रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

चालू घडामोडी २४ ते २८ ऑगस्ट - २०१६

चालू घडामोडी २४ ते २८ ऑगस्ट - २०१६

* जगातल्या श्रीमंत देशामध्ये भारत सातव्या स्थानी असून भारताकडे ५६०० अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे, वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार अमेरिका पहिल्या स्थानावर असून अमेरिकेजवळ ४८९०० अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती आहे, यात चीन दुसऱ्या [१७४०० अब्ज डॉलर्स], तर जपान तिसऱ्या [१५१०० अब्ज डॉलर्स] आहेत, अनुक्रमे इंग्लंड ४, जर्मनी ५, फ्रान्स ६, कॅनडा ८, ऑस्ट्रेलिया ९, इटली १० व्या क्रमांकावर आहे.

* जेनिफर लॉरेन्स जगातील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली असून फोर्ब्ज या मासिकाने २०१६ मधील जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रीची यादी जाहीर केली यात अनुक्रमे जेनिफर लॉरेन्स १, मेलीसा मॅकेथी २ स्थानावर असून यात १० व्या क्रमांकावर दीपिका पदुकोण हि एकमेव भारतीय अभिनेत्री आहे.

* साक्षी मालिकला हरियाणा सरकारने बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेसाठी ब्रँन्ड अँबेसिडर बनविले आहे, रिओ ऑलिम्पिक मध्ये कुस्तीत भारताला पाहिले महिला पदक मिळवून देणारी ती महिला आहे.

* वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदासाठी जिम योंग किम यांचे नाव अमेरिकेने जाहीर केले आहे.

* प्रसिद्ध अभिनेता नासिरुद्दीन शहा यांनी आपले [अँड देन वन डे] हे आत्मचरित्र लिहिले असून ते आता मराठीत उपलब्द होणार आहे.

* २०१५-१६ साठीचा युईएफ युरोपचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार ख्रिस्तियानो रोनाल्डो याला मिळाला असून, २०१५ ला हा पुरस्कार लिओनेल मेस्सी ला मिळाला होता. तर २०१४ ला हा पुरस्कार रोनाल्डोला मिळाला होता.

* फ्युचर रिटेल [FMCG] गतिमान ग्राहक वस्तू श्रेणीत रामदेव बाबा यांच्या पंतजली आयुर्वेदिक ब्रॅण्डच्या वस्तू विक्रीत तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले असून पहिल्या क्रमांकावर हिंदुस्थान युनिलिव्हर, तर दुसऱ्या स्थानी प्रोक्टल अँड गॅम्बल हे ब्रँड आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.