गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

PSI सराव प्रश्नपत्रिका - ३

PSI सराव प्रश्नपत्रिका - ३ 

१] सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या कारणांनी होते?
१] अनुच्या केंद्राचे विभाजन करून २] अनुच्या केंद्राचे एकत्रीकरण करून ३] रासायनिक अभिक्रियांमुळे ४] इलेक्ट्रॉन वहनामुळे

२] जलविद्युत प्रकल्पामध्ये - - - - - - - ?
१] विद्युत ऊर्जा पाण्यातून काढली जाते.
२] साचलेल्या पाण्यातील गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाईल.
३] पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाईनला फिरवून विद्युत निर्मिती केली जाते.
४] साचलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते.

३] पुढील वाक्ये असे पूर्ण करा जेणेकरून त्यास योग्य अर्थ प्राप्त होईल.
चालू घड्याळावरील गुंडाळलेली स्प्रिंग - - - -- - -
१] स्थितिज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर २] गतिज ऊर्जेचे स्थितीज ऊर्जेत रूपांतर ३] स्थितीज ऊर्जा स्थिर राहते. ४] गतिज ऊर्जा स्थिर राहते

४] योग्य जोड्या लावा :
१] युरेनियम    १] कर्करोगावरील उपचार
२] कोबाल्ट    २] गॉयटर वरील उपचार
३] आयोडीन   ३] अषमांचे वय
४] कार्बन        ४] अणुभट्टी
१] २,३,१,४ २] ४,१,२,३ ३] 3,4,1,2 4] 4,2,3,1

५] खालीलपैकी कोणते वाक्य चूक किंवा बरोबर आहे ते सांगा?
१] आदर्श इंधन म्हणजे जास्त उष्मांक
२] आदर्श इंधन कमी तापमानास पेट घेते.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] दोन्ही १ किंवा २ बरोबर ४] दोन्ही वाक्ये १ किंवा २ चूक

६] ध्वनिलहरींच्या प्रसारणासाठी - - - - - - - ?
१] निर्वात पोकळी आवश्यक आहे २] माध्यम आवश्यक आहे ३] माध्यमातील कण ध्वनी स्रोतापासून ऐकणाऱ्यापर्यंत प्रवास करतात ४] वरीलपैकी काहीही नाही

७] खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?
१] चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या ध्रुवाजवळून एकत्र येतात.
२] चुंबकीय क्षेत्र रेषा दक्षिण ध्रुवाजवळ तयार होतात व उत्तर ध्रुवाजवळ संपतात.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्हीही १,२ ४] दोन्हीही नाहीत

८] खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळविरास आकाश काळे दिसते कारण :
१] खूप उंचावरून वातावरण नाही २] प्रकाशाचे विकिरण होत नाही ३] दोन्ही १ आणि २ सत्य ४] वरीलपैकी एकही नाही

९] जोड्या लावा :
१] नॅचरल गॅस        १] कोळसा
२] पेट्रोलियम         २] ब्युटेन
३] फॉसिल फ्युएल  ३] एनरॉमिक डिग्रेशन
४] बायोगॅस            ४] मिथेन
१] ४,१,३,२ २] १,२,३,४ ३] ३,२,१,४ ४] ४,२,१,३

१०] कोणत्या प्रक्रियेत,स्थायुरूपात पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप वायुरूप पदार्थात रूपांतर होते?
१] घनीकरण २] द्रवीकरण ३] बाष्पीभवन ४] संप्लवन

११] खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापर केला जातो?
१] साबण २] धुण्याचा सोडा ३] ब्लिचिंग पावडर ४] बेकिंग सोडा

१२] प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीतील कोणत्या भागात होते?
१] पाने २] हिरवी खोडे ३] थोड्या प्रमाणात फुलामध्ये ४] वरील सर्व

१३] खालीलपैकी कोणते वाक्य\कोणती विधाने बरोबर आहे?
१] इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह ऋण प्रभारित ध्रुवांकडून धन प्रभारित ध्रुवाकडे असतो.
२] इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा विद्युत धारेच्या विरुद्ध असते
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्हीही १,२ ४] दोन्हीही नाहीत

