सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

MPSC राज्यसेवा सराव प्रश्नपत्रिका - ६

MPSC राज्यसेवा सराव  प्रश्नपत्रिका - ६

१] इतक्यात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याने जगभरात खळबळ उडाली.
१] हायड्रोजन बॉम्ब तितक्याच क्षमतेच्या अणू बॉम्बपेक्षा किमान दुप्पट विध्वंसक असतो.
२] न्यूट्रॉन बॉम्ब ने वित्तहानी कमी होते परंतु प्राणहानी अधिक होते.
वरील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

२] एक साधारण प्रौढांकरता पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
१] रक्तात सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी ७० मिग्रॅ पर्यंत असावयास हवे.
२] जेवणानंतरचे रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोज प्रमाण १४० मिग्रॅ पावेतो असावयास हवे.
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ ४] दोन्हीही नाहीत

३] फायर एकविन्स्टर म्हणून कशाचा उपयोग होऊ शकतो.
१] कार्बन डायॉकसाईड आणि बिसीएफ [ ब्रोमोक्लोरोडाय फ्लुओरोमिथेन ]
२] सी. बी आणि सी. टी. सी. [ क्लोरोब्रोमोमिथेन व कार्बन टेट्रा क्लोराईड ]
३] वरील दोन्ही
४] वरीलपैकी एकही नाही.

४] पुढील भारुडाशी कोण संबंधित आहे?
अग, ग  . . . . . . . . . विंचू चावला
देवा, रे देवा . . . . . . . . विंचू चावला
आता काय मी करू  . . . . . . . . विंचू चावला
अग, ग  . . . . . . . . विंचू चावला
अग बया, बया  . . . . . . . . विंचू चावला
१] ज्ञानेश्वर २] तुकाराम ३] रामदास ४] एकनाथ

५] खालील राज्यांपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही?
१] अरुणाचल प्रदेश २] हरियाणा ३] त्रिपुरा ४] राजस्थान

६] खालील विधाने विचारात घ्या?
१] १९३५ च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते.
२] अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्याकडे देण्यात आले आहेत.
३] कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
१] १ आणि २ २] २ आणि ३ ३] १ आणि ३ ४] १,२,३

७] जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील, तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थनी कोण असतात?
१] राज्यसभेचे अध्यक्ष २] राज्यसभेचे उपाध्यक्ष ३] लोकसभेचे सर्वात ज्येष्ठ सभासद ४] राष्ट्रपती कडूननामनिर्देशित सभासद

८] खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर नाही?
१] घटनादुरुस्ती विधायक हे एखाद्या मंत्र्यांकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडले जाऊ शकतात आणि त्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीची गरज नसते.
२] घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही.
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ ४] दोन्हीही नाहीत

९] खालीलपैकी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे कोणते वैधानिक कार्य नाही?
१] नागरी सेवा मध्ये भरती, बढती, आणि नियंत्रणाच्या पद्धतीसंबंधी शासनास सल्ला देणे.
२] सनदी सेवकांचे अधिकार आणि हितसंबंधाची काळजी घेणे.
३] सनदी सेवकांच्या अपिलांची सुनावणी करून त्यांच्या तक्रारी दूर करणे.
४] राज्य लोकसेवा आयोगांच्या कार्यावर देखरेख ठेवणे

१०] खालील विधाने विचारात घ्या:
१] अयोग्य हेतू या आधारावर राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो.
२] अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकूम देखील गतकालापासून लागू होऊ शकते.
३] राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
१] १ आणि २ २] २ आणि ३ ३] ३ आणि ४ ४] १, २, ३

११] खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही?
१] सर्वाना समान कामाबद्दल समान वेतन
२] समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय
३] सामान नागरी कायदा
४] संपत्ती व उत्पादन साधनाचे केंद्रीकरण रोखणे

१२] खालील विधाने लक्षात घ्या.
१] ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच सदस्य असले पाहिजे.
२] भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे?
१] फक्त १ २] फाटक २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

१३] नकाराधिकाराच्या प्रकाराबाबत जोड्या लावा.
१] निरंकुश नकाराधिकार  १] विधेयकास मंजुरी अथवा नकार देणे, अथवा ते परत न पाठविणे
२] गुणात्मक नकाराधिकार २] कायदेमंडळ यावर साध्या बहुमताच्या आधारे मात करू शकते
३] तात्पुरता नकाराधिकार ३] कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकते
४] पॉकेट नकाराधिकार ४] विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कृती न करणे
१] १,२,३,४ २] ४,३,२,१ ३] ४,३,१,२ ४] ३,४,२,१

