गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम - २०१६

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम - २०१६

* सन २०१६ च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपासून मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्यात आले असून सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम खालीलप्रमाणे लागू राहील. सामान्य अध्ययन १,२,३,४ या विषयाच्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तीन चुकांच्या उत्तराकरिता एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील.

* परीक्षेचे टप्पे - लेखी परीक्षा - ८०० गुण, मुलाखत १०० गुण, प्रश्नपत्रिकांची संख्या ६ [ अनिवार्य ].

* प्रश्नपत्रिकेचे स्वरूप खालील प्रकारे असेल.

१] पेपर १ - विषय मराठी आणि इंग्रजी, गुण ५०+५० प्रत्येकी, दर्जा दोन्हीकरिता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा हा राहील, माध्यम मराठी भाषेकरिता मराठी व इंग्रजी करीता इंग्रजी राहील, पेपरचा कालावधी ३ तासाचा राहील, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वर्णनात्मक व पारंपरिक राहील. [ पेपर क्र १ मधील दोन्ही विषयासाठी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका राहील, मात्र दोन्ही भागासाठी दोन स्वतंत्र उत्तरपुस्तिका राहतील.

२] पेपर २ - विषय मराठी व इंग्रजी, गुण ५०+५० प्रत्येकी, दोन्ही विषयाकरिता अभ्यासक्रमाचा दर्जा पदवीचा असेल, माध्यम मराठी भाषेकरिता मराठी व इंग्रजी करीता इंग्रजी राहील, पेपरचा कालावधी १ तासाचा राहील, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असेल. पेपर क्रमांक २ मधील दोन्ही विषयासाठी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका राहिल.

३] पेपर ३ [ सामान्य अध्ययन - पेपर १ ] - हा पेपर १५० गुणांसाठी असेल, प्रश्न संख्या १५०, दर्जा पदवी, माध्यम मराठी व इंग्रजी, वेळ २ तास, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असेल. पेपर ३ - GS - १ करिता अभ्यासक्रम खालील प्रकारे असेल.

सामान्य अध्ययन - पेपर १ [ इतिहास व भूगोल ] अभ्यासक्रम -

टीप - १] प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तरे देऊ शकेल आणि विविध विषयातील उमेदवाराच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे.

२] उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयातील उपविषयातील अद्ययावत आणि चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.  

इतिहास 

* आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास [१८१८-१८५७] - आधुनिक शिक्षणाची ओळख - वृत्तपत्रे,रेल्वे,टपाल, व तार उद्योगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक सुधारणा, धार्मिक सुधारणा, यांचा समाजावरील परिणाम.

* ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना - प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुध्द्व युद्धे, तैनाती फोज धोरण, खालसा धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना.

* सामाजिक व सांस्कृतिक बदल : ख्रिश्चन मिशनबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रनालयाचे आगमन, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय, १८२८ ते १८५७, सामाजिक - धार्मिक सुधारणांच्या चळवळी, ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, शीख तसेच मुस्लिम धर्मियातील सुधारणा चळवळली, डिप्रेस क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ, डिप्रेस क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टीस पार्टी.

* सामाजिक व आर्थिक जागृती - भारतीय राष्ट्रवाद, १८५७ चा उठाव व त्यानंतर, इंडियन नॅशनल काँग्रेस [१८८५-१९४७], आझाद हिंद सेना, महत्वाच्या व्यक्तींची भूमिका, स्वातंत्रपूर्व भारतातील सामाजिक जागृतीमधील वृत्तपत्रे व शिक्षण यांची भूमिका.

* भारतीय राष्ट्र्वादाची निर्मिती व विकास - सामाजिक पार्श्वभूमी, राष्ट्रीय संघटनांची स्थापना, शेतकऱ्यांचे उठाव, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना, मवाळ गटाची वाढ, जहाल गटाची वाढ, मोर्ले मिंटो सुधारणा, स्वराज्याची चळवळ, लखनौ करार, मॉन्टेग्यु चेम्सफर्ड कायदा.

* गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ - गांधीजींचे नेतृत्व व प्रतिकाराचे तत्व, गांधीजींच्या लोकचळवळी, असहकार, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, चलेजाव चळवळ, सत्यशोधक समाज, गांधीजी आणि अपृश्यता निर्मूलन, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यनाचा समस्येबाबत दृष्टिकोन, मुस्लिम राजकारण, आणि स्वतंत्र चळवळ, अलिगढ चळवळ, [मुस्लिम लीग व अली बंधू, इकबाल, जिना] संयुक्त पक्ष, युनिनिस्ट पार्टी, व कृषक प्रजा पार्टी, हिंदू महासभेचे राजकारण, साम्यवादी नेते आणि भारतीय स्वतंत्र चळवळ, काँग्रेस समाजवादी पक्ष, राष्ट्रीय चळवळीतील महिला सहभाग, संस्थानातील जनतेची चळवळ, साम्यवादी डावी बाजू, शेतमजुरांची चळवळ, आदिवासींचे बंड, ट्रेड युनियन चळवळ, व आदिवासी चळवळ

* स्वातंत्र्योत्तर भारत - फाळणीचे परिणाम, संस्थनाचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना नेहरूंचे अलिप्ततेचे धोरण, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, त्यात सहभागी झालेले महत्वाचे राजकीय पक्ष व व्यक्ती, शेजारील राष्ट्रांशी संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारणामधील भारताची भूमिका, कृषी, विज्ञान, उद्योगधंदे, शिक्षण, व तंत्रज्ञान यामधील प्रगती, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय, बांगला देशाची मुक्ती, इंदिरा गांधींच्या काळातील अलिप्तपतावाद, राज्यातील आघाडीची सरकारे, विद्यार्थ्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी, पंजाब, व आसाममधील, दहशतवाद, नक्षलवाद, व माओवाद, पर्यावरण चळवळ, महिला चळवळ, व वांशिक चळवळ.

* महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक व त्यांचे कार्य व विचारप्रणाली - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, मा. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षी कर्वे, राजश्री शाहू महाराज, महर्षी विठ्ठल शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोभा भावे, विनायक दामोदर सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतिवीर नाना पाटील, लहुजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील.

* महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा [प्राचीन ते आधुनिक] - प्रायोगिक कला,[नृत्य,नाटक,चित्रपट,संगीत, व लोककला, लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड, व इतर लोकनृत्ये] दृश्य कला [ वास्तू रचना, चित्रकला, व वास्तुशिल्प ], आणि उत्सव, महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विकासावरील वाङमयाचा प्रभाव, भक्ती वाडःमय, दलित वाडःमय, नागरी व ग्रामीण वाडःमय.

भूगोल - महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह 

* प्राकृतिक भूगोल - पृथ्वीचे अंतरंग - रचना व प्राकृतिक जडणघडण, भूरूप विकास नियंत्रण करणारे घटक, भूरूपिक चक्रांची संकल्पना, नदीसंबंधी, शुष्क, हिम, समुद्रतटीय चक्र, यांच्याशी संबंधित भूरूप, भारतीय उपखंडाची उत्क्रांती व भूरूपवर्णन, महत्वाचे भूरूपिय प्रदेश, पुरांची समस्या, महाराष्ट्राच्या भूरूपिय तपशील, महाराष्ट्रातील भूरूपिय वैशिष्ट्ये, भारताचे त्यांच्या शेजारील राष्ट्रांच्या, हिंद महासागराच्या, आशियाच्या व जगाच्या संदर्भातील मोक्याचे ठिकाण.

* महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल - खनिजे व ऊर्जासाधने, महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे वितरण, महत्व व विकास, महाराष्ट्रातील पर्यटन, धार्मिक पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, पर्यावरणभिमुख, इको पर्यटन, व सांस्कृतिक वारसा, महाराष्ट्रातील संरक्षित वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने व किल्ले, व्याघ्र प्रकल्प.

* महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल : जनतेचे स्थलांतर - कारणे व परिणाम, ऊसतोडणी कामगार साधनसंपत्ती व ज्या प्रदेशात स्थलांतर होते त्या स्थलांतराचा परिणाम, महाराष्ट्रतील ग्रामीण वस्त्या, शहरी व ग्रामीण वस्त्यांमधील समस्या
पर्यावरण, गृहनिर्माण, झोपडपट्टी, पाणीपुरवठा, व स्वच्छ, शहरी, वाहतूक व प्रदूषण.

* पर्यावरणीय भूगोल : परिस्थितीविज्ञान व परिस्थितिक व्यवस्था - ऊर्जा प्रवाह, वस्तू, अन्न शृंखला व वेब्ज, पर्यावरणीय अवनती व संवर्धन, जागतिक परिस्थितिक असमतोल - प्रदूषण व हरितगृह परिणाम, हरितगृह परिणामातील कार्बन डायऑक्सीड व मिथेनची भूमिका, जागतिक तापमानातील वाढ, जैविविधेतील घट आणि वनांचा ऱ्हास, पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे व पर्यावरण प्रभावाचे परीक्षण, क्योटो प्रोटोकॉल व कार्बन क्रेडिट्स, शहरी कचरा व्यवस्थापन, सागरी संरक्षित क्षेत्र, व सागरी संरक्षित क्षेत्र दोन

भूगोल व कृषी 

* कृषी परिस्थितीकी - कृषी परिस्थितीकी व त्याचा मानवाशी, नैसर्गिक साधनसंपत्तीशी संबंध, त्याचे कायमस्वरूपी व्यवस्थापन व संवर्धन, पीक वितरण व उत्पादनाचे घटक म्हणून प्राकृतिक व सामाजिक पर्यावरण, पीक वाढीचे घटक म्हणून हवामान घटक, पर्यावरणीय प्रदूषण व पिके, प्राणी व मानव यांच्या संबंधातील धोके.

* हवामान - वातावरण,रचना-संरचना, सौर उत्सर्जन व उष्मा समतोल, हवामानाचे घटक - तापमान, वायुदाब, ग्रहीय व स्थानिक वारे, मान्सून, वायुराशी, आणि पुरोभाग व चक्रीवादळे व अवर्षण व पूर व हवामान प्रदेश, महाराष्ट्रातील पर्जन्यवृष्टीचे वितरण व अभिक्षेत्रीय व कालिक परिवर्तनशीलता - महाराष्ट्रातील कृषी हवामान क्षेत्रे - अवर्षण व टंचाईची समस्या महाराष्ट्राच्या विविध कृषी हवामान क्षेत्रातील पीक प्रारूप, बहुविध पीक लागवडीची संकल्पना व आंतर पीक लागवड, व त्याचे महत्व, सेंद्रिय शेतीची आधुनिक संकल्पना, वर्धनक्षम कृषी.

* मृदा - मृदा, प्राकृतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म, मृदा तयार होण्याची प्रक्रिया व घटक खनिजे, आणि मातीचे सेंद्रिय घटक, आणि मातीची उत्पादकता कायम ठेवण्यामधील त्यांची भूमिका, मातितीतील व त्या लागवडीसाठीचे पोषक घटक आणि इतर लाभदायक घटक, आणि समस्याग्रस्त जमिनी व त्या लागवडी योग्य करण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातील मृदा अपक्षरन व जमीन ओसाड होण्याच्या समस्या, जल विभागजकच्या आधारे मृदा संधारण यांचे नियोजन करणे, डोंगराळ व डोंगराच्या पायथ्याशी धूप व पृष्ठवाह व्यवस्थापन, त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या कार्यपद्धती व घटक.

* जल व्यवस्थापन : सद्याची परिस्थिती, जल संधारनाच्या पद्धती, पाण्याच्या गुणवत्तेची मानके, भारतातील नद्यांची अंतरजोडणी करणे, पावसाचे पाणी साठवून ठेवण्याच्या पारंपरिक व अपारंपरिक पद्धती, भूजल व्यवस्थापन तांत्रिक व सामाजिक बाबी, कुत्रिम भूजल पुनर्भरणाच्या पद्धती, पाणलोट क्षेत्राची संकल्पना, व पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन, कोरडवाहू जमिनीतील शेती व त्यातील समस्या, पीक उत्पादनांबाबत पाणी वापराची क्षमता, जल सिंचनाचे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी करण्याच्या उपाययोजना, ठिबक व तुषार सिंचन, पाणथळ मृदेचे जलनिस्सारण, कारखान्यातील दूषित पाण्याचा जमीन व पाण्याचा यावर होणारा परिणाम.

