बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहर - २०१६

मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहर - २०१६

* नवीन जागतिक आर्थिक सर्वेनुसार भारतातील मुंबई शहर हे सर्वात श्रीमंत शहर ठरले असून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईची ८२० कोटी डॉलर एवढी संपत्ती आहे.

* त्याखालोखाल देशाची राजकीय राजधानी दिल्ली सर्वात श्रीमंत शहर असून दिल्लीजवळ ४५० कोटी डॉलर एवढी संपत्ती आहे.

* तर देशातील काही अन्य शहरे अनुक्रमे बंगळुरू तिसऱ्या स्थानावर असून ३२० कोटी डॉलर, हैद्राबाद चौथ्या ३१० कोटी डॉलर, कोलकाता पाचव्या २९० कोटी डॉलर, पुणे सहाव्या स्थानावर असून १८० कोटी डॉलर, चेन्नई सातव्या १५० कोटी डॉलर, गुरगाव आठव्या ११० कोटी डॉलर एवढी संपत्ती आहे.

* या सर्वेक्षणात व्यक्तीची वैयक्तिक संपत्ती म्हणजेच प्रॉपर्टी, रोख रक्कम, शेअर्स, बिझनेस इंटरेस्ट या सर्व संपत्तीचा समावेश केला आहे.

* या सर्वेक्षणानुसार काही नवीन उदयास येणाऱ्या शहराचा समावेश केला असून ती शहरे अनुक्रमे सुरत, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गोवा, चंदीगड, जयपूर, वडोदरा, नागपूर, इंदोर या शहराचा समावेश आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.