पाच राज्ये आघाडीवर आहेत.

* थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र, दिल्ली एनसीआर तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक ही पाच राज्ये आघाडीवर आहेत आणि देशातील एकूण थेट विदेशी गुंतवणुकीत ५० ते ६० टक्के वाटा आहे.

* अहवालानुसार विदेशी गुंतवणूक वाढवून विकास संतुलित करावा अन्यथा विकास ठराविक भागातच केंद्रित होणार.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.