गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

Moon Exprss चंद्रवारी वारीसाठी हिरवा कंदील २०१६

Moon Exprss चंद्रवारी वारीसाठी हिरवा कंदील २०१६

* भारतीय वंशाच्या उद्योजकाने स्थापन केलेल्या ' मुन एक्सप्रेस ' कंपनीला पुढील वर्षी चंद्रावर यान पाठवून तेथे उतरण्यास अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला.

* त्यामुळे नव्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा पृथ्वीवरील आर्थिक भरभरासाठी शोध घेऊन त्याचा विकास करण्याची व्यावसायिक कवाडे खाजगी उद्योजकांनी खुली करून दिली आहे.

* आजवर जगातील अनेक देशांनी केलेल्या चंद्रसफारी व त्याही पलीकडच्या अंतराळ वाऱ्या आणि त्यासंबंधीचे संशोधन फक्त सरकारी संस्थापुरतेच मर्यादित होते. काही मोजक्या खाजगी अंतराळ सफारीही याआधी केल्या गेल्या.

* या पार्श्वभूमीवर मुन एक्सप्रेसला परवानगी देण्याचा अमेरिकी सरकारचा धोरणात्मक निर्णय ऐतिहासिक व पथदर्शी आहे. पुढील वर्षी त्याचे यांत्रिक अंतराळयान रोबोटिक चंद्रावर पाठवून तेथे उतरवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

* भारतीय वंशाचे नवीन जैन व आंतराष्ट्रीय तत्त्ववेत्ते यांनी व्यापारी दृष्टीने अंतराळाचा शोध घेणे व त्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे या प्रमुख उद्दिष्टाने ' मुन एक्सप्रेसची ' कंपनीची स्थापना करण्यात आली.

* पृथ्वीच्या कक्षेबाहेर व्यावसायिक अंतराळ मोहीमा राबविण्यासाठी खाजगी क्षेत्राला आता नवीन आकाश खुले झाले आहे. पृथ्वीच्या आठव्या खंडावर म्हणजेच चंद्रावर संशोधन करण्यास आता आम्ही सज्ज झालो आहोत. त्याचा संपूर्ण फायदा मानवजातीला होणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.