१४] खालील विधाने विचारात घ्या
१] राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढमताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती.
२] राज्यपालाची नियुक्ती बाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियन पद्धत स्वीकारली.
३] ४२ व्या घटनादुरुस्ती मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती बंधनकारक करण्यात आला आहे परंतु अशी तरतूद राज्यपाला संबंधी करण्यात आलेली नाही.
वरील कोणती विधाने बरोबर आहेत.
१] १ आणि २ २] २ आणि ३ ३] १ आणि ३ ४] १,२,३

१५] भारतीय राजशिष्टा चारानुसार पदनाम श्रेणीमध्ये राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे?
१] उपपंतप्रधान २] माजी राष्ट्रपती ३] घटक राज्याचे राज्यपाल ४] सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

१६] पुढीलपैकी व महिला त्यांच्या क्षेत्रात महान आहेत\होत्या त्यातील कोण डावखोरे नाहीत\नव्हते?
१] बराक ओबामा २] बिल क्लिंटन ३] महात्मा गांधी ४] नरेंद्र गांधी ५] बिल गेट्स ६] टॉम क्रूझ ७] मेरिलिन मेन्रो ८] अंजेलिना जॉली ९] अमिताभ बच्चन १०] सचिन तेंडुलकर
१] महात्मा गांधी २] नरेंद्र गांधी ३] अमिताभ बच्चन ४] वरीलपैकी कोणीही नाही

१७] इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोठून सुरु करण्यात आले?
१] बंगाल प्रांत २] ब्रिटन ३] दक्षिण आफ्रिका ४] फ्रान्स

१८] जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे?
१] चीन २] इटली ३] फ्रान्स ४] स्पेन

१९] भारतीय लष्कराच्या मूलभूत रणांगण संरचने बाबत जोड्या लावा?
१] बटालियन २] मेजर जनरल
२] डिव्हिजन  ३] मेजर अथवा कॅप्टन
३] प्लानटुन  ३] कर्नाल
४] कंपनी ४] कॅप्टन किंवा लेफ्टनंट
१] १,२,३,४ २] ४,३,२,१ ३] १,२,४,३ ४] ३,१,४,२

२०] - - - - -- - - यांनी साम्यवादी आणि मुक्त पाशात्य यांच्यातील मतभेदांचे वर्णन करण्यासाठी 'पोलादी पडदा' हि संज्ञा सर्वप्रथम वापरली?
१] सर विन्स्टल चर्चिल २] फ्रँकलिन रुझवेल्ट ३] थिओडोर रुझवेल्ट ४] मार्शल टिटो

२१] फक्त - - - -- -  हा खंड वाळंटाशिवाय आहे?
१] ऑस्ट्रेलिया २] आफ्रिका ३] उत्तर अमेरिका ४] युरोप

२२] केंद्र राज्य संघर्षात व राज्यांना वित्तीय स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही?
१] स्वातंत्र्यपासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे कि राज्ये केंद्रावर पूर्णपणे विसंबून राहतात.
२] केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाहीत.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

२३] खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१] अतिरेकी विरोधपैकी पथकांपैकी [ATS] निर्मिती महाराष्ट्र शासनाद्वारे २००४ साली करण्यात आली.
२] सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाची [CRPF] भूमिका अत्यंत महत्वाची आणि प्रमुख अशी दिसते.
३] जलद कृती दल [RAF] हि केंद्रीय राखीव पोलीस दलाची विशेष शाखा आहे.
४] विशेष सुरक्षा गट [SPG] हा विशिष्ट स्थळांच्या संरक्षणासाठी जबाबदार असतो.

