बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

PSI सराव प्रश्नपत्रिका - २

PSI सराव प्रश्नपत्रिका - २

१] कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत?
१] विद्या रांग २] सातपुडा रांग ३] काराकोरम रांग ४] कोल्ली रांग

२] खालील विधानांचा विचार करा:
१] घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल दऱ्या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात.
२] घडीच्या पर्वतांची निर्मिती टेनसाईल फोर्सेस मुळे होते.
१] फक्त १ २] फक्त २ ३] १ आणि २ ४] १ आणि २ दोन्हीही नाहीत

३] जोड्या जुळवा :
१] धुळे               १] ७२.८
२] नागपूर           २] ८८.४
३] नंदुरबार         ३]६४.४
४] अमरावती      ४] ८७.४
१] १,४,३,२ २] २,४,१,३ ३] १,२,३,४ ४] ४,२,३,१

४] खालील विधाने विचारात घ्या :
१] उत्तर अमेरिका मुक्त व्यापार करार [NAFTA] १९९४ साली अस्तित्वात आला.
२] फ्रांस हा NAFTA च्या सदस्यांपैकी एक होता.
१] फक्त १ २] फक्त २ ३] १ आणि २ दोन्ही ४] १ आणि २ दोन्हीही नाहीत

५] विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्टय बरोबर आहे?
१] अत्यंत दाट आहेत.
२] वार्षिक पानगळ होते.
३] लाकूड टणक व टिकाऊ असते.
४] एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.
१] फक्त १ २] फक्त १,२,३ ३] फक्त ३ ४] फक्त २ आणि ३

६] जोड्या लावा :
१] एम. आर. टी. पी.   १] २००२
                               २] १९६९
२] स्पर्धा कायदा         ३] पक्षपाती व्यापार प्रथांना बंदी
                               ४] स्पर्धाविषयक गुन्हे यांची व्याख्या दिली
१] २,३ - १,४ २] २,४ - १,३ ३] १,३ - २,४ ४] १,४ - २,४

७] २००८-०९ वर्षांशी तुलना केली असता २०१२-१३ साली भारतातील २००५-०४ च्या किमतीवर आधारित वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्राच्या वाट्यातील प्रवृत्ती [कल] खालील प्रमाणे दिसून येतो.
१] कृषी क्षेत्राच्या वाट्यात हिस्सा घट झाली.
२] उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली.
३] सेवा क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली.
१] १ फक्त २] २ आणि ३ फक्त ३] १ आणि ३ फक्त ४] १,२,३ फक्त

८] मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो.
१] दीर्घ आणि निरोगी आयुष्य
२] प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान.
३] दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी.
१] वरील सर्व १,२,३ २] १ आणि ३ फक्त ३] २ आणि ३ ४] १ आणि २ फक्त

९] खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे.
१] २०११-१२ मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्राचा हिस्सा ५९% एवढा होता.
२] दळणवळण, व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृद्धिदर आढळून आला आहे.
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ बरोबर ४] १ आणि २ चूक

१०] १] प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम ऑगस्ट मध्ये सुरु करण्यात आला.
२] या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण शहरी भागात सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचा हेतू होता.
३] प्रधानमंत्री रोजगार योजना ही योजना या योजनेत विलीन करण्यात आली.
१] १ बरोबर २] १ आणि २ बरोबर आहे ३] फक्त ३ बरोबर ४] १,२,३ सर्व बरोबर

११] राज्य व्यापार महामंडळ पुढीलपैकी कोणते कार्य करीत नाही?
१] निर्यात योग्य वस्तूच्या उत्पादनात वाढ घडवून आणणे.
२] पारंपरिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे.
३] अपारंपरिक वस्तूच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे.
४] वरीलपैकी कोणतेही नाही.
१] १ आणि २ २] २ फक्त ३] १ आणि ३ फक्त ४] ४ फक्त

१२] जोड्या लावा
१] गॅट                      १] १९८६
२] उरुग्वे फेरी           २] १९९३
३] डंकेल प्रस्ताव       ३] १९४८
४] विश्व व्यापार संघटना ४] १९९५
१] ३,१,२,४ २] ३,१,४,२ ३] ३,२,४,१ ४] ४,३,२,१

१३] कमाल जमीन धारणा कायदा दोन टप्प्यामध्ये लागू करण्यात आला.
१] १९६१ पर्यंत व १९६२ नंतर २] १९७१ पर्यंत व १९७२ नंतर ३] १९७२ पर्यंत व १९७२ नंतर ४] १९८२ पर्यंत व १९८२ नंतर

१४] खालील विधानांचा विचार करा :
१] थेट कर संहिता आणि वस्तू व सेवा करांची सुरुवात.
२] कर चुकवेगिरी विरोधातील साधारण नियमांबाबत स्पष्ट धोरण.
३] वित्तीय सर्वसामावेशकाबाबत समिती.
१] १ आणि २ ह्या ३ ने सुचविलेल्या कर सुधारणा आहेत. २] १ ही प्रस्तावित कर सुधारणा आहे ३] २ ही प्रस्तावित कर सुधारणा आहे ४] १,२,३ ने सुचविल्या नाहीत.

