शनिवार, २३ जुलै, २०१६

STI सराव प्रश्नपत्रिका - २

STI सराव प्रश्नपत्रिका - २

१] शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला?
१] महात्मा फुले २] गणेश वासुदेव जोशी ३] विष्णुशास्त्री चिपळूणकर ४] डॉ भाऊ दाजी लाड

२] महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहास चालना देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली?
१] निष्काम कर्ममठ २] अनाथ बालिकाश्रम ३] विधवा विवाहोत्तेजक मंडळी ४] विधवा विवाह संघ

३] गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
१] मराठा २] केसरी ३] ज्ञानप्रकाश ४] दर्पण

४] महात्मा फुलेंनी कोणती भारतातील अशा स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राह्मणतराने मोठ्या धैर्याने परोपकार बुद्धीने ब्राह्माण विधवांसाठी काढली?
१] अनाथालय २] बालहत्या प्रतिबंधक गृह ३] महिलाश्रम ४] पुनर्विवाहोत्तेजक मंडळ

५] महात्मा फुलेंनी १८५५ साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे?
१] शेतकऱ्यावर २] अस्पृश्यावर ३] ब्राह्मणी मूर्तिपूजेवर ४] स्त्री दास्यावर

६] डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला?
१] शेडूल्ड कास्ट फेडरेशन २] स्वतंत्र मजूर पक्ष ३] समता पक्ष ४] रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

७] शाहू महाराजांनी १९११ मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?
१] आर्य समाज २] सत्यशोधक समाज ३] प्रार्थना समाज ४] ब्राह्मो समाज

८] शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता?
१] दलित बोर्डिंग २] मुस्लिम बोर्डिंग ३] वसतिगृह ४] मराठा बोर्डिंग

९] महर्षी धोंडो केशव कर्व्यांनी जानेवारी १८९९ मध्ये सुरु केलेल्या अनाथाश्रमाचा काय उद्देश होता?
१] अनाथ मुलींना शिक्षण २] विधवांना शिक्षण ३] विधवा पुनर्विवाहाना आधार ४] पुनर्विविहितांच्या मुलांना शिक्षण

१०] महर्षीं कर्व्यांनी १५ नोव्हेंबर १८९१ ला पुण्याला फर्ग्युसन कॉलेज मध्ये कोणत्या विषयाचे प्राधाप्यक म्हणून नोकरी पत्करली?
१] तत्वज्ञान २] गणित ३] भौतिकशास्त्र ४] नीतिशास्त्र

११] गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते?
१] डेक्कन कॉलेज २] फर्ग्युसन कॉलेज ३] वाडिया कॉलेज ४] विल्सन कॉलेज

१२] मानवी समता हे मासिक कोणी सुरु केले?
१] बाळशास्त्री जांभेकर २] धोंडो केशव कर्वे ३] महात्मा फुले ४] डॉ आंबेडकर

१३] कुठल्या परिषदेत जमलेल्या हजारो दलितांना संबोधताना शाहू महाराजांनी डॉ आंबेडकरांची ओळख करून देताना ' हा तुमचा भावी नेता असे म्हटले?
१] महाड २] माणगाव ३] अमरावती ४] नाशिक

१४] महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यात पुणे करार होऊन
१] दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले
२] दलितांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.
३] केंद्रीय कायदेमंडळात दलितांना राखीव जागा देण्यात आले.
४] प्रांतीय कायदेमंडळात दलितांना स्वतंत्र जागा देण्यात आली

१५] सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले?
१] लोकहितवादी २] आगरकर ३] विठ्ठल रामजी शिंदे ४] महात्मा फुले

१६] दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय होते?
१] धरण बांधणे २] निर्यातीत वाढ करणे ३] शेतीचा विकास करणे ४] औद्योगिकीकरण

१७] - - - - - -   - या रोजी राष्ट्रीय विकास समिती कडून १० व्या पंचवार्षिक योजनेस मंजुरी देण्यात आली?
१] २१ डिसेंबर २००२ २] ३१ डिसेंबर २००२ ३] २१ जानेवारी २००३ ४] ३१ जानेवारी २००३

१८] पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी - - -  - - या काळात झाली?
१] १९६९-७४ २] १९७४-७९ ३] १९८०-८५ ४] १९८५-९०

१९] भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना  - - -  -- या साली करण्यात आली?
१] १९४८ २] १९५० ३] १९५१ ४] १९५२

२०] दामोदर खोरे ही योजना - - - - - - या पंचवार्षिक योजनेचे निष्पत्ती आहे?
१] पहिल्या २] दुसऱ्या ३] तिसऱ्या ४] पाचव्या