२४] विवाहित मुलींकरिता त्यांच्या माहेरच्यामार्फत साजरा केला जाणारा ' निग्नोल चाकोबा ' हा सण पुढीलपैकी कोणत्या प्रांताचा आहे?
१] अरुणाचल प्रदेश २] मणिपूर ३] लडाख ४] सिक्कीम

२५] थिल्लना हा कोणत्या नृत्यप्रकारचा भाग आहे?
१] कुचिपुडी २] ओडिसी ३] भरतनाट्यम ४] कथक

२६] खालीलपैकी कोणत्या राज्याने ' भारतीय हत्ती ' हा आपला ' राज्य प्राणी ' म्हणून घोषित केलेला नाही?
१] केरळ २] तामिळनाडू ३] कर्नाटक ४] झारखंड

२७] द मेकिंग ऑफ द महात्मा' चे निर्देशांक कोणी केले?
१] सत्यजित रे २] मृणाल सेन ३] रिचर्ड अटेंबिरो ४] श्याम बेनेगल

२८] परिघाच्या संदर्भात पुढीलपैकी बॉल उतरत्या क्रमात लावा.
१] व्हॉलीबॉल २] बेसबॉल ३] बास्केट बॉल ४] हॅन्ड बॉल
१] ३,१,४,१ २] १,४,२,३ २] ४,३,१,२ ४] ३,४,१,२

२९] सायना नेहवाल बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१] जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
२] ऑलम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

३०] म्यानमार मध्ये २०१५ च्या निवडणुकांवर लष्करी अधिकाऱ्यांची राष्ट्रीय संसदेतील - - - - - - - टक्के जागा स्वतः करताच राखून ठेवल्या आहेत.
१] २० २] २५ ३] ३३ ४] ५०

३१] भारतीय मॅगझिनने भारतीय लेखिका शोभा डे यांचा उल्लेख भारताची जॅकी कॉलिन्स असा केला होता? जॅकी कॉलिन्स इतक्यात निर्वतल्या. त्याच्या एका पुस्तकावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत बंदी घालण्यात आली होती व ते त्यांच्या पहिले पुस्तक होते, ते कोणते?
१] द वर्ल्ड इज फुल ऑफ मॅरीड मेन
२] हॉलिवूड वाइब्स
३] हॉलिवूड हजबंड
४] हॉलिवूड डिवोर्सेस

३२] इतक्यात ओमर शरीफ ज्यांनी अर्ध्या शतकापेक्षा अधिक काळासाठी जगभरातील प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध केले हृदय विकाराच्या झटक्याने निर्वतले. त्यांच्याबाबत काय खरे नाही?
१] ते डॉक्टर झिविको म्हणून स्मरणात राहतात.
२] उत्कृष्ट ब्रिज प्लेअर म्हणून ओळखले जात.
३] त्यांना अल्झेमरस स्मृतिभ्रंश झाला होता.
४] ते मॅकेनाज गोल्ड मधील मॅकेना होते.

३३] त्या राज्याचे नाव सांगा ज्या राज्या ने उंचीचे ४ फूट पेक्षा कमी असलेल्या २१ वर्षाखालील लोकांची मोजणी केली व त्यांना रु ८०० दर महिना आर्थिक सहाय देऊ करून इतर राज्यांसाठी आदर्श घालून दिला.
१] केरळ २] गुजरात ३] उत्तराखंड ४] पश्चिम बंगाल

३४] खुशवंत सिंह जेव्हा इलेस्ट्रेड विकली ऑफ इंडिया चे संपादक होते, तेव्हा विकली ने शिखर गाठले. त्यांच्या लिखाणात येतात - - - - -- ?
१] द हिस्ट्री ऑफ शीखस २] द ट्रेन टू पाकिस्तान ३] द कंपनी ऑफ वुमेन ४] द सनसेट क्लब ५] सेक्स स्कॉच अँड स्कॉलरशिप ६] विथ मैलीस टुवार्ड्स वन अँड ऑल ७] नॉट अ नाईस मैन टू नो ८] द गुड द बॅड अँड द रिडिक्युलस
कोणती त्यांची अखेरची कांदबरी ठरली?
१] ३ २] ४ ३] ५ ४] ६

उत्तरे - १] २, २] २, ३] ३, ४] ४, ५] ४, ६] १, ७] २, ८] २, ९] ४, १०] ४, ११] ३, १२] ३, १३] २, १४] ४, १५] ३, १६] ४, १७] ३, १८] २, १९] ४, २०] १, २१] ४, २२] २, २३] ४, २४] २, २५] ३, २६] २, २७] ४, २८] १, २९] ४, ३०] २, ३१] १, ३२] ४, ३३] ३, ३४] २

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.