१५] तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?
१] आर्थिक विकासासाठी वित्तव्यवस्था करणे
२] नियोजनासाठी भांडवल पुरविणे
३] अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे
४] विकासयोजनेसाठी वित्तपुरवठा करणे.

१६] पुढील विधानांचा विचार करा :
१] नवे औद्योगिक धोरण २४ जुलै, १९९१ रोजी जाहीर केले गेले.
२] सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी निरगुंतणुकीचे धोरण स्विकारण्यात आले.
१] १ बरोबर तर २ चूक आहे २] १ हे धोरण तर २ हा त्याचा परिणाम आहे ३] २ बरोबर तर १ चूक आहे ४] १ आणि २ हे एकमेकांशी संबंधित नाहीत

१७] श्रमिकांची ' शून्य सीमांत उत्पादकता ' म्हणजे
१] तांत्रिक बेकारी २] छुपी बेकारी ३] अर्ध बेकारी ४] हंगामी बेकारी

१८] दारिद्रय समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाहीत. हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे.
१] स्वामी विवेकानंद २] सोनिया गांधी ३] एम एस स्वामिनाथन ४] डॉ व्ही एम दांडेकर
१] फक्त १ २] फक्त २ आणि ३ ३] ३ फक्त ४] ३ आणि ४ फक्त

१९] २०१३-१४ च्या भारताच्या अर्थसंकल्पपीय अंदाजाप्रमाणे एकूण राजकीय कोष तूट राष्ट्रीय उत्पादनाच्या ४-८ प्रतिशत पर्यंत योजनापूर्वक कमी करण्याचे पुढील प्रयत्नांद्वारे साध्य करणे अपेक्षित होते.
१] निर्गुंतवणुकीच्या प्राप्तीस अधिक चालना देणे.
२] कर महसूल आणि दूरसंचरण क्षेत्रातील प्राप्तीस अधिक चालना देणे.
३] अर्थसाहाय्यावरील खर्चात कपात करणे.
१] फक्त १ २] फक्त २ आणि ३ ३] फक्त १ आणि ३ ४] १,२,३ वरील सर्व

२०] पुढील कोणते विधान योग्य आहे :
१] हरितक्रांती पूर्व काळात भारताने अन्नधान्याची आयात PL-४८० या कायद्यानुसार केली होती.
२] PL-४८० कायद्यानुसार केलेल्या आयातीत मुख्य हिस्सा गहू या अन्न धान्याचा होता.
१] १ आणि २ दोन्हीही बरोबर २] १ आणि २ दोन्हीही चूक आहेत ३] १ फक्त बरोबर आहे ४] २ फक्त बरोबर आहे

२१] १] अतिनील किरणांचा भाग हा गर्द जांभळ्या रंगाचा तरंग लांबीपेक्षा लहान तरंग लांबी चा वर्णपट भाग आहे.
 २] इन्फ्रारेड भाग हा लाल रंगापेक्षा कमी तरंग लांबी वर्णपटाचा भाग आहे.
३] एका त्रिकोणाकृती घनाच्या द्रव्यासाठी, वक्रीभवन निर्देशांक, वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो.
१] १ आणि २ २] १ आणि ३ ३] २ आणि ३ ४] यापैकी नाही

२२] १] नैसर्गिक वायू हा हायड्रोजन व कार्बन यांचे संयुग असते.
२] मिथेन हे हायड्रोजनचे व कार्बनचे संयुग नसते.
३] नैसर्गिक वायू हे वनस्पती व प्राणी जन्य इंधन आहे.
१] १ आणि २ २] २ आणि ३ ३] १ आणि ३ ४] यापैकी नाही

२३] बिग बँग थेरी हा प्रत्यक्षात इतिहासपूर्वकालीन अनुचा सिद्धांत प्रथम - - - - - - यांनी प्रस्तावित केला.
१] अल्बर्ट आईन्स्टाईन २] जॉर्जेस लिमैत्रे ३] आयझॅक न्यूटन ४] स्टीफन हॉकिंग्स

