मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना - २०१६

ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना - २०१६

* राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मतांच्या आहारातील उष्मांक आणि प्रथिनांमध्ये वाढ करण्याबरोबरच जन्माला येणाऱ्या सुदृढ बालकाचे प्रमाण वाढवण्यासाठी गरोदर स्त्रिया स्तनदा मतांच्या आहारासाठी नोव्हेंबर २०१५ मध्ये डॉ ए पी जे अब्दुल कलाम योजना सुरु करण्यात आली.

* या अंतर्गत अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेतून सहा महिन्याच्या कालावाढीसाठी या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

* त्यामुळे उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार २०१५-१६ नागरी व ग्रामीण अशी वर्गवारी लक्षात घेता ग्रामीण भागातील स्त्रियांमधील ऍनीमियाचे प्रमाण अजूनही ४९.९% तर निकषापेक्षा बीएमआय कमी असलेल्यांचे प्रमाण ३०% एवढे आहे.

* आदिवासी क्षेत्रात हे प्रमाण अधीक असल्याने गरोदर स्त्रियांना शेवटचे तीन महिने  सकस आहार देण्याऐवजी आता गरोदर असल्याने निश्चित झाल्यापासून आहार देण्याऐवजी आता गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून आहार दिल्यास ऍनिमियाचे प्रमाण कमी होऊन बीएमआय वाढविणे शक्य होणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.