मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

चालू घडामोडी ८ ते १६ ऑगस्ट - २०१६

चालू घडामोडी ८ ते १६ ऑगस्ट - २०१६

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिशन भगीरथ याचे पहिल्या टप्प्याचे उदघाटन झाले. राज्यात प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी पाईपलाईनद्वारे पुरविण्याचा हा तेलंगणा सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

* राज्यातील पहिला पतंजली मॉल बीड शहरात सुरु करण्यात आला आहे.

* ऑलम्पिक स्पर्धेत अमेरिकेचा जलतरणपटू मायकल फ्लेप्स याने १९ असे सर्वाधिक सुवर्णपदक पटकावले आहेत.

* आयआरसीटी देशातील मुख्य रेल्वेस्थानकांची पाहणी केली असून बियास हे भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वस्थानक म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आहे. गांधीधाम, वास्को दि गामा, जामनगर, आणि कुंभकोणम या रेल्वेस्थानकांना अनुक्रमे दुसरे,तिसरे,चौथे,आणि पाचवे स्थान प्राप्त झाले आहे.

* जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू पॉल पोग्बा ठरला असून जवळपास ८५० कोटी रुपयाचा करार त्याने केला आहे, ५ वर्षासाठी हा करार करण्यात आला आहे.

* रिओ ऑलिम्पिक मध्ये झालेल्या ५२ किलो महिला गटात मजिन्दा केलमेंडी हे त्याचे सुवर्ण नाव असून कोसोवो या देशाचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.

* गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्याला दहा हजार रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे.

* सारस्वत बँकेचे अध्यक्षपदी गौतम एकनाथ ठाकूर यांची तर उपाध्यक्षपदी शशिकांत साखळकर यांची निवड करण्यात आली.

* देशातील विविध भागात स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी ५७,००० योजना सुरु करण्यात येणार असून त्यासाठी ४३०० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.

* जीएसटी विधेयक देशात सर्वप्रथम लागू करणारे राज्य आसाम ठरले आहे, आसाम मधील विधानसभेत एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. जिएसटी हे भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे.

* काश्मीरमध्ये घुसकोरी करणाऱ्या चार पाकिस्तानी जवानांना खात्मा करणाऱ्या लष्करातील राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार हंगपण दादा यांना स्वतंत्रदिनी अशोकचक्र हा सर्वोच्च बहुमान मिळाला असून मरणोत्तर जहाल करण्यात आला आहे.

* जमैकाची एलेना थॉमसन हि सर्वात वेगवान महिला धावपटू म्हणून तिने १०० मीटर २७ मिनिट ५.१७ मी सेकंद वेळेसह बाजी मारली आहे.

* चीनने उच्च कोटी हॅकरला रोखण्यासाठी उच्च साधनांचा वापर करून जगातील पहिला अँटी हॅकिंग उपग्रह बनविला असून तो जगात सर्वप्रथम चीनने बनविले आहे.

* स्वच्छ भारत अभियान याअंतर्गत शोचालाय निर्मितीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

* प्रसूतीनंतर महिला कर्मचाऱ्यांना २६ आठवडे [६ महिने ] पगारी रजा देण्याचे मातृत्व रजा दुरुस्ती विधेयक २०१६ राज्यसभेने मंजूर केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.