सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

PSI पोलीस उपनिरीक्षक [ पूर्व ] परीक्षा योजना व अभ्यासक्रम

PSI पोलीस उपनिरीक्षक [ पूर्व ] परीक्षा योजना व अभ्यासक्रम

प्रश्नपत्रिकेचा तपशील 

* सामान्य क्षमता चाचणी म्हणून पेपर १ प्रशपत्रिका असते.

* प्रश्नांची संख्या एकूण १०० असते.

* एकूण गुण १०० असतात.

* पेपरचा दर्जा - पदवी

* पेपरचे माध्यम - इंग्रजी व मराठी

* परीक्षेचा कालावधी - एक तास

* पेपरचे स्वरूप - वस्तुनिष्ठ [ बहुपर्यायी ]

अभ्यासक्रम - सामान्य अध्ययन पूर्व परीक्षेत खालील घटकांचा समावेश असेल.

* चालू घडामोडी - जागतिक व भारतातील सर्व

* नागरिकशास्त्र - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन व प्रशासन, ग्राम व्यवस्थापन प्रशासन.

* आधुनिक भारताचा इतिहास व विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

* भूगोल - महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह - पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे

* अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी, शासकीय अर्थव्यवस्था - अर्थसंकल्प, लेखा, परीक्षण

* सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, व वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र

* बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

PSI - मुख्य परीक्षा अभ्यासक्रम 

परीक्षा योजना 

* प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहूपर्यायी

* एकूण गुण - २०० गुण

* प्रश्नपत्रिकांची संख्या - दोन

* पेपर १ - मराठी व इंग्रजी [ मराठी ६० गुण व इंग्रजी ४० गुण ], दर्जा मराठी बारावी, इंग्रजी - पदवी, माध्यम इंग्रजी - मराठी, एक तास

* पेपर २ - सामान्य ज्ञान व बुद्धिमापन विषयाचे ज्ञान, एकूण गुण १००, प्रश्नसंख्या १००, दर्जा पदवी, माध्यम मराठी, कालावधी १ तास

अभ्यासक्रम - पेपर १ - मराठी व इंग्रजी

* मराठी - सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

* इंग्रजी - Common Vocabulary, Sentensce Structure, Grammar, use of idoms and phreses and their meaning and comprehension of passage.

अभ्यासक्रम - पेपर क्र २ - सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता 

* चालू घडामोडी - भारत व जग

* बुद्धिमापन व बुद्धिमत्ता सर्व

* महाराष्ट्राचा भूगोल - महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल व त्याचे विभाग, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती - वने व खजिने, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या व त्याचे परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.

* महाराष्ट्राचा इतिहास - सामाजिक व आर्थिक जागृती, महत्वाच्या व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमान पत्रे व शिक्षणाचा परिणाम भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी, व राष्ट्रीय चळवळी.

* भारतीय राज्यघटना - घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेची भूमिका तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये,

* माहिती अधिकार अधिनियम - २००५

* संगणक व माहिती तंत्रज्ञान - आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनाचा संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व संबंधित कायदे व केस स्टडीज, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानांचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब आशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी.

* मानवी हक्क व जबाबदाऱ्या - संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेची तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या, यंत्रणेची जबाबदारी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी. लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

* मुंबई पोलीस कायदा

* भारतीय दंड संहिता

* फौजदारी प्रक्रिया संहिता - १९७३

* भारतीय पुरावा कायदा - [ Indian Evidence Act ]. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.