शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

PSI सराव प्रश्नपत्रिका - ४

PSI सराव प्रश्नपत्रिका - ४ 

१] डॉ बाबासाहेब आंबेडकराबाबत पुढील तीन विधानांचा विचार करा :
१] दलितांच्या राजकीय हक्कासाठी त्यांनी सण १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
२] त्यांनी म्हटले होते की '' जरी मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही ''
३] ते त्याच वर्षी निर्वतले ज्या वर्षी बुद्ध मार्ग स्वीकारला.
वरील विधाने बरोबर आहे.
१] १ आणि २ २] २ आणि ३ ३] १ आणि ३ ४] १,२,३

२] खालील दोन विधानांचा विचार करा :
१] सेवाग्राम आश्रमाचे प्रोफेसर भनसाली दि १ नोव्हेंबर १९४२ रोजी दिल्लीला गेले व बापूजी अणेंना भेटले.
२] त्याना चिमूर येथे अत्याचार झालेल्या स्त्रियांकरता न्याय हवा होता.
१] दोन्ही विधाने खरी पण २ हे १ चे कारण आहे.
२] दोन्ही विधाने खरी पण २ हे १ चे कारण नाही.
३] विधान १ बरोबर पण २ नाही
४] दोन्ही विधाने चूक

३] सण १८५८ च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला?
१] विस्तारवादी २] साम्राज्यवादी ३] वसाहतवादी ४] दहशतवादी

४] पुणे, ठाणे, धारवाड, व मुंबई येथे पसरलेला दारूबंदीचा कार्यक्रम का आवरता घेण्यात आला.
१] कारण त्या कार्यक्रमात गांधीजी आणि काँग्रेसचा सहभाग नव्हता.
२] कारण त्यात भारतीय मुसलमान सहभागी झाले नाहीत.
३] कारण गांधीजींना तुरुंगात टाकण्यात आले.
४] कारण आकारलेला दंड अधिक होता.

५] खालील विधाने पहा :
१] फॅक्टरी ऍक्ट १८८१ हा तसा कडक होता.
२] फॅक्ट्री अक्ट्स १८८१,१८९२,१९४८ हे त्या घटकांना लागू केले ज्यात कामगारांची संख्या उत्तरोत्तर कमी होत गेली.
१] दोन्ही विधाने बरोबर २] वरील सर्व चूक ३] विधान १ बरोबर २ चूक ४] विधान २ बरोबर १ चूक

६] भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मावळ काळाबाबत आपण काय म्हणाल?
१] मवाळाच्या आवेदनाबाबत ब्रिटिशाबाबत थोडेसे द्यावयाचे आहे व बहुतांशी नाकारावयाचे अशी नीती होती.
२] मवाळाच्या मते ब्रिटिशांची उच्च पदाची नेमणूक राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, या नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून अयोग्य होती.
३] ब्रिटिशांनी मवाळाकडे दुर्लक्ष केले कारण मवाळांना जनआधार नव्हता.
४] वरील एकही विधान अयोग्य नाही.

७] एम डी कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने कोणती सन्मानदर्शक पदवी बहाल केली?
१] एलएलबी २] एलएलडी ३] डिलीट ४] पिएचडी

८] उमाजी नाईकला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले?
१] त्यांना पकडण्यास जाहीर केलेले १००, १२००, ५००० चे बक्षिस!
२] त्यांना मदत करण्यास जाहीर केलेली देहदंडाची शिक्षा.
३] विविध संवेदनशील क्षेत्रास उभे केलेले नाक्यांचे जाळे.
४] वरील सर्व.

९] आदिवासी चळवळीच्या संदर्भात पुढील कोणते विधान अयोग्य आहे?
१] शामराव व गोदावरी परुळेकर यांनी वारळीच्या उन्नतीसाठी बरेच परिश्रम घेतले.
२] बाळासाहेब खेर यांनी आपले कार्य हिंदू सेवा समाजाची स्थापना करून सुरु केले.
३] ताराबाई मोडक यांनी ठाणे जिल्ह्यात कोसबाड येथे काम केले.
४] अनुताई वाघ यांनी ताराबाई मोडक यांच्याकडून प्रेरणा घेतली.