३] पेपर ४ [ सामान्य अध्ययन - पेपर २  ] - हा पेपर १५० गुणांसाठी असेल, प्रश्न संख्या १५०, दर्जा पदवी, माध्यम मराठी व इंग्रजी, वेळ २ तास, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असेल. पेपर ४ - GS - २ करिता अभ्यासक्रम खालील प्रकारे असेल.

सामान्य अध्ययन - पेपर २ [भारतीय संविधान व भारतीय राजकारण - महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह  व कायदा] अभ्यासक्रम -

टीप - १] प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तरे देऊ शकेल आणि विविध विषयातील उमेदवाराच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे.

२] उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयातील उपविषयातील अद्ययावत आणि चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.  

* भारताचे संविधान - संविधान निर्मिती प्रक्रिया, संविधानाची ठळक वैशिष्ट्ये, उद्देशिकेतील तत्वज्ञान [ धर्मनिरपेक्ष, लोकशाही, आणि समाजवादी] मूलभूत अधिकार व कर्त्यव्ये, राज्य धोरणाची निर्देशित तत्वे, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, सामायिक नागरी संहिता, आणि मूलभूत कर्तव्ये, केंद्र राज्य संबंध, आणि नवीन राज्याची निर्मिती, स्वतंत्र न्यायव्यवस्था, सुधारणेची प्रक्रिया, आणि संविधानातील प्रमुख सुधारणा, संविधानाचा अर्थ लावताना, वापरण्यात आलेले ऐतिहासिक न्यायनिर्णय, प्रमुख आयोग आणि मंडळाची रचना आणि कार्ये, निवडणूक आयोग, संघराज्य आणि राज्य लोकसेवा आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, मानवी हक्क अयोग, राष्ट्रीय अल्पसंख्यांक अनुसूचित आयोग, अनुसूचित जमाती आयोग, नदी पाणी विवाद निवारण मंडळ. 

* राजकीय यंत्रणा [शासनाची रचना,अधिकार व कार्ये] - भारतीय संघराज्याचे स्वरूप, संघराज्य व राज्य, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, व न्याययंत्रणा, केंद्र मंडळ - न्यायमंडळ, केंद्र राज्य संबंध प्रशासकीय, कार्यकारी व वित्तीय संबंध, वैधानिक अधिकार, विषयांचे वाटप.
१] केंद्र सरकार - केंद्रीय कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, व मंत्रिमंडळ, भारताचा महाधिवक्ता, भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक
२] केंद्रीय विधिमंडळ - संसद, सभापती व उपसभापती, संसदीय समित्या, कार्यकारी मंडळावरील संसदेचे नियंत्रण.
३] न्यायमंडळ - न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ, कार्ये, सर्वोच्च न्यायालय, व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये, लोकपाल, लोकायुक्त, आणि लोक न्यायालय, संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.

* राज्य सरकार व प्रशासन [ महाराष्ट्राच्या विशेष संदर्भसह ] - महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि पुनर्रचना, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, मुख्य सचिव, राज्य सचिवालय, संचानालय, विधानसभा, विधानपरिषद, अधिकार व कार्ये, व भूमिका, विधिमंडळ समित्या, मुंबईचा नागरपाल शेरीफ.
४] जिल्हा प्रशिक्षण - जिल्हा प्रशासनाचा विकास, जिल्हा दंडाधिकाऱ्याची बदलती भूमिका, कायदा व सुव्यवस्था, कार्यकारी विभागाबरोबरचे संबंध, जिल्हा प्रशासन व पंचायत राज संस्था, उपविभागीय अधिकाऱ्याची भूमिका व कार्ये.

* ग्रामीण आणि नागरी शासन : ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीने महत्व, स्थानिक प्रशासनाचे सबलीकरण व विकासातील त्यांची भूमिका.
ग्रामीण स्थानिक शासन - जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि ग्रामपंचायतीची रचना, अधिकार व कार्ये, महाराष्ट्रातील पंचायत राज संस्थेची खास व्यवस्थेची वैशिट्ये पंचायत राज संस्थांच्या स्थितीचा अहवाल, व त्यांच्या कामगिरीचे मूल्यन, ७३ व्या घटनादुरुस्ती महत्वाची वैशिष्ट्ये, अंमलबजावणी अडचणी, प्रमुख ग्रामीण विकास कार्यक्रम आणि त्यांचे व्यवस्थापन.
नागरी स्थानिक शासन - महानगपालिका, नगरपरिषद, आणि कटक मंडळाची रचना व कार्ये, रचना, अधिकारी, साधन संपत्ती, अधिकार कार्ये आणि नियंत्रण, ७४ व्या घटनादुरुस्तीची महत्वाची वैशिष्ट्ये अंमलबजावणीतील समस्या, प्रमुख नागरी विकास नागरी कार्यक्रम.

* शिक्षण पद्धती : राज्य धोरण व शिक्षण याविषयीची निर्देशित तत्वे, वंचित घटक - अनुसूचित जाती, जमाती, मुस्लिम व महिला, यांचे शिक्षणविषयक, प्रश्न शिक्षणाचे खाजगीकरण - शिक्षणाच्या प्रांतात प्रवेश, गुणवत्ता, दर्जा, व सामाजिक न्याय, यासंबंधीचे मुद्दे, सेवांतर्गत व्यवसाय संबंधात सामान्य करार, आणि नवीन उद्भवणारे मुद्दे, उच्च शिक्षणातील आजची आव्हाने, सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षा अभियान.

* पक्ष आणि दबाव गट - पक्ष पद्धतीचे स्वरूप, राष्ट्रीय पक्षांची भूमिका - विचारप्रणाली, संघटन, व निवडणुकीतील कामगिरी, राजकीय पक्ष व त्यांचे सामाजिक अधिष्ठान. प्रादेशिकवाद, प्रादेशिक पक्षांचा उदय विचारप्रणाली, संघटन, व निवडणुकीतील कामगिरी, महाराष्ट्रातील प्रमुख दबाव गट, हितसंबंधित गट, त्यांची भूमिका व धोरण, निर्धारावर त्यांचा होणारा परिणाम, महाराष्ट्रातील समाज कल्याण कार्यक्रम, महिला व बालक, कामगार व युवक, अशासकीय संस्था, व समाज कल्याणमधील त्यांची भूमिका.

