मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

स्मार्टसिटी योजनेची तिसरी यादी जाहीर - २०१६

स्मार्टसिटी योजनेची तिसरी यादी जाहीर - २०१६ 

* भारत सरकारने २०२२ पर्यंत देशातील १०० शहरे स्मार्ट करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. त्यानुसार स्मार्ट शहरांची पहिली व दुसरी यादी जाहीर करून त्यात अनुक्रमे २० व १३ अशा ३३ शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.

* तर २० सप्टेंबर २०१६ म्हणजेच आजच्या दिवशी केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज २७ शहराची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील पाच शहरांची नावे आहेत.

* त्यानुसार आज जाहीर करण्यात आलेली २७ शहरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - आग्रा, अजमेर, अमृतसर, औरंगाबाद, ग्वाल्हेर, हुबळी धारवाड, जालंधर, कल्याण डोंबिवली, कानपुर, कोहिमा, कोटा, मदुराई, मंगळुरु, नागपूर, नामची, नाशिक, रुरकेला, सालेम, शिवमोगा, ठाणे, तंजावूर, तिरुपती, तुमकूर, उज्जैन, वडोदरा, वेल्लोर आणि वाराणसी.

* यात महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, ठाणे, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे. याआधी पुणे, सोलापूर, या शहरांची निवड पहिल्या यादीत झालेली आहे, तर दुसऱ्या यादीत एकही महाराष्ट्रातील शहराची निवड झालेली नव्हती. आता महाराष्ट्रातील एकूण सात शहरांची स्मार्ट सिटी योजनेत निवड झालेली आहे.

* सरकारने आता पर्यंत एकूण ६० शहरांची यादी घोषित करून त्यांना प्रत्येक वर्षी १०० करोड रुपये उपलब्द करून देणार आहे. तसेच यात खाजगी गुंतवणूक, राज्य सरकार, महानगरपालिका यांचा आर्थिक वाटा असून सर्व मिळून शहरे स्मार्ट करण्यात येणार आहेत.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.