१०] जोड्या लावा :
१] पहिली कापड गिरणी       १] १९११
२] पहिली ताग गिरणी          २] १८५३
३] पहिला लोखंड कारखाना ३] १८५५
४] पहिला रेल्वे मार्ग             ४] १८५४
१] २,३,१,४ २] ४,३,१,२ ३] १,४,३,२ ४] ३,२,४,१

११] जोड्या लावा :
१] मुंबई आग्रा         १] NH-४
२] मुंबई-पुणे-बंगलोर २] NH-१७
३] पुणे - नासिक      ३] NH-३
४] मुबंई - गोवा        ४] NH-५०
१] ३,१,४,२ २] २,१,३,४ ३] ४,२,३,१ ४] ३,४,१,२

१२] मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर म्हटले जाते?
१] दादर २] चेंबूर ३] भायखळा ४] परेल

१३] जोड्या लावा :
१] गहू         १] सुवर्णा
२] ज्वारी     २] बन्सी
३] तांदूळ     ३] लक्ष्मी
४] कापूस    ४] चिनोर
१] १,२,३,४ २] २,४,३,१ ३] २,१,४,३ ४] ३,२,१,४

१४] कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुजप्रदेश म्हणून ओळखला जातो?
१] महानदी त्रिभुजप्रदेश २] गोदावरी त्रिभुजप्रदेश ३] कृष्णा त्रिभुजप्रदेश ४] गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुजप्रदेश

१५] पहाटे ३ वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद येथे किती वाजता ऐकायला येईल?
१] रात्री ८.३० वाजता २] सकाळी ९.३० वाजता ३] सकाळी ७.३० वाजता ४] सकाळी ८.३० वाजता

१६] जोड्या लावा :
१] पैठण      १] सिल्हारा राजघराण्याची राजधानी
२] कल्याण  २] शालिवाहन राजाची राजधानी
३] अचलपूर ३] ११ व्या शतकात चालुक्यांची राजधानी
४] कोल्हापूर ४] राष्ट्रकुटांची राजधानी
१] १,४,३,२ २] २,४,३,१ ३] ४,३,२,१ ४] २,३,४,१

१७] कापसाचे दर हेक्टरी सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता?
१] यवतमाळ २] अमरावती ३] पुणे ४] जळगाव

१८] नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे?
१] सातपुडा-महादेव २] सातपुडा-मैकल ३] फक्त मैकल ४] फक्त महादेव

१९] प्राचीन ग्रंथामध्ये मुशक,अळूक,कूपक अशी नावे असलेला प्रदेश कोणता?
१] कोकण २] खान्देश ३] विदर्भ ४] मराठवाडा

२०] आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे?
१] हिस्सार २] पुणे ३] राहुरी ४] दापोली

२१] उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे?
१] तापी,गोदावरी,सीना,भीमा,कृष्णा २] तापी,गोदावरी,सीना,कृष्णा,भीमा ३] भीमा,गोदावरी,तापी,कृष्णा,सीना ४] तापी,सीना,गोदावरी,कृष्णा,भीमा

२२] पुढील वाक्ये योग्यरित्या पूर्ण करावे :
१] गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता. त्या अंतर्गत असलेला भूभाग - - - - - - ?
१] दक्षिण अमेरिका,आफ्रिका,युरोप,अंटार्टिका २] भारत,ऑस्ट्रेलिया,आफ्रिका,दक्षिण अमेरिका,अंटार्टिका
३] उत्तर अमेरिका,दक्षिण अमेरिका,युरोप,ऑस्ट्रेलिया ४] भारत,ऑस्ट्रेलिया,आफ्रिका,उत्तरअमेरिका,दक्षिण अमेरिका

२३] खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते?
१] स्थलीय विविधता २] कालीय विविधता ३] स्थळकालीय विविधता ४] यापैकी नाही

२४] बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो?
१] पूर्व विदर्भ व कोकण २] उत्तर कोकण व दक्षिण मराठवाडा ३] पश्चिम मराठवाडा व खान्देश ४] उत्तर कोकण व खान्देश

