मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

चालू घडामोडी १७ ते २३ ऑगस्ट - २०१६

चालू घडामोडी १७ ते २३ ऑगस्ट - २०१६

* डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल २९ ऑगस्ट रोजी शेतकरी दिन साजरा करण्यात येत असून आता विखे पाटील यांच्या जन्म दिनांकानुसार म्हणजे १७ ऑगस्ट रोजी तिथीनुसार कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे.

* भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या [ इस्रो ] कडून इन्सॅट ३,सॅट -१, जीसॅट -१८, रिसोर्स सॅट - २ ए हे चार उपग्रह सोडण्यात येणार आहे.

* केंद्र सरकार कडून १९८६ च्या कायद्यांअंतर्गत ग्राहक संरक्षण विधेयक एक नवा कायदा सरकारने जाहीर केला असून जर सिने कलावंत व खेळाडू ज्या वस्तूची जाहिरात करतात त्या वस्तूच्या चाचणीमध्ये निकृष्ट दर्जाचे काही आढळले तर त्या ब्रँड अँबेसिडरला तुरुंगात जावे लागेल.

* पी व्ही सिंधू, दिपा कर्मकार, साक्षी मलिक, व जितू रॉय यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला.

* दीपा कर्माकर हिला घडवण्यासाठी बिशेश्वर नंदी यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला.

* रोइंगमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या राजेंद्र शेळके यांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला.

* माणदेशी एक्सप्रेस ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, भरवशाचा ड्रॅग फ्लिकर व्ही आर रघुनाथ यांना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

* गोवा राज्यात १५ ते १६ ऑकटोम्बर रोजी ब्रिक्स देशांची ब्रिक परिषद भरणार असून त्याची त्या ठिकाणी जोरात तयारी चालू झाली आहे.

* सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत प्रथमस्थानी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.