सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

भारतातील शिक्षण व्यवस्था ५० वर्षे पिछाडीवर - युनेस्को २०१६

भारतातील शिक्षण व्यवस्था ५० वर्षे पिछाडीवर - युनेस्को २०१६

* युनेस्कोने अलीकडेच भारताच्या शिक्षणासंबंधी एक अहवाल सादर केला आहे त्यात भारताची शिक्षण व्यवस्था ५० वर्षे पिछाडीवर असल्याचे समजते. 

* याचाच अर्थ असा की भारत प्राथमिक शिक्षण ध्येय २०५०, कनिष्ठ माध्यमिक शिक्षणाच ध्येय २०६० आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचं ध्येय २०८५ मध्ये पूर्ण करेल. 

* भारताला शाश्वत शिक्षणाचे ध्येय गाठायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल करण्याची गरज आहे, तेव्हा २०३० पर्यंत ते पूर्ण होऊ शकेल असे ग्लोबल एजुकेशन मॉनिटरिंग [ जीईम ] या अहवालात सांगितले आहे. 

[ अहवालातील प्रमुख मुद्दे ]

* भारतात ६ कोटीपेक्षा जास्त मुलांना कमी व अजिबात शिक्षण मिळत नाही.

* ११ लाख मूळ कनिष्ठ माध्यमिक स्तरावर असताना शिक्षण सोडून जातात.

* उच्च माध्यमिक स्तरावरील ४ कोटी ६८ लाख मूल शाळेतच जात नाही.

* २९ लाख मूल प्राथमिक शाळेतच जात नाही.

* अहवालानुसार भारतात २०२० मध्ये ४ कोटी असे कामगार असतील ज्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणच घेतलेल नसेल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.