शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

चालू घडामोडी २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंम्बर - २०१६

चालू घडामोडी २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंम्बर - २०१६ 

* इस्रोतर्फे स्वदेशी स्क्रॅमजेट इंजिन असलेल्या ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीची व्हेईकल भारतीय संशोधन संस्थेने यशस्वीपणे चाचणी केली आहे. यामुळे हायड्रोजन व ऑक्सिजनचा इंधन म्हणून वापर करता येतील. अमेरिका, रशिया, युरोपियन, नंतर भारत हा चौथा देश बनला आहे.

* स्क्रॅमजेट इंजिन म्हणजे [ सुपरसॉनिक कम्बस्टिंग रॅमजेट ] असून हा जेट इंजिनाचा एक प्रकार असून यामध्ये ध्वनीपेक्षाही अधिक वेगात असताना हवेतच प्रजवलन होते.

* योगेश्वर दत्तला २०१२ मधील ऑलिम्पिक मधील कास्यपदकाऐवजी रौप्यपदक मिळणार आहे, योगेश्वरला ६० किलो फ्री स्टाईलमध्ये प्रकारात रौप्यपदक विजेता कुदुखोव हा रशियाचा खेळाडू दोषी आढळला होता.

* भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा आयसीसी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे, तर अश्विन हा गोलंदाज पाचव्या क्रमांकावर आहे.

* तब्बल सर्व जागांच्या तुलनेत सर्वाधिक वयस्कर असलेल्या म्हणजेच ८३ वर्षे जगलेल्या काकाकुवा या पक्ष्याचा मृत्यू झाला.

* रेल्वे तिकिटांची ऑनलाईन बुकिंग करताना केवळ ९२ पैसे भरून दहा लाख भरून त्याचे विमा संरक्षण देण्याच्या योजनेला सुरवात झाली आहे.

* जैवतंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल बायोकॉनच्या अध्यक्षा किरण मुजुमदार शॉ यांना फ्रांस सरकारने [ नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला.

* देशातील महिला अत्याचारात महाराष्ट्र हे राज्य आघाडीवर असून शहरांच्या बाबतीत दिल्लीचा प्रथम क्रमांक लागतो.

* एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान विरोधात ४४४ धावांचा विक्रमी विक्रम केला आहे.

* भारतातील अकुशल कामगारांचे वेतन २४८ वरून ३५० करण्यास सरकारने जाहीर केले आहे.

* जिएसटी साठी लागणाऱ्या किमान राज्याची संमती म्हणजे एकूण १६ राज्यांनी आतापर्यंत हे बिल आपल्या विधिमंडळात सादर करून पारित करून घेतले आहे त्यात महाराष्ट्राने सुद्धा जिएसटी साठी विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर केले आहे.

* देशातील सर्वात स्वस्त मानल्या जाणाऱ्या रिलायन्स जियो या टेलिकॉम कंपनीने आपली फोरजी सेवा लॉन्च केली असून ती जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा मानली जाणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.