रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

PSI सराव प्रश्नपत्रिका - ५

PSI सराव प्रश्नपत्रिका - ५

१] योग्य जोड्या जुळवा :
१] राजकीय तत्वे      १] रोजगाराची उपलब्द्ता
२] सामाजिक तत्वे    २] शांततापूर्ण सह अस्तित्व
३] आर्थिक अस्तित्व ३] ग्रामपंचायतीचे संघटन
४] आंतरराष्ट्रीय तत्वे ४] १४ वर्षाखालील बालकांना सक्तीचे व मोफत शिक्षण
१] १,२,३,४ २] २,३,४,१ ३] ३,४,१,२ ४] ४,१,२,३

२] भारतीय राज्यघटनेच्या स्रोतांबाबतच्या खालील विधानांचा विचार करा.
१] संसदीय लोकशाही = ब्रिटीश राज्यघटना
२] संघराज्य = अमेरिकेची राज्यघटना
३] मार्गदर्शक तत्वे = आयर्लंडची राज्यघटना
४] सामायिक सूची = ओट्रेलियाची राज्यघटना
१] १ बरोबर २] १ आणि २ बरोबर ३] १,२,३ बरोबर ४] सर्व बरोबर आहे

३] जोड्या लावा.
१] संघसूची              १] दीपगृहे
२] राज्यसूची            २] शिक्षण
३] समवर्ती शिक्षण     ३] कारागृहे
१] १,२,३ २] २,१,३ ३] ३,१,२ ४] १,३,२

४] महाराष्ट्रातील प्रतिसरकार शॅडो कॅबिनेट बाबतच्या खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही?
१] त्यांच्या हेतू सत्तारूढ शासनावर अंकुश ठेवणे असा आहे.
२] ती विरोधी पक्षांची आघाडी असते.
३] जानेवारी २००५ मध्ये ते निर्माण केले होते.
४] ते खूपच प्रभावी ठरले.

५] कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते?
१] ग्रामसभा २] ग्रामसेवक ३] सरपंच  ४] ग्रामपंचायत

६] खालीलपैकी कोणत्या बँकेने डिसेंबर २०११ मध्ये आपली १०० वर्षे पूर्ण केली?
१] रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया २] पंजाब नॅशनल बँक ३] सेंट्रल बँक ऑफ इंडिया ४] बँक ऑफ इंडिया

७] जिएसटी - १० GST - १० बाबत खालील विधाने विचारात घ्या?
१] जिएसटी १० हा उपग्रह २९ सप्टेंबर २०१२ रोजी कैरो फ्रेंच गयाना येथून सोडण्यात आला.
२] जिएसटी १० हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व अवजड उपग्रह आहे.
३] जिएसटी १० हा इस्रोच्या चालू तांड्यावरील १० उपग्रह आहे.
वरील कोणते विधान बरोबर आहे?
१] १ फक्त २] २ फक्त ३] १ आणि २ फक्त ४] १,२,३ बरोबर

८] ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीतील पुढील वाक्ये काळजीपूर्वक वाचा.
१] संमेलनाचे उदघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.
२] संमेलन चिपळूण येथे भरले होते.
३] या संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले होते.
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ ४] फक्त २ आणि ३

९] सन २०१२ च्या मॅन बुकर पुरस्कार संदर्भातील खालील वाक्ये वाचा.
१] हा पुरस्कार हिलरी मॅटेल या महिलेला मिळाला.
२] हा पुरस्कार त्यांच्या ब्रिन्ग अप द लेवलस ह्या कादंबरीला.
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ ४] यापैकी नाही

१०] महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व शासकीय रुग्णालये यांच्या संगणकीकरणासाठी HMIS हा प्रकल्प कोठे कार्यान्वयीत आहे?
१] मुंबई रुग्ण्यालाय मुंबई २] सेंट जॉर्ज रुग्णालय, मुंबई ३] जे जे रुग्णालय मुंबई ४] ससून रुग्णालय

