शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

देशातील पहिले इन्होवेशन हब पुण्यात - २०१६

देशातील पहिले इन्होवेशन हब पुण्यात - २०१६

* स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट झालेल्या योजनेत गरजेप्रमाणे तंत्रज्ञान आधारित उत्पादने व सेवा देणाऱ्या स्टार्ट अपचा देशातील पहिलाच 'इन्होवेशन हब' शहरात स्थापन करण्यात येणार आहे.

* यानुसार स्टार्टअपच्या माध्यमातून ५० हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य निर्धारित ठेवण्यात आले आहे.

* हे हब म्हणजे सर्व प्रकल्पाच्या प्रकल्प, उत्पादने व प्रश्नावरील उत्तरांची फिजिकल आणि व्हर्चुअल इन्व्हेंटरी असेल. सरकार, प्रशासन, बुद्धिजीवी, उद्योजक, स्टार्टअप हे जण या हबच्या कामात सक्रिय असतील.

* हबच्या अंतर्गत जागतिक पातळीवरच्या पाच किंवा सहा जणांच्या तज्ज्ञांनी सल्लागार समिती स्थापन करण्याचा विचार आम्ही करत आहोत. जेणेकरून नागरिकांकडून मिळालेल्या सूचना व पर्यायावर अधिक चांगल्या पद्धतीने विचार व कृती करता येईल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.