गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

जिल्हा प्रशासनाचा विकास व स्वरूप४.१ जिल्हा प्रशासनाचा विकास व स्वरूप 

* भारताच्या प्रशासन व्यवस्थेत जिल्हा प्रशासन महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात.

* भारतीय प्रशासन व्यवस्थेत जिल्हा हा महत्वाचा प्रदेश मानून प्रशासन व्यवस्था निर्माण करण्याची पद्धत भारतात प्राचीन काळापासून आहे.

* मौर्यांनीच सर्वप्रथम जिल्हा हा महत्वाचा घटक बनवून आपली प्रादेशिक प्रशासन व्यवस्था निर्माण केली. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख 'राजूका' हा असे.

* या राजूकामार्फत मौर्य सम्राट आपल्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवत असत. ब्रिटिशांनी आपला साम्राज्यविस्तार करताना साधारणपणे पूर्वीपासून अस्तित्वात असणारे जिल्हे कायम ठेवून केला.

जिल्हा प्रशासन - ब्रिटिशकाळ 

* ब्रिटिश राजवटीच्या पूर्वार्धात जिल्ह्याचे आकारमान मोठे ठेवण्याकडे सत्ताधाऱ्यांचा कल होता.

* प्रशासनाचा प्रादेशिक घटक म्हणून जिल्हा प्रशासनाचा उदय मौर्य  काळात झाला असला तरीही १७७२ साली ईस्ट इंडिया कंपनीच्या नियमानुसार जिल्हा प्रशासन हे महसूल गोळा करणारे प्रशासन बनले.

* सन १८५७ च्या उठावानंतर सन १८५८ च्या ब्रिटिश कायद्याने इस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आणला आणि ब्रिटिश सरकारची सत्ता प्रस्थापित झाली.

* ब्रिटिशांनी महसूल प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था प्रशासन या दृष्टीने जिल्हा प्रशासन बळकट बनविले. ब्रिटिश राजवटीत हा वारसा स्वातंत्र्यानंतरही चालू राहिला.

* लोकशाही देशात प्रशासनाच्या भूमिकेत बदल घडून आणणे गरजेचे होते. या कार्यात जनतेच्या निकटच्या प्रशासनाचा घटक या दृष्टीने जिल्हा प्रशासनावर महत्वाची जबाबदारी आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.