२१] दारिद्र्य निर्मूलन गरिबी हटाओ आणि आत्मनिर्भरता ही - - - - - - - पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती?
१] तिसऱ्या २] पाचव्या ३] दुसऱ्या ४] सहाव्या

२२] भारतात शेती पाठोपाठ रोजगार उपलब्द करून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग -- - - - - हा आहे?
१] हातमाग २] साखर कारखाने ३] ज्यूट कारखाने ४] पोलाद कारखाने

२३] - - - - - - ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे?
१] हिस्सार २] चंद्रा ३] गंगा ४] सियाचीन

२४] भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?
१] गुजरात २] तामिळनाडू ३] मिझोराम ४] ओरिसा

२५] भारतात एकूण - - - -  - - किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे?
१] ६५५५ २] ८५१७ ३] ७५१७ ४] ६०००

२६] खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे?
१] चेन्नई २] कोलकाता ३] नवीन मंगलोर ४] कांडला

२७] चहाची लागवड - -  - - - - - या राज्यात सर्वात प्रथम झाली?
१] कर्नाटक २] केरळ ३] आसाम ४] तामिळनाडू

२८] भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही - - - - -  - - या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे?
१] पहिल्या २] दुसऱ्या ३] तिसऱ्या ४] चौथ्या

२९] दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा -  -- - - - - - क्रमांक आहे?
१] प्रथम २] द्वितीय ३] तृतीय ४] चतुर्थ

३०] मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर - - - - -  - - हे आहे?
१] कांडला २] मार्मागोवा ३] हल्दिया ४] न्हावाशेवा बंदर

३१] मुंबई - पणजी हा राष्ट्रीय महामार्ग या क्रमांकाचा आहे?
१] सोळा २] सतरा ३] अठरा ४] वीस

३२] - - - - - - - हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे?
१] दिल्ली ते आग्रा २] मुंबई ते ठाणे ३] हावडा ते खडकपूर ४] चेन्नई ते रेणीगुंठा

३३] सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पदनासाठी प्रसिद्ध आहे?
१] औषधी निर्माण २] कातडी वस्तू ३] कागद ४] होजिअरी

३४] पश्चिम महाराष्ट्रातील - - - - -  -  - या जिल्ह्यामध्ये बॉक्सइट चे साठे आढळतात?
१] नाशिक २] पुणे ३] कोल्हापूर ४] सोलापूर

३५] महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?
१] निवळी २] इंदापूर ३] बुटीबोरी ४] वाळुंज

३६] महाराष्ट्रतील - - - - - -  -  हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे?
१] नागपूर - चंद्रपूर २] रायगड - रत्नागिरी ३] मुंबई - पुणे ४] नाशिक - जळगाव

३७] महाराष्ट्रातील - - - - - - जिल्ह्यांची संख्या किती आहे?
१] ३५ २] ३६ ३] ३७ ४] ३८

३८] महाराष्ट्रातील - - - - - -  - या जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात?
१] नागपूर - गोंदिया २] सातारा - सांगली ३] धुळे - जळगाव ४] यवतमाळ - परभणी

३९] कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा?
१] थळ, कुंभार्ली, फोंडा, आंबोली २] थळ, फोंडा, कुंभार्ली, आंबोली ३] कुंभार्ली, थळ, फोंडा, आंबोली ४] आंबोली, फोंडा, कुंभार्ली, थळ

४०] हापूस आंब्याची झाडे - - - - - -  - -  या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आहेत?
१] सिंधुदुर्ग २] रत्नागिरी ३] रायगड ४] वरील सर्व जिल्ह्यात

४१] महाराष्ट्रातील - - - - - - हे जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत?
१] धुळे - नाशिक २] पुणे - नाशिक ३] सातारा - नाशिक ४] सांगली - नाशिक

४२] कोणत्या घटनादुरुस्तीवर मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?
१] ४५ वि घटना दुरुस्ती २] ४६ वी घटना दुरुस्ती ३] ४२ वी घटना दुरुस्ती ४] ४४ वी घटना दुरुस्ती

४३] भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?
१] स्वतंत्र २] समता ३] न्याय ४] बंधुभाव

४४] भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?
१] राष्ट्रपती २] उपराष्ट्रपती ३] पंतप्रधान ४] गृहमंत्री

४५] सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते?
१] द्विगृही २] एकगृही ३] बहुगृही ४] यापैकी कोणतेही नाही 


 


 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.