१४] मृगजळ पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे दिसते?
१] प्रकाश किरणांचे संपूर्ण आंतरिक परावर्तन व वातावरणाचे वरच्या दिशेने वक्रीकरण\अपवर्तन
२] प्रकाश किरणांचे संपूर्ण आंतरिक परावर्तन व वातावरणाचे खालच्या दिशेने वक्रीकरण\अपवर्तन
३] प्रकाश किरणांचे जमिनीवरून परावर्तन
४] प्रकाश किरणांचे जमिनीवरून वक्रीकरण\अपवर्तन

१५] जोड्या लावा :
१] रेडिओ संच     १] १२०w
२] टीव्ही संच       २] ७५०w
३] फ्रिज              ३] ८०w
४] इलेक्ट्रिक प्रेस ४] १५०w
१] १,३,२,४ २] ३,२,१,४ ३] ३,१,४,२ ४] २,४,३,१

१६] वनस्पती तेलाचे क्षपण केले की, त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?
१] मॅंगनीज ऑक्साईड २] रेनी निकेल ३] कोबाल्ट ४] झिंक

१७] खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?
१] कमी विद्युतरोधासाठी कमी लांबीची, जाड तार वापरतात.
२] जास्त विद्युतरोधासाठी कमी लांबीची, बारीक thin तार वापरतात.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्हीही १,२ ४] दोन्हीही नाहीत

१८] खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
१] जास्त वास येणारे द्रव इथेनॉल मेरकाप्टन एलपीजी मध्ये मिसळण्यात येते.
२] तो गॅस गळती शोधतो.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्हीही १,२ ४] दोन्हीही नाहीत

१९] पुढीलपैकी कोणत्या कारणाने ध्वनी निर्माण होते?
१] माध्यमातील कणांच्या कंपनामुळे २] माध्यमातील कानांच्या घर्षणामुळे ३] माध्यमातील कनांच्या सरळ रेषेतील गतीमुळे ४] माध्यमातील कणांच्या सरळ रेषेतील गतीमुळे ४] माध्यमातील कनांच्या परिवलन गतीमुळे

२०] कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो?
१] हॅपिटायटस व्हायरस २] पोलिओ व्हायरस ३] एच आय व्ही ४] अँटीव्हायरस

२१] पुढील विधानांचा विचार करा :
१] पूर्वी किमान ठिकाणी मातृसत्ताक पद्धती होती व स्त्रिया श्रेष्ठ समजल्या जायच्या परंतु नंतर जसा मानवी समाजाचा विकास झाला तसा या परिस्थितीचा फरक पडला.
२] कामाच्या वाटणीची संकल्पना त्यास कारणीभूत आहे.
१] प्रथम विधान बरोबर परंतु दुसरे प्रथम विधानाकरता कारण नाही.
२] प्रथम विधान बरोबर व दुसरे प्रथम विधानाकरता कारण आहे.
३] प्रथम विधान अयोग्य त्यामुळे दुसऱ्याबाबत प्रश्नस उदभवत नाही.
४] प्रथम अथवा द्वितीय कोणतेही विधान बरोबर नाही.

२२] ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी यांनी दिली?
१] मुंबईचे नागरिक २] ब्रिटिश सरकार ३] पुण्याचे नागरिक ४] साताऱ्याचे नागरिक

२३] हॅम्लेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठी भाषांतर कोणी केले?
१] वि दा सावरकर २] गोपाळ गणेश आगरकर ३] महर्षी धोंडो केशव कर्वे ४] विष्णुशास्त्री पंडित

२४] मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा कोणी दिली?
१] सहदरन अयपण २] नारायण गुरु ३] हृदयनाथ कुंजरू ४] टी. एम. नायर

२५] बंगाली साहित्यातील निल दर्पण हि रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते?
१] कथा २] कादंबरी ३] काव्य ४] नाटक

२६] श्री नारायण एम लोखंडे मजूर चळवळीचे जनक यांच्या बाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे?
१] त्यांनी प्रथम मजूर संघटना बॉंबे मिल संगठना - बॉंबे मिल हॅन्ड्स असोसिएशन याची स्थापना केली.
२] त्यांना त्यांच्या हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल करण्यात आला.
३] त्यांना जस्टीस ऑफ पीस हा पुरस्कार देण्यात आला.
४] वरील एकही नाही.

२७] क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता?
१] भारतात शस्त्रास्त्रे तयार करणे, नसल्यास बाहेरून आयात करणे.
२] श्रीमंतांकडून कोणत्याही मार्गानी पैसे काढने.
३] रेल्वे लाईन्स व इतर यातायात साधनावर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटिश साम्राज्यात अडचण येईल की
४] वरील सर्वांचा त्या कार्यक्रमात सहभाग होता.