* प्रसार माध्यमे - मुद्रण व इलेक्ट्रिक प्रसार माध्यमे, धोरण निर्धारावर त्यांचा होणारा परिणाम, जनमत तयार करणे व लोकजागृती करणे, भारतीय वृत्तपत्र परिषद [ प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ] भारतासारख्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीमधील जनसपंर्क प्रसारमाध्यमासाठी आचारसंहिता, मुख्य प्रवाहातील जनसंपर्क प्रसारमाध्यमातील महिलांचा सहभाग, वस्तुस्थिती व मानके, भाषण व अभिव्यक्ती, स्वातंत्र्य आणि त्यावरील मर्यादा.

* निवडणूक प्रक्रिया - निवडणूक प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये, एक सदस्यीय प्रादेशिक मतदारसंघ, दुर्बल घटकाकरिता राखीव मतदार संघ, प्रौढ मताधिकार, निवडणूक आयोगाची भूमिका, सार्वत्रिक निवडणूका, प्रमुख कल, मतदान वर्तनाचे स्वरूप, आणि मतदान वर्तनावर प्रभाव पाडणारे घटक, खुल्या व निःपक्ष वातावरणात निवडणूका घेण्यातील समस्या व अडचणी - निवडणूकविषयक सुधारणा, इलेक्ट्रिक मतदान यंत्रे.

* प्रशासनिक कायदा - कायद्याचे राज्य, प्रशासकीय स्वेच्छानिर्णय आणि त्याचे नियंत्रक व न्यायिक आढावा, प्रशासनिक न्यायाधिकरने, त्यांची स्थापना व कार्यशीलता, नैसर्गिक न्यायाची तत्वे.

* केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे विशेषाधिकार - भारतीय साक्षीपुरावा, अधिनियमाचे कलम, शासकीय गुपितेअधिनियम माहितीचा अधिकार त्यांचा होणार परिणाम.

* काही सुसंबद्ध कायदे - पर्यावरण संरक्षण कायदे १९८६, ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६, माहितीचा अधिकार नियम २००५, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, अनुसूचित जाती व जमाती कायदा, नागरी संरक्षण हक्क कायदा १९५५,

* समाज कल्याण व सामाजिक विधिविधान - सामाजिक बदलाचे साधन म्हणून सामाजिक विधिविधान, मानवी हक्क, भारताचे संविधान व फौजदारी कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता, घरगुती हिंसाचार [प्रतिबंध] अधिनियम, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती [ अत्याचार प्रतिबंधक ] अधिनियम, १९८९ आणि माहितीचा अधिकार, २००५ अंतर्गत महिलांना संरक्षण.

* सार्वजनिक सेवा - अखिल भारतीय सेवा, संविधानिक दर्जा, भूमिका व कार्ये, केंद्रीय सेवा, स्वरूप व कार्ये, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य सेवा व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग, शासन व्यवहाराचा बदलत्या संदर्भात प्रशिक्षण - यशदा, लाल बहादूर शास्त्री, प्रशासन अकेडमी, सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रीय पोलीस अकादमी.

* सरकारी खर्चावर नियंत्रण - संसदीय नियंत्रण, अंदाज समिती, लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रमावरील समिती, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक [कॅग] यांचे कार्यालय, पैसा विषयक व राजकोषीय धोरणातील वित्त मंत्रालयाची भूमिका, महालेखापाल, महाराष्ट्र यांची रचना व कार्य.


३] पेपर ५ [ सामान्य अध्ययन - पेपर ३  ] - हा पेपर १५० गुणांसाठी असेल, प्रश्न संख्या १५०, दर्जा पदवी, माध्यम मराठी व इंग्रजी, वेळ २ तास, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असेल. पेपर ५ - GS - ३ करिता अभ्यासक्रम खालील प्रकारे असेल.

सामान्य अध्ययन - पेपर ५ [मानव संसाधन विभाग व मानवी हक्क ] अभ्यासक्रम -

टीप - १] प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तरे देऊ शकेल आणि विविध विषयातील उमेदवाराच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे.

२] उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयातील उपविषयातील अद्ययावत आणि चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

मानव संसाधन विभाग 

* भारतातील मानव संसाधन विकास - भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती, संख्यात्मक स्वरूप, आकारमान आणि वाढ, लिंग, वय, नागरी, आणि ग्रामीण, आणि गुणात्मक स्वरूप, शिक्षण व आरोग्यविषयक काळजी, लोकसंख्याविषयक धोरण व २०५० पर्यंतच्या योजना, आधुनिक समाजातील मानव संसाधन नियोजनाचे महत्व आणि गरज, मानव संसाधन योजनांमध्ये अंतर्भूत असलेले घटक आणि कारणीभूत गोष्टी, भारतातील बेरोजगारीचे स्वरूप, प्रकार आणि समस्या, भारतातील सेवायोजनेचा कल, विभिन्न विभागातील व क्षेत्रातील व कुशल कामगारांचे मागणी दर, मनुष्यबळ विकासाकरिता कार्यरत असलेल्या शासकीय व स्वयसेवी संस्था NCERT, NIEPA, विद्यापीठ अनुदान आयोग, UGC, मुक्त विद्यापीठे, AICTE, NCTE, ITI, NCVT, IMC, इत्यादी मानव संसाधन विकासाशी संबंधित समस्या आणि बाबी, शासनाचे नोकरीविषयक धोरण, बेरोजगारी आणि न्यून बेरोजगारी, कमी करण्यासाठी विविध योजना.

