सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

MPSC - महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अभ्यासक्रम

MPSC - महाराष्ट्र वन सेवा [ पूर्व ] स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम 

परीक्षा योजना 

* सामान्य ज्ञान व गणित या दोन विषयाची १०० प्रश्नांची व १०० गुणांचा एक पेपर घेण्यात येतो.

* प्रश्नपत्रिकेचा दर्जा सामान्य ज्ञान विषयासाठी पदवी व गणित विषयासाठी शालांत राहील.

* प्रश्नपत्रिकेचे माध्यम सामान्य ज्ञान या विषयासाठी मराठी व इंग्रजी, तर गणित विषयासाठी फक्त इंग्रजी राहील.

* प्रश्नपत्रिकेचा कालावधी एक तासाचा असेल तसेच प्रश्नाचे स्वरूप बहुपर्यायी व वस्तुनिष्ठ असेल.

अभ्यासक्रम - सामान्य ज्ञान व गणित या विषयासाठी खालील घटक व उपघटक यांचा समावेश असेल.

सामान्य ज्ञान अभ्यासक्रम 

* आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

* भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल

* भारतीय संविधान व राज्यपद्धती

* आदिवासी जीवन विकास

* भारतीय अर्थव्यवस्था व पंचवार्षिक योजना - जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांच्या विशेष अभ्यासासह.

* पर्यावरण व विकास - मानवी विकास पर्यावरण, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण व विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवार्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना\संस्था.

* विज्ञान तंत्रज्ञान - या क्षेत्रात झालेली प्रगती व विकास, तसेच त्यांचा मानवी जीवनावर झालेला परिणाम.

* संगणकीकरण व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे - संगणकीकरण संगणकाची विविध क्षेत्रातील विशेषता लोक प्रशासनातील उपयुक्तता, संगणकीकरणाची व्याप्ती व मर्यादा, तसेच त्याचे फायदे व तोटे.

* इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे - इंटरनेट, ई कॉमर्स, ई मेल, ई बँकिंग, इत्यादी सुविधा.

* जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी.

गणित अभ्यासक्रम  

* संख्याशास्त्र - संख्याचे प्रकार, संख्या - गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, विभाज्यतेच्या कसोट्या, पूर्णांक अपूर्णांक संख्या व सूत्रे, शेकडेवारी, लिंग गुणोत्तर, दलाली व कमिशन, अंतर - काळ - वेग, नफा व तोटा, साधे आणि संयुक्त व्याज कर्ज.

* बीजगणित, भूमिती, मापन गणित, त्रिकोणमिती, संख्याशास्त्र, यावरील सर्व प्रकारची गणिते.

* संगणक - संगणकाची माहिती, संगणकाचे घटक व कार्य, संगणकाचा पुढील वाटचाल आणि मर्यादा,आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका आणि वापर,

* सांगणासंबंधी गणितीय तक्ते, साधी सूत्रे, व गणितीय शास्त्र.

महाराष्ट्र मुख्य सेवा अभ्यासक्रम 

* परीक्षेचे टप्पे - लेखी परीक्षा - ४०० गुण

* मुलाखत - ५० गुण

* प्रश्नपत्रिकांची संख्या - २

* सामान्य अध्ययन पेपर १ - गुण २००, प्रश्नसंख्या १००, माध्यम - मराठी व इंग्रजी, दर्जा - पदवी, कालावधी एक तास, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी.

* सामान्य अध्ययन पेपर २ - गुण २००, प्रश्नसंख्या १००, माध्यम - मराठी व इंग्रजी, दर्जा - पदवी, कालावधी एक तास, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी

पेपर १ - अभ्यासक्रम 

*  आधुनिक भारताचा इतिहास व विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

* भूगोल - महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह - पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे

* भारतीय शासन आणि राजकारण, राज्यघटना व राज्यपद्धती, शहरी व ग्रामीण सामाजिक विकास.

* आर्थिक व सामाजिक विकास

पेपर २ अभ्यासक्रम 

* सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र, रासायनिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र

* निसर्ग संवर्धन - माती, मातीचे क्षरण व संवर्धन, पर्यावरणाचे प्रकार, खते व त्यांचे प्रकार, पर्यावरणीय प्रदूषण, प्राणी व त्यांचे महत्व, वन कायदा, जैवविविधता, रोपवाटिका, आदिवासी विकास व महत्व, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वनसंवर्धन सामाजिक संस्था यांचा अभ्यास व महत्व. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.