२८] बापूजी अणे यांनी पुसदमध्ये १० जुलै १९३० रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शविण्यात आला?
१] त्यांनी मीठ तयात केले, व सविनय कायदेभंग चळवळीच्या सहभागी झाले.
२] त्यांनी मिठाची पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या.
३] त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला.
४] त्यांनी पश्चात कपडे गोळा करून त्याना आग लावली.

२९] जन्मठेपेपेक्षा फासावर जाणे मला अधिक आवडेल. माझ्यामायभूमीस स्वतंत्र करण्यासाठी मला पुनरजन्म मिळावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या देशाला स्वतंत्र मिळेपर्यंत प्रत्येक पुनर्जन्मी स्वातंत्र्यसाठी फाशी जाण्यासारखा दुसरा आनंद नाही. हे उद्गार कोणाचे?
१] भगतसिंग २] राजगुरू ३] कर्तारसिंग ४] स्वातंत्रवीर सावरकर

३०] भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेला मान्यता दिली?
१] भारतीय राष्ट्रीय ट्रेंड युनियन काँग्रेस २] अखिल भारतीय लाल ट्रेंड युनियन काँग्रेस ३] अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस ४] अखिल भारतीय किसान सभा

३१] सशस्त्र क्रांतिकारकांच्या व त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्या जोड्या लावा.
१] श्रीधर परांजपे        १] हैद्राबाद
२] डॉ सिद्धनाथ काणे  २] अमरावती
३] दादासाहेब खापर्डे   ३] यवतमाळ
४] नरहरीपंथ घारपुरे   ४] वर्धा, नागपूर
१] ४,३,१,२ २] ४,३,२,१ ३] १,२,३,४ ४] २,१,४,३

३२] शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा १९१० मध्ये आयोजित केली आहे, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता?
१] जी. बी. वालंगकर २] ज्योतिबा फुले ३] वरील दोघांचाही ४] वरील कोणाचाच नाही

३३] खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१] सातारा जिल्ह्यातील नाना पाटील यांनी पत्री सरकार समांतर सरकार सुरु केले.
२] यशवंतराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला.
३] प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या.
४] वरील एकही नाही.

३४] जहाल काळात केसरी व मराठा जनजागृतीत आघाडीवर होते. टिळक व आगरकर त्यांच्याशी कसे संबंधित होते?
१] त्यांनी केसरी इंग्रजीत व मराठा मराठीत १८८१ मध्ये सुरु करण्यात केले.
२] आगरकरांनी मराठाचे तर टिळकांनी केसरीचे संपादन केले.
३] वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत.
४] वरील एकही विधान बरोबर नाही.

३५] कोळीच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठरेल?
१] कोळीणी तिन टप्प्यात उठाव केला १८२४, १८३९,१८४५ मध्ये.
२] कोळी, साधे कोळी व डोंगरी कोळी तसेच सोन कोळी व महादेव कोळी इत्यादीमध्ये विभागले होते.
३] इंग्रज कोळींचे उठाव आटोक्यात आणू शकले नाहीत.
४] वरील एकही नाही

३६] वासुदेव बळवंत फडकेबाबत काय खरे नाही?
१] त्यांनी स्वतःची ओळख लपवण्यासाठी दाढी राखली होती, व साधूच्या वेशात लोकात जनजागृती केली.
२] कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रज शिक्षण पूर्ण करू शकले नाही व प्रथमतः त्यांनी लष्करात नोकरी केली व तदनंतर रेल्वेत.
३] सुरवातीस रामोशांची त्यांना मदत होती परंतु नंतर रामोश्यानी त्यांची साथ सोडली.
४] वरीलपैकी एकही नाही.

३७] उमाजी नाईकांचे अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले?
१] उमाजीना शासनाच्या सर्व हालचालीची माहिती मिळत होती.
२] शेतकरी व गावकरी त्यांना उद्युक्त व मदत करीत होते.
३] वरील दोन्ही विधाने बरोबर
४] वरील कोणतेही बरोबर नाही.