* शिक्षण - मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार, भारतातील पूर्व प्राथमिक ते उच्च प्राथमिक शिक्षण प्रणाली, शिक्षणाचे सार्वत्रीकरण, शिक्षणाचे व्यावसायिकरण, दर्जावाढ, गळतीचे प्रमाण, समस्या व प्रश्न, मुलींकरिता शिक्षण, सामाजिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या गरीब वर्ग, अधू, अल्पसंख्यांक, कौशल्य, शोध, इत्यादी, शासनाची शैक्षणिक धोरणे, योजना व कार्यक्रम, अनौपचारिक, औपचारिक आणि प्रौढ शिक्षणाचा प्रसार विनियमन आणि सनियंत्रण करणाऱ्या शासकीय व स्वयंसेवी संस्था, ई - अध्ययन, जागतिकीकरण आणि खाजकीकरण याचा भारतातील शिक्षणावरील परिणाम, राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय उच्च शिक्षण संशोधन आयोग, आयआयटी,आयआयएम, एनआयटी.

* व्यावसायिक शिक्षण - मानव संसाधन विकासाचे साधन म्हणून व्यावसायिक शिक्षणाचा विचार, व्यवसायिक\तंत्र शिक्षण, भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील सद्यस्थिती, शिक्षणप्रणाली व प्रशिक्षण, शासकीय धोरणे, योजना व कार्यक्रम समस्या, प्रश्न व त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न, व्यवसायिक आणि तंत्र शिक्षनाचा प्रसार, विनियमन करणाऱ्या आणि अधिस्वीकृती देणाऱ्या संस्था.

* आरोग्य - मानव संसाधन विकासाचा अत्यावश्यक आणि प्रमुख घटक म्हणून आरोग्याचा विचार, जीवनविषयक आकडेवारी, जागतिक आरोग्य संघटना - उद्देश, रचना, कार्ये व कार्यक्रम, भारतामध्ये शासनाची आरोग्यविषयक धोरणे,
योजना आणि कार्यक्रम, आरोग्य विषयक धोरणे, योजना आणि कार्यक्रम, आरोग्य विषयक काळजी घेणारी यंत्रणा, आरोग्याशी संबंधित समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी करावयाचे प्रयत्न, जननी बाल सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान.

* ग्रामीण विकास - पंचायत राजव्यवस्थेला अधिकार प्रदान करणे, ग्राम पंचायत आणि ग्रामविकासातील तिची भूमिका, जमीन सुधारणा व विकास, ग्रामविकासातील सहकारी संस्थांची भूमिका, ग्रामविकासामध्ये अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्था, ग्रामीण रोजगार योजना, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत विकास उदा - ऊर्जा, परिवहन, गृहनिर्माण व दळणवळण, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना.

मानवी हक्क 

* जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र [युडीएचार १९४८] - मानवी हक्काची आंतरराष्ट्रीय मानके, त्याचे भारताच्या संविधानातील प्रतिबिंब, भारतात मानवी हक्क राबविण्याची आणि त्याचे संरक्षण करण्याची यंत्रणा, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित असलेल्यांच्या समस्या जसे गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी, सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक प्रथा, हिंसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, हवालातील गुन्हेगारी, इत्यादी, लोकशाही चौकटीत मानवी हक्क आणि मानवी सभयतेचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज, जागतिकीकरण आणि त्याचा विभिन्न क्षेत्रातील परिणाम, मानवी विकास निर्देशांक, बालमृत्यू प्रमाण, लिंग गुणोत्तर.

* बाल विकास - समस्या व प्रश्न, अर्भक मृत्युसंख्या, कुपोषण बाल कामगार, मुलांचे शिक्षण, शासकीय धोरणे, कल्याण योजना, आणि कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय, अभिकरने, स्वयंसेवी संघटना, सामूहिक साधने यांची भूमिका, लोककल्याणामध्ये लोकांचा सहभाग.

* महिला विकास - समस्या व प्रश्न, स्त्री-पुरुष असमानता, महिलाविरोधी हिंसाचार, स्त्री अर्भक हत्या, स्त्री भ्रूण हत्या, महिलांचे सबलीकरण इत्यादी, शासकीय धोरण, विकास\कल्याण व सबलीकरण यासाठीच्या योजना व कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांची भूमिका व सामूहिक साधने, लोकविकासामध्ये लोकांचा सहभाग, आशा.

* युवकांचा विकास - समस्या व प्रश्न बेरोजगारी, असंतोष, अंमली, पदार्थांचे सेवन, शासकीय धोरण, व विकास,आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांची भूमिका व सामूहिक साधने, लोकविकासामध्ये लोकांचा सहभाग.

* आदिवासी विकास - समस्या व प्रश्न बेरोजगारी, कुपोषण, अलिप्तता, एकात्मीकरण व विकास आदिवासी चळवळ,  शासकीय धोरण,विकास,आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांची भूमिका व सामूहिक साधने, लोकविकासामध्ये लोकांचा सहभाग.

* सामाजिक वंचित वर्गाचा विकास - समस्या व प्रश्न, संधीतील असमानता शासकीय धोरण,विकास,आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांची भूमिका व साधन संपत्ती संघटित करून कामी लावणे व सामूहिक सहभाग.

* वयोवृद्ध लोकांचे कल्याण - समस्या व प्रश्न, शासकीय धोरण,विकास,आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांची भूमिका, वयोवृद्ध लोकांसाठी सामूहिक प्रयत्न, विकासविषयक कार्यक्रमामध्ये त्यांच्या सेवांचे उपयोजन.

* कामगार कल्याण - समस्या व प्रश्न, [कामाची स्थिती, मजुरी, आरोग्य आणि संघटित व असंघटित क्षेत्राशी संबंधित समस्या] शासकीय धोरण,विकास,आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांची भूमिका.

* विकलांग व्यक्तीचे कल्याण - समस्या व प्रश्न, [शैक्षणिक रोजगार, संधी यामधील असमानता इत्यादी] शासकीय धोरण,विकास,आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांची भूमिका.

* लोकांचे पुनर्वसन - कार्यतंत्र धोरण व कार्यक्रम - कायदेविषयक तरतुदी, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, मानसशात्रीय, इत्यादी निरनिराळया पैलूवर विचार.

* आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना - संयुक्त राष्ट्रे, आणि तिची विशेषकृत अभिकरने, UNCTAD, UNDP, ICJ, ILO, UNSEF, UNCHR, EU,OPEC, ASIAN,APEK, OU, SAARC, NAAM, राष्ट्रकुल राष्ट्रे [ कॉमन वेल्थ नेशन्स ], युरोपियन युनियन.

