शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

चालू घडामोडी १ ते ७ ऑगस्ट - २०१६

चालू घडामोडी १ ते ७ ऑगस्ट - २०१६

* महाराष्ट्र राज्याचे ४० पोलीस प्रमुख म्हणून सतीश माथूर हे नवीन महासंचालक म्हणून सेवेत रुजू.

* महाराष्ट्र राज्यात गुजरात राज्याच्या भागात मातामृत्यू दर आणि अर्भक मृत्युदर जास्त आहे अशा भागात चिरंजीव योजना हा पायलट प्रकल्प म्हणून राबविला जाणार आहे.

* कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे प्रमुख माओवादी नेते पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.

* जगातील सर्वात मोठे हॉटेल मक्का शहरात उभारण्यात येणार आहे, मक्का शहराच्या मध्यभागी कबरीपासून जवळच १०००० हजार खोल्यांचे निवासी हॉटेल बांधण्यात येणार आहे. ७३५१ निवासी खोल्याचे मलेशियातील फर्स्ट वर्ल्ड हॉटेल हे जगातील सर्वात मोठे हॉटेल आहे.

* विजय रुपानी हे गुजरात राज्याचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत याआधी आनंदीबाई पटेल मुख्यमंत्रीपदावर होत्या त्यांनी राजीनामा दिल्यावर हा निर्णय घेण्यात आला.

* ब्राझीलमध्ये रियो ऑलम्पिक स्पर्धेला ५ ऑगस्ट पासून सुरवात करण्यात आली, दक्षिण अमेरिकेतील ही पहिलीच स्पर्धा आहे. मकराना स्टेडियमवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

* ऑलम्पिक स्पर्धेत २०६ सहभागी देश असून १ संघ निर्वासितांचा तसेच यात ११,२३९ सहभागी खेळाडू सहभागी झाले असून २८ खेळप्रकर व ३०८ क्रीडा प्रकार आहेत.

* जिएसटी हे विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत लवकर पारित करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून भाजप सरकार लवकरच हे विधेयक लागू करण्यासाठी प्रयत्नात आहे.

* शुभा मुदगल यांची राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, सामाजिक ऐक्य व त्या एक शास्त्रीय गायिका आहेत, सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.

* रियो ऑलम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्व भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा याने केले भारतातर्फे ११९ खेळाडूचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.