२५] राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशात काय म्हणतात?
१] बागर २] घगर ३] बांगर ४] खादर

२६] खालीलपैकी कोणत्या उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्द होतो?
१] लोह पोलाद उद्योग २] सुती कापड उद्योग ३] साखर कारखाना ४] जहाज बांधणी उद्योग

२७] ताजमहालच्या बांधकामासाठी संगमवर कोठून आणला गेला?
१] जोधपूर २] उदयपूर ३] मकराना ४] जबलपूर

२८] खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे नाव मोमिनाबाद होते?
१] परळी वैजनाथ २] पैठण ३] बीड ४] अंबेजोगाई

२९] महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे?
१] दक्षिणेकडील २] पश्चिमेकडील ३] मध्यभाग ४] उत्तरेकडील

३०] खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?
१] भारतात साक्षरतेचे प्रमाण पुरुषापेक्षा स्त्रियात जास्त आहेत.
२] अंदमान निकोबार येथे साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे.
३] भारतात साक्षरता प्रमाण कमी होत आहे.
४] वरील एकही नाही.

३१] खालीलपैकी कोणती भारतीय नियोजनाची आर्थिक उदिष्टे आहेत?
१] महत्तम उत्पादन २] संतुलित विकास ३] देश आत्मनिर्भर ४] आर्थिक उदारीकरण

३२] महानोबलीस यांनी तयार केलेल्या व्ह्यूरचनेतील खालील क्षेत्रावर भर देण्यात आला?
१] सार्वजनिक क्षेत्र २] मूलभूत उद्योग क्षेत्र ३] आयात-प्रतिस्थापन उद्योग ४] लघु कुटीर उद्योग

३३] योग्य जोड्या जुळवा.
१] १ ली योजना     १] उदारीकरण,खाजगीकरण,व जागतिकीकरण
२] २ री योजना      २] हॅरॉड, डोमर प्रतिमान
३] ८ वि योजना      ३] महानोबलीस प्रतिमान
४] ११ वि योजना    ४] पुरा प्रतिमान
१] १,२,३,४ २] २,३,४,१ ३] २,३,१,४ ४] ४,१,२,३

३४] खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
१] अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ' जलद व सर्वसामावेशी वृद्धी ' होते.
२] अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ' अधिक आणि संतुलित ' वृद्धी होते.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही चुक

३५] १२ व्या योजनेच्या संदर्भात पुढील कोणती विधाने बरोबर आहे?
१] योजनेचा कालावधी १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७
२] नियोजनाचे दोन मसुदे ९% विकासदर आणि ९.५% विकास दर विचारात घेऊन ठरविलेले आहेत.
३] औद्योगिक विकासाचा दर ९.६% आणि १०.९%
४] शेती उत्पादनाचा वाढीचा दर ५.०% आणि ५.५%
१] फक्त १ आणि २ २] फक्त ३ आणि ४ ३] वरील सर्व ४] फक्त १,२,३

३६] खालीलपैकी कोणती अकराव्या पंचवार्षिक योजनेची उदिष्टे समजता येतील?
१] संपूर्ण देशाकरिता सकलदेशीय उत्पादन GDP ९% पर्यंत नेणे.
२] दुर्बल घटकाकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे.
३] सकल देशी उत्पादन GDP ८% पर्यंत नेणे.
४] दरडोई सकल देशी उत्पादनांत वार्षिक वृद्धी ७.६% व्हावी.

३७] सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात?
१] विस्तार अधिकारी २] सभापती ३] उपसभापती ४] गटविकास अधिकारी

३८] राज्य लोकसेवा आयोग प्राय कोणती भूमिका बजावतात?
१] अभिनिर्णयी २] समुपदेशक ३] नियामक ४] शैक्षणिक

३९] उच्च न्यायालयासंबंधी कोणती विधाने बरोबर आहेत?
१] त्यांचे प्राधिलेख - अधिकारक्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक असते.
२] ती अभिलेखाची न्यायालये असतात.
३] त्यांना प्राथमिक अधिकारक्षेत्र नसते.
४] त्यांचे निर्णय दुय्यम न्यायालयावर बंधनकारक असतात.

