शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

नागपूरच्या मिहानमध्ये पतंजलीचा फूड पार्क - २०१६

                                                                                    नागपूरच्या मिहानमध्ये पतंजलीचा फूड पार्क - २०१६

* नागपुरातील मिहान या सेझमध्ये रामदेव बाबाच्या पतंजलीचा फूड अँड हर्बल पार्क २३० एकरात उभारण्यात येणार आहे. त्यात एकूण १६०० कोटीची गुंतवणूक होणार आहे. 

* या पार्कमधून विदेशात व देशात निर्यात केली जाणार असून त्यामुळे नागपूर एक आंतरराष्ट्रीय निर्यात केंद्र म्हणून विकसित होणार आहे. 

* हा देशातील सर्वात मोठा फूडपार्क आहे. दररोज पाच हजार टन कच्या मालावर प्रक्रिया केली जाईल, पुढील सहा महिन्यात प्रकल्प सुरु करण्यात येईल, दीड वर्षात प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु होईल. 

* या प्रकल्पामुळे विदर्भातील २० हजार तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे १० हजार लोकांना प्रत्यक्ष तर ५० हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्द होणार आहे. येत्या एका वर्षात देशातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून समोर येईल. 

* या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळणार असून त्यांना कंपनी मार्फत २% दराने कर्ज उपलब्द करण्यात येईल. तसेच यामुळे मिहानला अच्छे दिन येणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.