शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

नागपूर - मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्ग २०१६

नागपूर - मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्ग २०१६

* मुंबई ते नागपूर हे सुमारे ७१० किलोमीटरचे अंतर वाहनांना ताशी १५० किलोमीटर वेगाने अवघ्या सहा तासात पूर्ण करता येईल.

* मुख्य म्हणजे या महामार्गावर कोणतेही टोल आकारले जाणार नाहीत. तसेच या महामार्गांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या संपादित न करता त्यांना थेट या प्रकल्पात सहभागी करण्यात येणार आहे.

* या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची बागायती जमीन जात असेल तर जमिनीच्या क्षेत्रफळाच्या ३०% आकाराचा विकसित भूखंड सर्व सुविधांसह मिळेल, तर कोरडवाहू जमीन असल्यास २०% भूखंड सर्व सोयीयुक्त मिळेल.

* याखेरीज त्याला १० वर्षापर्यंत विशिष्ट रक्कम अनुदान म्हणून मिळेल त्यात दरवर्षी १०% वाढ होईल, जर एखाद्या शेतकऱ्याने महामार्गासाठी दिलेल्या जमिनीची रक्कम मागितली, तर त्याला ९% व्याजाने ती दिली जाईल.

* चीन, दक्षिण कोरिया, आणि मलेशिया हे देश नागपूर - मुंबई हा महामार्ग बांधून देणार आहेत, त्यासाठी ४६ हजार कोटी निधी उभारण्यात येणार असून, या महामार्गावर प्रचंड मोठी सॉफ्टवेअर इंडस्ट्री उभारण्यात येणार असून संपूर्ण महामार्गलगत अनेक छोटे मोठे उद्योग उभारले जाणार आहेत,

* त्यामुळे या प्रकल्पाअंतर्गत २० लाख लोकांना रोजगार मिळून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, व कोकण या भागातील शेतकऱ्यांना व सर्वसामान्य लोकांना फायदा होणार आहे.

* हा महामार्ग ३० तालुके, ३५४ गावातून जात असून महामार्गाच्या बाजूने टाऊनशिप, महाविद्यालये, रुग्णलाये, रेस्टोरंट, ट्रॉमा सेंटर, आयटी हब, शेती व अन्न प्रक्रिया उद्योग, पर्यटनस्थळे, लहान मोठे उद्योगधंदे, औद्योगिक वसाहती, अशा अनेक गोष्टी होतील.

* यामुळे नागपुरात होणारी व औरंगाबाद मध्ये होणारी वस्तू व शेती उत्पादने जलद मार्गाने जेएनपीटी मुंबई या बंदरात पोहोचण्यास मदत होईल व शेती उद्योग गतिमान होईल.

* हा महामार्ग तीन अधिक एक असा सहा लेनचा असेल, शिवाय दोन्ही बाजूच्या मध्यभागी मोकळी जागा सोडलेली असेल,
संकट काळात विमानाचे लँडिंग करू शकू अशी त्यांची रुंदी असेल. शिवाय महामार्गाअंर्गत येणाऱ्या शहरे व गावांना अडथळा होणार नसून ठीकठीकानी सबवे व उड्डाणपूल असतील.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.