* ग्राहक संरक्षण - विद्यमान विधिनियमची ठळक वैशिष्ट्ये - ग्राहकांचे हक्क, ग्राहक विवाद, व निवारण यंत्रणा, मंचाचे निरनिराळे प्रकार, उद्दिष्ट्ये, अधिकार, कार्ये, कार्यपद्धती, ग्राहक कल्याण निधी.

* मूल्ये व नीतितत्वे - कुटुंब, धर्म, शिक्षण, प्रसारमाध्यमे, इत्यादी सारख्या, औपचारिक व अनौपचारिक, संस्थामार्फत सामाजिक मानके, मूल्ये, नीतितत्त्वे यांची जोपासना करणे.

३] पेपर ६ [ सामान्य अध्ययन - पेपर ४  ] - हा पेपर १५० गुणांसाठी असेल, प्रश्न संख्या १५०, दर्जा पदवी, माध्यम मराठी व इंग्रजी, वेळ २ तास, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असेल. पेपर ६ - GS - ४ करिता अभ्यासक्रम खालील प्रकारे असेल.

सामान्य अध्ययन - पेपर ४ [अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास ] अभ्यासक्रम -
टीप - १] प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तरे देऊ शकेल आणि विविध विषयातील उमेदवाराच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे.

२] उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयातील उपविषयातील अद्ययावत आणि चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

अर्थव्यवस्था व विकास 

* भारतीय अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्थेतील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी, व प्रादेशिक असमतोल, नियोजन: प्रक्रिया प्रकार, भारताच्या पहिल्या दहाव्या पंचवार्षिक योजनांचा आढावा, मूल्यमापन, विकासाचे सामाजिक आर्थिक निदर्शक, राज्य व स्थानिक स्तरावरील नियोजन, विकेंद्रिकरण - संविधानिक ७३ वि व ७४ वि सुधारणा.

* नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास - गरजा व महत्व, ऊर्जा, पाणीपुरवठा व स्वछता, गृहनिर्माण, परिवहन रस्ते, बंदरे, संसुचना, टपाल व तारयंत्र दूरसंचार, रेडिओचे नेटवर्क, दूरचित्रवाणी, इंटरनेट महाजाल अशा सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांची वाढ व विकास, भारतातील पायाभूत सुविधांशी संबंधित पेचप्रसंग व समस्या, धोरण, पर्यायी सरकारी - खाजगी क्षेत्रातील भागीदारी [पीपीपी], भारतीय वित्त विकास व पायाभूत सुविधांचा विकास - पायाभूत सुविधांच्या विकासाचे खाजगीकरण, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारची व  राज्य शासनाची धोरणे, परिवहन व गृहनिर्माण [नागरी व ग्रामीण] समस्या केंद्र सरकारचे व राज्य  शासनाची धोरणे, परिवहन व गृहनिर्माण, नागरी व ग्रामीण समस्या केंद्र सरकारचे व राज्य शासनाचे उपक्रम व कार्यक्रम, बीओएलटी [ बांधा वापरा भाड्याने द्या व हस्तांतरित करा ] योजना.

* उद्योग - गरजा - आर्थिक व सामाजिक विकासात उद्योगाचे महत्व व भूमिका वाढीचा आकृतिबंध, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात भारतातील मोठ्या उद्योगाची संरचना, लघुउद्योग, कुटीरउद्योग व ग्रामोद्योग, त्यांच्या समस्या व व दृष्टीकोन, शिथिलीकरण, खाजगीकरण, व जागतिकीकरण यांचे लघुउद्योगावरील परिणाम, लघुउद्योगांचा विकास, प्रचालन व सनियंत्रण याकरिता महाराष्ट्राचे धोरण, उपाययोजना व कार्यक्रम, लघुउद्योग व कुटीर उद्योग यांची निर्माण संभाव्यता, विशेष आर्थिक क्षेत्र SEZ, SGVS.

* सहकार - सहकारी संकल्पना, अर्थ, समुदीष्ट, जुनी व नवीन तत्वे, भारतातील सहकाराची वाढ व विविधीकरण, महाराष्ट्रातील सहकारी संस्था - प्रकार, भूमिका, महत्व व विविधीकरण, राज्यधोरण व सहकार क्षेत्र, विधानमंडळ, पर्यवेक्षण, लेखापरीक्षण व सहायय, महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या समस्या, जागतिक स्पर्धेच्या युगात, सहकारी संस्थांचे भवितव्य, महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा आढावा, सुधारणा व भवितव्य, कृषी पणन यातील पर्यायी धोरणविषयक व उपक्रमशीलता - रोजगार हमी योजना.

* आर्थिक सुधारणा - पार्शवभूमी, शिथिलीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, [ संकल्पना, व्याप्ती, अर्थ, व मर्यादा ], केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, जागतिक व्यापार संघटनेची मुदत, तरतुदी व त्याची अंमलबजावणी, आणि अर्थव्यवस्थेतील त्याचा परिणाम व समस्या.

* आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ - जागतिकीकरणाच्या युगात उदयास आलेला कल, भारतीय जागतिक व्यापाराची वाढ, रचना व निर्देश, भारताचे विदेशी व्यापार धोरण, निर्मितीचे प्रचालन, जागतिक व्यापार संघटना व आंतरराष्ट्रीय व्यापार - विदेशी भांडवल, आंतर्देशी प्रवाह, रचना व वाढ एफडीआय, [ भारतीय वित्त विकास ], ई वाणिज्य, बहुराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वित्तव्यवस्था, अभिकरणांची भूमिका[ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय विकास अभिकरण, आंतरराष्ट्रीय पत आकारणी.

* गरिबीचे निर्देशांकण व अंदाज - दारिद्य्र रेषा संकल्पना व वस्तुस्थिती, दारिद्ररेषखालील दारिद्र्य निर्मूलनाच्या उपाययोजना- भारतातील जननक्षम, विवाहदर, मृत्युसंख्या, व रोगटपणा, लिंग सक्षमीकरण धोरण.

