रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

रियो ऑलिम्पिकची सांगता - २०१६

रियो ऑलिम्पिकची सांगता - २०१६

* १६ दिवस चाललेल्या या स्पर्धेची सुरवात ज्या दिमाखाने करण्यात आली त्याचा तशाच थाटामाटात ३१ व्या ऑलिम्पिक महाकुंभाचा निरोप सोहळा पार पाडण्यात आला.

* आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी बाय बाय रियो म्हणत रियो ऑलिम्पिक संपल्याची घोषणा केली.

* २०६ देशातील तब्बल ११३०३ खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. ऑलिम्पिकने पुन्हा आपला दबदबा स्थापन केला, सांगता सोहळ्यादरम्यान भारताची ध्वजवाहक बनण्याचा बहुमान पैलवान साक्षी मालिकला मिळाला.

* अमेरिकेच्या खात्यात ४६ सुवर्ण, ३७ रौप्य आणि ३८ कास्य अशी एकूण १२१ पदके जमा झाली, त्यानंतर ग्रेट ब्रिटन २७ सुवर्णपदकासह दुसऱ्या स्थानावर तर चीन ७० पदकासह तिसऱ्या स्थानावर राहिला.

* ग्रेट ब्रिटनने २७ सुवर्ण, २३ रौप्य, १७ कांस्य, अशी एकूण ६७ पदक जमा झाली. तर चीनन २६ सुवर्ण, १८ रौप्य, २६ कांस्य पदके अशी एकूण ७० पदक मिळविली.

* भारताने मात्र यावर्षी निराशा केली पी व्ही सिंधू हिने रौप्य तर साक्षी मलिक हिने कास्य पदक मिळवून दिले.

* रियो ऑलिम्पिक पदक तालिकेत भारत ६७व्या स्थानावर आहे.

* ऑलिम्पिकचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी टोकियोच्या गव्हर्नर युरिको कोईको यांच्याकडे ऑलिम्पिक ध्वज सुपूर्द केला, २०२० च्या ऑलिम्पिक स्पर्धेच आयोजन जपानच्या टोकियोत करण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.