११] कोणत्या भारतीय सॉफ्टवेअर कंपनीचा समावेश चीनच्या सेवाक्षेत्रातील प्रमुख आऊटसोर्सिंग कंपन्यांच्या यादीत करण्यात आला आहे?
१] विप्रो २] इन्फोसिस ३] सत्यम महिंद्रा ४] पटनी

१२] भारतीय उद्योग क्षेत्रातील सर्वाधिक शक्तिशाली महिला म्हणून फॉर्च्युन इंडिया ने कोणाचे नाव घोषित केले आहे?
१] चंदा कोचर २] शीखा शर्मा ३] करुणा जयंती ४] किरण मुजुमदार

१३] कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा ४ अंतर्गत सरोकस्पर्श लेक टॅपिंग बाबत विधाने विचारात घ्या.
१] सरोस्पर्श ही प्रक्रिया २५ एप्रिल २०१२ रोजी पार पडली.
२] हे काम अभियंत्यांनी केवळ १०० दिवसात पूर्ण केले.
३] या कामामुळे कोयना टप्पा ४ जलविद्युत प्रकल्पाची वीजनिर्मिती अखंड सुरु ठेवणे शक्य होईल.
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ ४] फक्त १,२,३

१४] खालीलपैकी भारतातील कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे पहिले राज्य बनले आहे?
१] महाराष्ट्र २] गुजरात ३] उत्तर प्रदेश ४] बिहार

१५] रामोशीबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
१] कधी काळी इंग्रज येण्याअगोदर ते दरोडेखोरी करत असत.
२] सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते.
३] इंग्रजांच्या साम्राज्यात त्यांचे महत्व कमी झाल्याने व इनामे खालसा झाल्याने ते दरोडेखोर बनले.
४] वरीलपैकी एकही अयोग्य नाही.

१६] योग्य विधाने निवडा :
१] हिग्ज बोसोन या अतिसुष्म कणांना दैवीकिरण असे टोपण नाव देण्यात आले.
२] ते शक्तिमान, सर्वव्यापी तरीही सापडण्यास खूप कठीण आहेत.
१] १ आणि २ सत्य असून २ हे १ चे कारण आहे.
२] १ आणि २ सत्य असून २ हे १ चे कारण नाही.
३] १ सत्य २ असत्य
४] १ असत्य २ सत्य

१७] अभिषेक कपूर दिग्दर्शित ' कायपोचे ' हा हिंदी सिनेमा चेतन भगत द्वारा लिखित कोणत्या कांदबरीवर आधारित आहे?
१] टू स्टेट्स २] थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ ३] रिव्होल्यूशन २०२० ४] फाईव्ह पॉईंट समवन

१८] गरिमा चौधरीच्या संदर्भातील खालील वाक्ये काळजीपूर्वक वाचा.
१] लंडन ऑलम्पिकसाठी पात्र ठरलेली फक्त ती भारतीय जुडोको होती.
२] ८३ किलो गटात तिने भारताचे प्रतीनीधीत्व केले.
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ ४] यापैकी नाही

१९] अग्नी V संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या :
१] अग्नी V हे भारताचे नवीनतम क्षेपणास्त्र आहे.
२] अग्नी V चा पल्ला ५००० किमी आहे.
३] अग्नी V टन अणवस्त्रे वाहून नेण्याच्या क्षमतेचे आहे.
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त ३ ४] फक्त २ आणि ३

२०] खालीलपैकी कोणत्या चित्रपटाची निर्मिती एम एफ हुसेन यांनी केली नाही?
१] विवाह २] गजगामिनी ३] थ्रू द आईज ऑफ ए पेंटर ४] मीनाक्षी : अ टेल ऑफ थ्री सिटीज

२१] सचिन तेंडुलकर एकदिवसीय आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना कोणत्या संघाविरुद्ध व कोठे खेळला.
१] इंग्लॅण्ड मुंबई २] इंग्लंड पुणे ३] पाकिस्तान, मुंबई येथे ४] पाकिस्तान ढाका येथे

२२] नोबेल पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातो?
१] १० ऑकटोबर २] १० फेब्रुवारी ३] १० डिसेंबर ४] १० जून