४०] योग्य जोडया जुळवा :
१] काँग्रेस             १] मुथाई-चेट्टीयार
२] हिंदू महासभा    २] बी आर आंबेडकर
३] शेड्युल कास्ट फेडरेशन ३] अबुल कलाम आझाद
४] जस्टीस पार्टी   ४] श्यामाप्रसाद मुखर्जी
                          ५] बॅ जयकर
१] ३,४,२,१ २] ४,५,१,३ ३] १,२,३,४ ४] ५,४,२,१

४१] खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही?
१] राष्ट्रपती २] राज्यपाल ३] मुख्य निवडणूक आयुक्त ४] सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

४२] चुकीचे विधान ओळखा.
१] स्थानिक स्वराज्य संस्थेत ३३% महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य होते.
२] महिलांना ५०% आरक्षण देणारे केरळ हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे.
३] ७३ वी घटनादुरुस्ती हि स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मंजूर करण्यात आली आहे.
४] ७३ वी घटनादुरुस्ती ही १९९५ मध्ये मंजूर करण्यात आली.
१] ३,४ २] २,३ ३] ४ ४] १,२

४३] ग्रामसभेच्या बैठकीबाबत योग्य विधाने निवडा :
१] एका आर्थिक वर्षात कमीत कमी चार बैठका घेणे.
२] दोन बैठकीत जास्तीत जास्त चार महिन्यांचे अंतर
३] सरपंच व त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच बैठक बोलावू शकतो.
४] ग्रामसभेच्या बैठकी आधी स्त्री सभासदांची बैठक घेणे.
१] १ बरोबर २] २ बरोबर ३] १,२,३ बरोबर ४] सर्व बरोबर आहेत.

४४] कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले?
१] शीख २] ख्रिश्चन ३] अनुसूचित जाती ४] अनुसूचित जमाती

४५] राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करू शकतो?
१] बाह्य आक्रमण २] अंतर्गत कलह ३] राज्यात राज्यकारभार चालवण्यात अपयश ४] आर्थिक कलह
१] १,२,३ २] १,३,४ ३] २,३,४ ४] १,२,४

४६] सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिट्य गैरलागू आहेत?
१] निवडणूक २] अनुसूचित जातीसाठी आरक्षण ३] प्रत्यावहन ४] स्त्रियांसाठी आरक्षण

४७] 'क्ष' या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल?
१] ती पुणे विद्यापीठात प्राध्यपिका आहे.
२] तिने भारतीय भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे.
३] ती भारतात ब्रिटिश शिष्टमंडळासह आली आहे.
४] ती ब्रिटिश वकिलीत नोकरी करीत आहे.

४८] राज्यनितीच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात कोणते गुणवैशिट्ये गैरलागू ठरते?
१] मूलभूत अधिकाराशी अनुरूप २] न्यायालयीन निर्णय योग्य ३] परिवर्तनीय ४] कल्याणप्रसाद

४९] महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार पंचायतीच्या विसर्जनाबाबत खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर नाही?
१] अधिकारांचे उल्लंघन किंवा दुरुपयोग २] कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नसणे ३] कर लागू करण्यास कसूर ४] वरील एकही नाही

५०] ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते?
१] अर्थसहाय २] सुरक्षा ३] पायाभूत सुविधा ४] उत्तरदायित्वाची हमी


उत्तरे - १] ४,२] १, ३] १, ४] ४, ५] ४, ६] ४, ७] २, ८] ४, ९] २, १०] २, ११] १, १२] २, १३] ३, १४] ४, १५] ४, १६] ४, १७] ३, १८] ३, १९] १, २०] १, २१] १, २२] २, २३] ३, २४] १, २५] १, २६] २, २७] ३, २८] ४, २९] २, ३०] ४, ३१] १, ३२] २, ३३] ३, ३४] १, ३५] ४, ३६] २, ३७] १, ३८] २, ३९] ४, ४०] १, ४१] २, ४२] ४, ४३] ४, ४४] १, ४५] २, ४६] ३, ४७] २, ४८] २, ४९] ४, ५०] ४. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.