सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

महाराष्ट्रात GST दोन्ही सभागृहात मंजूर - २०१६

महाराष्ट्रात GST दोन्ही सभागृहात मंजूर - २०१६

* महाराष्ट्रातील विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात वस्तू व सेवा कर विधेयक [ GST ] मंजूर करण्यात आले.

* विरोधी पक्षांनी म्हणजेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा या विधेयकास पाठिंबा दिला आहे.

* अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की जिएसटी साठी राज्याचा कायदा असेल आणि तो येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात येईल.

* वस्तू व सेवा कर घटना दुरुस्ती विधेयकाला देशातील २९ राज्यांपैकी किमान १५ राज्याची मंजुरी आवश्यक आहे.

* महाराष्ट्र हे विधेयकाला मंजुरी देणारे दहावे राज्य ठरले आहे. आतापर्यंत आसाम, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, झाडखंड, नागालँड, छत्तीसगढ या राज्यांनी या विधेयकाला मंजुरी दिली आहे.

* त्यामुळे आता हे विधेयक लवकरात लागू होण्यासाठी अजून किमान सहा राज्याची मंजुरीची आवश्यकता असून ती मिळेल अशी सरकारला आशा आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.