२३] खालीलपैकी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी शांतता, निशास्त्रीकरण व विकास पुरस्काराचे मानकरी आहेत?
१] ल्युईस इनासिसो २] ईला भट्ट ३] इलेन जॉन्सन सरलीफ ४] वरील सर्व

२४] मुंबई संघाने यंदाच्या विजेतेपदासाठी एकूण किती वेळा रणजी करंडक स्पर्धा जिंकली आहे?
१] २० २] २५ ३] ३५ ४] ४०

२५] देशातील सर्वच सरपंचांना गावविकासाचे प्रशिक्षण देणारे पंचायत राज ट्रेनिंग सेंटर [PRTC] कोठे उभारण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे?
१] हिवरे बाजार २] राळेगण सिद्धी ३] काटेवाडी ४] पुणे

२६] जगातील सर्वाधिक अंतराच्या हायस्पीड रेल्वेची यशस्वी करणारा देश कोणता?
१] जपान २] चीन ३] जर्मनी ४] फ्रांस

२७] योग्य जोड्या लावा :
१] पतौडीचे नवाब     १] द वॉल
२] राहुल द्रविड        २] द लिटिल मास्टर
३] सचिन तेंडुलकर  ३] द टायगर
४] सुनील गावस्कर   ४] मास्टर ब्लास्टर
                             ५] दादा
१] ३,१,४,२ २] २,५,१,४ ३] ५,४,२,१ ४] २,३,१,५

२८] खालील विधाने लक्षात घ्या :
१] आंतरराष्ट्रीय अन्न योजना व संशोधन संस्था [IFPRI] दरवर्षी जगातील उपासमारीची स्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध करते.
२] २०१२ च्या अहवालात भारत ६५ व्या क्रमांकावर आहे.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही ४] कोणतेही नाही

२९] जागतिक शेती उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
१] पहिला २] दुसरा ३] तिसरा ४] चौथा

३०] स्व. पंडित रविशंकर यांच्या बाबतच्या खालील विधानावर नीट विचार करा.
१] भारतरत्न म्हणून सन्मानित २] तीन वेळा ग्रामी अवॉर्ड ३] त्यांना नाईट कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर मिळाला परंतु सिल्वर बेअर अवॉर्ड मिळाला नाही
१] १ बरोबर २] १ आणि २ बरोबर ३] १ आणि ३ बरोबर ४] १,३,३ बरोबर

३१] वातावरणाचा किती भाग नत्रयुक्त व्यापतो?
१] १\३ २] १\२ ३] ३\४ ४] ४\५

३२] सेंद्रिय शेती प्रकारात, खालीलपैकी काय अपेक्षित नाही?
१] जनावरांच्या मलमूत्राचा वापर
२] वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर
३] रासायनिक खत व किटकनाशकांचा वापर
४] वरीलपैकी काहीही नाही

३३] - - - - - - - विषाणूच्या साहाय्याने एड्स होतो.
१] ह्युमन इमिनो डिफिशियन्सी व्हायरस २] ह्युमन इनीसीएटीव्ह डिफिशियंसी व्हायरस ३] ह्युमन इमिन्यो डेंजरस व्हायरस ४] यापैकी नाही

३४] आमल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जोरदार आहे?
१] Co२ २] CH४ ३] H२S ४] NO२ आणि SO२

३५] पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे - - - - - - - होय?
१] जैवविविधता २] जीवशास्त्र ३] जैवतंत्रज्ञान ४] जैव रसायनशास्त्र

३६] हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशीष्ट्य कोणते?
१] हायड्रोजन अणूच्या केंद्रकात असतो. २] हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो. ३] हायड्रोजनच्या केंद्रकात एकही प्रोट्रॉन नसतो ४] हायड्रोजनच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे दोन इलेक्ट्रॉन असतात

३७] गारव्यासाठी रेफ्रिजरन्ट म्हणून काय वापरतात?
१] फ्रेऑन २] अमोनिया ३] वरील दोन्ही ४] वरीलपैकी काहीच नाही

