सोमवार, २२ ऑगस्ट, २०१६

राज्यसेवा पूर्व परीक्षा - अभ्यासक्रम

राज्यसेवा पूर्व परीक्षा - अभ्यासक्रम 

* पेपर १ [अनिवार्य] - हा पेपर अनिवार्य असून २०० गुणांचा असतो, यासाठी २ तासाचा वेळ असतो. या पेपरसाठी पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम आवश्यक असतो. इंग्रजी व मराठी या माध्यमात हा पेपर असतो. हा पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो.

* पेपर २ [अनिवार्य] - हा पेपर अनिवार्य असून २०० गुणांचा असतो, यासाठी २ तासाचा वेळ असतो. या पेपरसाठी घटकानुसार १ ते ५ घटक पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम, घटक ६ साठी इयत्ता १० पर्यंतचा अभ्यासक्रम असतो, तर घटक ७ साठी ११\१२ वी पर्यंतचा अभ्यासक्रम आवश्यक असतो. इंग्रजी व मराठी या माध्यमात हा पेपर असतो. हा पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो.

* पेपर १ चा अभ्यासक्रम - [२०० गुण ]
१] राज्य,राष्ट्रीय, व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी व महत्वपूर्ण निर्णय,
२] भारताचा इतिहास [महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित], भारतीय राष्ट्रीय चळवळ
३] महाराष्ट्र,भारत,जग यांचा भूगोल - राजकीय, सामाजिक, महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल, जगाचा राजकीय सामाजिक भूगोल
४] महाराष्ट्र व भारत - राजकारण व शासन - राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासन, लोककल्याणकारी योजना, हक्कविषयक मुद्दे इत्यादी
५] आर्थिक आणि सामाजिक विकास - शाश्वत विकास, गरिबी, समावेशकता, विश्लेषण,सामाजिक विभाग
६] पर्यावरण परिस्थितीचे सर्वसामान्य मुद्दे, जैविविधता, हवामान बदल, याविषयी माहिती
७] सामान्य विज्ञान

* पेपर २ चा अभ्यासक्रम - [२०० गुण]
१] आकलन क्षमता
२] वैयक्तिक कौशल्य आणि संवाद कौशल्य
३] बौद्धिक तार्किकता आणि सांख्यिकी कोशल्य
४] निर्णय क्षमता व समस्या निराकरण
५] सामान्य बौद्धिक पात्रता
६] मूलभूत अंकगणित [ संख्या, तक्ते, आलेख यावरील इयत्ता दहावी पर्यंत अंकगणित ]
७] मराठी व इंग्लिश भाषा आकलन कौशल्य [ दहावी - बारावी ]
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.