३८] गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला?
१] संत तुकाराम २] संत एकनाथ ३] संत तुकडोजी महाराज ४] संत नामदेव

३९] संथाळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला?
१] संथाळ प्रदेश २] संथाळ प्रांत ३] संथाळ इलाका ४] संथाळ परगणा

४०] बाळ गंगाधर टिळक यांनी डॉ ऍनी बेझंट यांच्याबरोबर स्थापन केलेल्या होमरूल लीग बाबत काय खरे नाही?
१] तिचा उद्देश राष्ट्रीय संघटना वाढविण्याचा आणि त्यांना सशक्त करण्याचा होता.
२] ब्रिटिशांनी तिला दडपण्याचा ठरविले, वर्तमान पत्रांची मुस्कटदाबी केली.
३] मवाळांनी व मुस्लिम लीग पुढाऱ्यांनी तिच्या कार्यक्रमात भाग घेतला.
४] वरील एकही नाही.

४१] सन १९२७ मध्ये डॉ बी आर आंबेडकर यांनी सुरु केलेले बहिष्कृत भारत हे काय होते?
१] मासिक २] दैनिक ३] साप्ताहिक ४] पाक्षिक

४२] १८५७ च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता?
१] लष्करी व्यवस्थेत बदल झाला.
२] ईस्ट इंडिया कंपनी सरकारचे राज्य संपुष्टात आले.
३] नवे उद्योगधंदे व व्यापार पद्धतीत वाढ
४] हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला.

४३] भारतीय क्रांतीकारकांना जपानकडून काय मिळाले?
१] प्रेरणा व बॉम्ब बनविण्याची प्रक्रिया
२] आर्थिक मदत व शास्त्रास्त रसद
३] वरील दोन्ही
४] वरील एकही नाही

४४] सर सय्यद अहमद खान यांनी - - - - --
१] काँग्रेसला विरोध केला.
२] लोकशाही शासन पद्धतीस विरोध दर्शविला.
३] पाशात्य शिक्षणास प्रोत्साहन दिले.
४] वरील सर्व पर्याय बरोबर आहेत.

४५] राजाराममोहन रॉय यांनी सती पद्धती विरुद्ध लढा दिला, त्याबद्दल '' मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक '' अशी प्रशंसा कोणी केली?
१] एम के गांधी २] बी जी टिळक ३] लॉर्ड रिपन ४] बेंथम

४६] इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष का केले?
१] कारण मुस्लिम लीगने त्या अहवालास विरोध केला.
२] गांधीजींनी त्या अहवालाशी सहमत नव्हते.
३] काही काँग्रेस पुढारी अहवालाच्या बाजूने नव्हते.
४] इंग्रजांच्या मते तो अधिक पुरोगामी होता.

४७] सण १९३० साली नाशिक काळाराम मंदिरात अस्पृश्यना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला?
१] सावित्रीबाई फुले २] डॉ बाबासाहेब आंबेडकर ३] महात्मा फुले ४] महात्मा गांधी

४८] डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते?
१] पहिली गोलमेज परिषद २] दुसरी गोलमेज परिषद ३] तिसरी गोलमेज परिषद
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्हीही २ आणि ३  ४] तिन्हीं १,२,३

४९] फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले?
१] लोकमान्य टिळक २] गोपाळ गणेश आगरकर ३] गोपाळ कृष्ण गोखले ४] विष्णुशास्त्री चिपळूणकर

५०] गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौरा घटनेत २२ पोलीस मरण पावल्यावर काय झाले नाही?
१] गांधीजींना धक्का बसला, त्यांनी चळवळ थांबविली.
२] आम जनता व काँग्रेस पुढाऱ्यांचा गांधीज्यांचा निर्णयाचा राग आला.
३] इंग्रजांनी गांधीजींना शासन विरोधी कारवयास्तव अटक केली.
४] वरीलपैकी एकही नाही.


उत्तरे - १] २, २] ४, ३] १, ४] २, ५] १, ६] २, ७] ३, ८] १, ९] ४, १०] ४, ११] २, १२] ४, १३] ३, १४] २, १५] ३, १६] २, १७] १, १८] ३, १९] १, २०] २, २१] २, २२] १, २३] २, २४] २, २५] ४, २६] ४, २७] ४, २८] ३, २९] ३, ३०] १, ३१] २, ३२] ३, ३३] ४, ३४] ४, ३५] ४, ३६] २, ३७] ३, ३८] ३, ३९] ४, ४०] ४, ४१] ४, ४२] ४, ४३] १, ४४] ४, ४५] ४, ४६] १, ४७] २, ४८] ४, ४९] २, ५०] ४. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.