* रोजगार निर्धारणाचे घटक - बेरोजगारीसंबंधी उपाययोजना, उत्पन्न व दारिद्र्य व रोजगार यांच्यामधील संबंध - वितरणाससंबंधात प्रश्न व सामाजिक न्याय.

* महाराष्ट्राची अर्थव्यवस्था : कृषी, उद्योग, सेवा, क्षेत्राची, ठळक वैशिष्ट्ये, महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण.

विकास व कृषी यांचे अर्थशास्त्र 

* समष्टी अर्थशास्त्र - राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनाच्या पद्धती, पैशाची कार्ये, आधार पैसा, जननक्षम पैसा, पैशाचा संख्या सिद्धांत, पैसा गुणक, चलनवाढीचे पैसाविषयक व पैशाव्यतिरिक्त सिद्धांत. चलनविषयक नियंत्रण, चलनविषयक आर्थिक आणि थेट उपाययोजना.

* सार्वजनिक वित्तव्यवस्था आणि वित्तीय संस्था - पणन अर्थव्यवस्थेचे सार्वजनिक वित्तव्यवस्थेची भूमिका - सरकारी गुंतवणुकीचे निकष गुण वस्तू व सार्वजनिक वस्तू, महसुलीचे स्रोत व खर्च [ केंद्र व राज्य ], करांचे स्वरूप व अर्थसहाय्य आणि त्याचा भार व परिणाम - केंद्राचे व राज्यातील कर, करेतर सरकारी ऋण, सरकारी खर्च वाढ व त्याची कारणे, सरकारी खर्च सुधारणा, कामगिरी आधारित अर्थसंकल्पन, शून्याधारित अर्थसंकल्प, अर्थसंकल्पीय तुटीचे प्रकार, देशांतर्गत व देशाबाहेरील कर्ज, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील कर सुधारणांचे पुनर्वलोकन, मूल्यवर्धित कर, सरकारी ऋण वाढ, रचना व भार, केंद्राला असणारी राज्याची कर्जाची समस्या, राजकोषीय तूट, तुटीची संकल्पना आणि नियंत्रण, केंद्र राज्य व भारतीय रिझर्व्ह बँकेचा पुढाकार, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्य स्तरावरील आढावा, वित्तीय क्षेत्र सुधारणा, बँकिंग क्षेत्रातील नवीन प्रवाह, खरेखुरे व नाममात्र व्याजदर, रेपो आणि प्रतिकूल रेपो दर.

* वाढ व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र - विकास निदर्शक - सातत्यपूर्ण विकास, विकास व पर्यावरण, हरित स्थूल, देशांतर्गत उत्पन्न, आर्थिक  विकासाचे घटक - नैसर्गिक साधनसंपत्ती, लोकसंख्या, मानवी भांडवल, पायाभूत सुविधा, लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाचा सिद्धांत, मानवी विकास निर्देशांक, मानवी दारिद्र्य निर्देशांक, लिंग सक्षमीकरण उपाययोजना, वाढीमधील विदेशी भांडवलाची आणि तंत्रज्ञानाची भूमिका, बहुराष्ट्रीय महामंडळे, वाढीचे इंजिन म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, आयएमएफ, आयबीआरडी, डब्ल्यूटीओ, प्रादेशिक व्यापार करारनामा, सार्क.

* भारतीय कृषीव्यवस्था - १] आर्थिक विकासातील कृषीक्षेत्राची भूमिका, कृषी उद्योग, व सेवाक्षेत्रे, यांच्यामधील आंतरसंबंध, कंत्राटी शेती, ठराविक शेती, औद्योगिक शेती, सेंद्रिय शेती. २] धारण केलेल्या जमिनीचा आकार आणि उत्पादकता - हरित क्रांती, व तंत्रविषयक बदल, कृषीविषयक किमती, आणि व्यापाराच्या अटी, शेतीला अर्थसहाय्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था - अन्नसुरक्षा. ३] भारतातील कृषी उत्पन्न वाढीतील प्रादेशिक तफावत, कृषीविषयक धंदा व जागतिक तफावत, भारतातील कृषीविषयक पतवारी. ४] पाटबंधाऱ्यांची साधने व जल व्यवस्थापन, पशुसंपत्ती व त्यांची उत्पादकता, भारतातील व महाराष्ट्रातील धवलक्रांती. ५] योजना कालावधीमधील ग्रामीण विकासाची धोरणे, ग्रामीण पायाभूत सोयी, सामाजिक व आर्थिक. ६] जागतिक व्यापार संघटना व शेती, शेतकऱ्यांचे व पैदासकारांचे हक्क, जैवविविधता, जीएम तंत्रज्ञान, कृषी बाजारपेठेतील गॅट, जागतिक व्यापार संघटना चा अपेक्षित भार. ७] शेतीसाठी लागणारे साहित्य व उत्पादन यांचे विपणन व मूल्यांकन, किमतीतील चढउतार आणि त्यांच्या किमती, कृषी अर्थव्यवस्थेतील सहकारी संस्थांची भूमिका.

कृषी 

* राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्व - कमी उत्पादकतेची कारणे, कृषीविषयक उत्पादन व जमीन सुधारणा व जमिनीचा वापर, मृद व जलसंधारण, पर्जन्याश्रयाची शेती, यासारख्या विकासकामाकरिता सिंचन, आणि त्याच्या पद्धती शेतीचे यांत्रिकीकरण आयसीएचआर, एमसीएचआर यांची भूमिका.

* ग्रामीण कर्जबाजारीपणा, कृषी पतवारीची समस्या - गरज व महत्व व त्यात गुंतलेल्या वित्तीय संस्था, नाबार्ड व भूविकास बँक, कृषी किंमत घट, विविध कृषी उत्पादनावर परिणाम करणारे घटक, विविध कृषी विषयक उत्पादने यांच्या शासकीय आधारभूत किमती, अर्थसहाय्य, कृषी पणन सद्यस्थिती, मूल्यवर्धित उत्पादने, शासनाची भूमिका आणि कृषी पणनातील त्यांच्या संस्था एपीसी एपीएमसी.