३८] प्रत्येकी १६ रोध असणारे चार रोधीत्रांची समांतर जोडणी केली. अशा प्रकारच्या चार रोधिकांची सरासरी संयोगी जोडणी केल्यास एकूण परिणामी रोध किती?
१] २ रोध २] ४ रोध ३] ८ रोध ४] १६ रोध

३९] आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते?
१] प्रथिने २] कर्बोदके ३] मेद ४] जीवनसत्व

४०] जीवनसत्व योग्य पर्याय निवडा :
१] अ - रातांधळेपणा, ब - बेरीबेरी, क - रक्तस्त्राव, के - स्कर्व्ही
२] अ - रातांधळेपणा, ब - स्कर्व्ही, क - बेरीबेरी, के - रक्तस्त्राव
३] अ - रातांधळेपणा, ब - बेरीबेरी, क - स्कर्व्ही, ब - बेरीबेरी
४] अ - रातांधळेपणा, ब - स्कर्व्ही, क - रक्तस्त्राव, के - बेरीबेरी

४१] - - - - -  - - या पदार्थाच्या बाबतीत विद्युत धारा व विभवांतर यांचा जर आलेख काढला तर तो सरळरेषीय येत नाही व रोधाचे मूल्य स्थिर राहत नाही?
१] थर्मिस्टर २] तांबे ३] अल्युमिनियम ४] चांदी

४२] - - - - - - - हरित गृह वायू आहेत?
१] CH४ व C२H६ २] CH४ व CO२ ३] CO२ व C२H६ ४] C२H६ व N२O

४३] २० ग्रॅम बर्फास १६०० कॅलरी उष्णता दिल्यास त्यांचे अंतिम तापमान किती होईल?
१] ० सें २] १० सें ३] २० सें ४] ५ सें

४४] सौर कुकर पेटीच्या आतील भागास काळा रंग दिलेला असतो, कारण काळ्या रंगाचे आवरण - - - - - - ?
१] त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रारणाला बाहेर सोडते
२] त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रारणाला परावर्तित करते
३] त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रारणाला अमान्य करते
४] त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रारणाला अमान्य करते

४५] व्हर्नियर कैवरच्या व्हर्नियर स्केलवर २५ खुणा असून मुख्य मापनपट्टीवरील लघुत्तम अंतर १ मी. मी. आहे म्हणून व्हर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती मिमी येईल?
१] ०.२५ २] ०.०४ ३] २.५ ४] १.२५

४६] केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनविण्यासाठी - - - - - -  याचा उपयोग करतात.
१] सोडियम कार्बोनेट २] सोडियम बायकार्बोनेट ३] कॅल्शियम कार्बोनेट ४] ब्लिचिंग पावडर

४७] मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्टया कसा असतो?
१] ऋणप्रभारित २] उदासीन ३] धनप्रभारीत ४] प्रवाहित

४८] कवक पेशींची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे?
१] सेल्युलोज २] ग्लुकोज ३] सुक्रोज ४] कायटीन

४९] खालीलपैकी कोणत्या रोगाची लागण दूषित अन्न किंवा दूषित पाणी ग्रहण केल्याने होते?
१] टायफाईड २] क्षय ३] रॅबिज ४] पोलिओ

५०] खालील उडणारा सस्तन प्राणी कोणता?
१] पोपट २] वटवाघूळ ३] घुबड ३] घार


उत्तरे -  १] ३, २] ४, ३] ४, ४] ४, ५] १, ६] ३, ७] ३, ८] ४, ९] १, १०] ३, ११] २, १२] १, १३] ४, १४] २, १५] ४, १६] १, १७] २, १८] १, १९] ३, २०] १, २१] ४, २२] ३, २३] ४, २४] ४, २५] १, २६] २, २७] १, २८] ३, २९] २, ३०] २, ३१] ४, ३२] ३, ३३] १, ३४] ४, ३५] १, ३६] २, ३७] ३, ३८] ४, ३९] २, ४०] ३, ४१] १, ४२] २, ४३] १, ४४] ४, ४५] २, ४६] २, ४७] २, ४८] ४, ४९] २, ५०] १

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.