२४] ब्रास हा मिश्रधातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो?
१] कॉपर ८०% + झिंक १०% + टिन १०% २] कॉपर ८०% + झिंक २०% ३] कॉपर ८०% + टिन २०%
४] कॉपर ९०% + झिंक १०%

२५] फिनॉल हे - - - - - - आहे.
१] अरोमॅटिक संयुग आहे २] अलिफटीक संयुग आहे ३] हेटरो सायलीक संयुग आहे ४] वरीलपैकी कोणतेही नाही

२६] विरंजक चूर्ण वापरून पाण्याला निर्जंतुक करताना, निर्जंतुक प्रक्रिया कशामुळे होते?
१] क्लोरीन वायू २] हायपोक्लोरेस आमल ३] नवजात ऑक्सिजन ४] कार्बनडाय ऑक्साईड
१] १,२,३ २] १,२,४ ३] २,३,४ ४] वरील सर्व

२७] आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजांमध्ये कार्परगुहिकेची क्षमता अधिक होती?
१] निअँडरथल मानव २] जावा मॅन ३] पेकिंग मॅन ४] क्रोमॅनन मानव

२८] खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो?
१] कांगारू २] प्लॅटिपस ३] पेंग्विन ४] व्हेल

२९] खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्याचे असते?
१] बेडूक २] मगर ३] शार्क ४] पाल

३०] पानावरील केवडा रोग कोणत्या खनिजद्रव्यांच्या अभावामुळे होते?
१] बोरॉन B २] मोलिब्लेडम [MO] ३] कोबाल्ट [co] ४] लोह [Fe]

३१] वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती कोणी शोधून काढली?
१] बेनथॅम आणि हुकर २] केरोलस लिनियस ३] अडॉल्फ एंजलऱ ४] चार्ल्स बेस्सी

३२] वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?
१] जिनस २] कुळ ३] ऑर्डर ४] स्पिशिस

३३] - - - - - - - हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी जबाबदार आहे?
१] जीवनसत्व अ २] जीवनसत्व ड ३] जीवनसत्व इ ४] जीवनसत्व के

३४] अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पूर्णान्न असे म्हणतात?
१] पांढरा बलक २] पिवळा बलक ३] पांढरा व पिवळा बलक आणि कवच ४] अंड्यात प्रथिनेच नसतात

३५] - - - - --  याचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो?
१] कार्बामिथझोल २] बेनोमील ३] थायोसल्फेट ४] बेंझॉइक ऍसिड ४]

३६] अमितने आपल्या पगाराचा ३\५ हिस्सा घरी दिला. उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. उरलेल्या पैकी निम्मा मुलाला दिला व बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. जर त्याने पोस्टात ६०० रु जमा केले तर त्याचा पगार किती?
१] ६००० २] ६५०० ३] ५००० ४] ४०००

३७] एका घन आकृतीला दोन सलग बाजूने लाल रंग लाल रंगाच्या विरुद्ध बाजूने नारंगी रंग आणि उरलेल्या बाजुंना निळा रंग देण्यात आला. त्याचे २७ तुकडे करण्यात आले. तर संपूर्ण क्षेत्रफळाचा किती भाग रंगविण्यात आलेला नाही?
१] १\३ २] १\४ ३] १\२ ४] १\६

३८] शर्वरीचा जन्म बुधवार दिनांक ५ सप्टेंबर २००१ ला झाला. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल?
१] रविवार २] गुरुवार ३] मंगळवार ४] सोमवार

३९] शाळेतील २८८ मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रांगांची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत?
१] १२ २] १६ ३] २० ४] २४

४०] जर EXCEL = ९३५९६ असेल, PAINT = ७४१२८, तर ACCEPT =?
१] ७३५९६१ २] ४५५९७८ ३] ५४७९७८ ४] ५५४९७८


उत्तरे - १] १, २] १, ३] ३, ४] २, ५] २, ६] १, ७] ३, ८] ४ ९] ३, १०] ४, ११] १, १२] १, १३] ३, १४] ४, १५] ३, १६] २, १७] २, १८] ३, १९] ४, २०] १, २१] २, २२] ३, २३] २, २४] २, २५] १, २६] १, २७] ४, २८] २, २९] २, ३०] ४, ३१] १, ३२] ४, ३३] २, ३४] १, ३५] २, ३६] १, ३७] २, ३८] १, ३९] ४, ४०] २. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.