* अन्न व पोषण आहार - भारतातील अन्न उत्पादन व खप यामधील कल पहिली व नंतर घडवणारी दुसरी हरित क्रांती, अन्न स्वावलंबन, अन्न सुरक्षितेमधील समस्या, साठवणुकीतील समस्या व प्रश्न, प्रापण, वितरण, अन्नाची आयात व निर्यात, अन्नाचे कॅलरी मूल्य व त्याची मोजणी, चांगले आरोग्य व समतोल आहारासाठी मानवी शरीरास आवश्यक असलेली ऊर्जा व पोषण मूल्य भारतातील नेहमीच्या पोषणविषयक समस्या आणि त्याची कारणे व परिणाम, शासनाची धोरणे, योजना व पीडीस यासारखे कार्यक्रम, कामासाठी अन्न, दुपारचे भोजन योजना व इतर पोषणविषयक कार्यक्रम, प्रस्तावित अन्न सुरक्षा अधिनियम.

* भारतीय उद्योग पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र - कल, उद्योगाची वाढ व रचना, भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्र व सेवा क्षेत्र, लोकांची भूमिका, भारतातील खाजगी व सहकारी क्षेत्र - लघुउद्योग व कुटीरउद्योग आणि बीपीओ. भारतीय उद्योगधंद्यामधील उदारमतवाद आणि त्याचे परिणाम - उद्योगातील आजारीपण.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास

* ऊर्जा - पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा साधने - सौर, वारा, जैववायू, जीववस्तुमान, भूऔष्णिक, व इतर नवीनीकरणयोग्य ऊर्जा साधनांची संभाव्यता, सौर साधनेच म्हणजेच सौर कुकर, पाणी तापक नव्याने सुरवात, जैविक तत्वे व प्रक्रिया, ऊर्जा संकटाची समस्या, शासकीय धोरणे आणि वीज निर्मितीसाठी कार्यक्रम, अणुशक्ती कार्यक्रम, औष्णिक वीज कार्यक्रम, जलविद्युत कार्यक्रम, वीज वितरण व राष्ट्रीय विद्युत पुरवठा, ऊर्जा सुरक्षा, संशोधन व विकास यात गुंतलेली अभिकरने व संस्था.

* संगणक व माहिती तंत्रज्ञान - आधुनिक समाजातील संगणकातील भूमिका आणि देवाणघेवाण, नेटवर्किंग व वेबतंत्रद्यान यासारख्या जीवनाच्या विविध क्षेत्रामधील त्याचे उपायोजन, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, विविध सेवांमधील माहिती तंत्रज्ञानचा वापर, मीडिया लॅब आशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, कम्युनिस्ट माहिती केंद्र, सारखे शासकीय कार्यक्रम, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील महत्वाचे प्रश्न, त्यांचे भवितव्य.

* अवकाश तंत्रज्ञान - भारतीय अवकाश तंत्रज्ञान, दूरसंचार, दूरदर्शन, शिक्षण, प्रसारण, हवामान,जीपीएस, आपत्ती, इशारा याकरिता भारतीय कुत्रिम उपग्रह, भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रम, सुदूर संवेदना, भौगोलिक माहिती यंत्रणा, जीआयएस, आणि हवामान अंदाज, आपत्ती इशारा यांचे उपाययोजन, मृदा, जल, खनिज संपत्ती विकास, कृषी व मत्स्य विकास, नागरी नियोजन, परिस्थिती अभ्यासक्रम, भौगोलिक यंत्रणा, व भौगोलिक माहिती यंत्रणा.

* जैव तंत्रज्ञान - कृषी, औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीद्वारे मानवी जीवन व राष्ट्रीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी संभाव्य शक्यता, नैसर्गिक साधनसंपत्ती विकासाचे साधन म्हणून जैवतंत्रद्यान उपयोजनाची क्षेत्रे कृषी पशु पैदास व पशुवैद्यकीय आरोग्य केंद्र, औषधनिर्माण विद्या, मानवी आरोग्य केंद्र, अन्न तंत्रज्ञान, ऊर्जा निर्मिती, पर्यावरण संरक्षण, जैवतंत्रज्ञानाबाबत प्रचालन, नियमन व विकास यामधील शासनाची भूमिका व प्रयत्न, जैवतंत्रज्ञानाच्या विकासाशी संबंधित नैतिक, सामाजिक कायदेशीर प्रश्न, जैवतंत्रद्यान विकासाचे प्रयत्न शक्य व प्रतिकूल प्रयत्न, बियाणे तंत्रज्ञान, त्याचे तंत्रज्ञान व बियाणाची गुणवत्ता, बियाणांचे विविध प्रकार आणि त्यांचे बियाणे उत्पादन व प्रतिकूल व प्रक्रिया तंत्रे, बी टी कापूस, बी टी वांगी.

* भारताचे आण्विक धोरण - ठळक वैशिट्ये, ऊर्जेचा स्रोत म्हणून अणुऊर्जा आणि स्वछ ऊर्जा म्हणून त्याचे महत्व आण्विक टाकाऊ कचऱ्यांची समस्या, भारतातील औष्णिक वीज निर्मिती, एकूण वीज निर्मितीमधील त्यांचे अंशदान, आण्विक चाचणी निर्धारके, पोखरण दोन न्यूक्लिअर नॉन, प्रोलिफिकेशन ट्रिएट्री काँप्रेहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रीटरी यासारख्या आण्विक धोरणाचा कल, २००९ चा इंडो न्यूक्लिअर करार.

* आपत्ती व्यवस्थापन - आपत्तीची व्याख्या, स्वरूप, प्रकार, वर्गीकरण, नैसर्गिक धोके, कारणीभूत घटक ते सौम्य करणारी उपाययोजना, पूर, भूकंप, त्सुनामी करणारी उपायोजना, किल्लारी १९९३, भुज २००१, सिक्कीम नेपाळ २०११, भूकंप तसेच बंदा आले २००४, फुकुशिमा २०११ जपान, भूकंप त्सुनामी या प्रकरणाचा अभ्यास, २००५ मधील मुंबईतील पूर, डिसेंबर १९९३, २००६-२००९,२०११ चे बॉम्बस्फोट व अतिरेकी हल्ले व त्याचा परिणाम.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.