शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

चालू घडामोडी १८ ते २५ सप्टेंबर - २०१६

चालू घडामोडी १८ ते २५ सप्टेंबर - २०१६ 

* डॉ रमेश रासकर यांचे संशोधन फेमटो फोटोग्राफीद्वारे प्रकाशाचा वेग टिपणे शक्य होणार आहे, स्मार्टफोनद्वारे तुमच्या चष्म्याचा नंबर शोधणे शक्य, कमी खर्चात डोळ्यांची काळजी घेणार उपकरण उपलब्द होणार, या संशोधनामुळे मआयटी संस्थेचा प्रतिष्ठेचा लेमेलसन यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

* पंजाब नॅशनल बँक अर्थात [ PNB ] या बँकेने विराट कोहलीची बँकच्या ब्रँड अँबेसिडरपदी नियुक्ती केली आहे.

* जनधन मुद्रा योजनेत महाराष्ट्र राज्य देशातून प्रथम क्रमांकावर आहे.

* केंद्र सरकारने एक अधिसूचना काढून आधार कार्ड सक्तीचे केले आहे त्यानुसार आता सर सरकारी योजनांसाठी आधारकार्ड आवश्यक आहे.

* रशियाच्या ब्लाडिनीर पुतीन यांच्या युनायटेड पक्ष विजयी झाला असून पुतीन हेच पंतप्रधान होऊ शकतात.

* २० सप्टेंबर २०१६ म्हणजेच आजच्या दिवशी केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज २७ शहराची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील पाच शहरांची नावे आहेत. त्यानुसार आज जाहीर करण्यात आलेली २७ शहरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - आग्रा, अजमेर, अमृतसर, औरंगाबाद, ग्वाल्हेर, हुबळी धारवाड, जालंधर, कल्याण डोंबिवली, कानपुर, कोहिमा, कोटा, मदुराई, मंगळुरु, नागपूर, नामची, नाशिक, रुरकेला, सालेम, शिवमोगा, ठाणे, तंजावूर, तिरुपती, तुमकूर, उज्जैन, वडोदरा, वेल्लोर आणि वाराणसी.

* फॉर्च्युन या मासिक संस्थेने जगातील ५०० मोठ्या कंपन्यांची यादी जाहीर केली आहे त्यानुसार भारताच्या एकूण ७ कंपन्याचा त्या यादीत समावेश आहे.या सूचित भारताची इंडियन ऑइल १६१ व्या स्थानावर, रिलायंस इंडस्ट्रीज २१५ व्या स्थानावर, टाटा मोटर्स २२६ व्या स्थानावर, स्टेट बँक ऑफ इंडिया २३२ व्या स्थानावर, भारत पेट्रोलियम ३५८ व्या स्थानावर, हिंदुस्थान पेट्रोलियम ३६७ व्या स्थानावर, राजेश एक्स्पोर्ट ४२३ व्या स्थानावर आहे.

* १९२४ पासून सुरु असलेली रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा आता बंद पडणार आहे.

* टाइम्स हायर एजुकेशन संस्थेने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठाने पंजाब विद्यापीठाबरोबर संयुक्तपणे दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

* भारतीय चित्रपट महासंघाने [ FFI ] ' विरसनाई ' या तामिळ चित्रपटाची सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या श्रेणीत ऑस्कर वारीसाठी निवड झाली आहे.

* प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी हे सलग नवव्या वर्षी भारतातील सर्वात अधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.

* ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त्त नवतेज सरना यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.