शनिवार, ३० जुलै, २०१६

राज्यसेवा सराव प्रश्नपत्रिका - ५

राज्यसेवा सराव प्रश्नपत्रिका - ५ 

१] पुढील प्रकल्प ज्याप्रमाणे सुरु करण्यात आले तो क्रम सांगा :
१] सिंह प्रकल्प २] व्याघ्र प्रकल्प ३] मगरमछच पैदास प्रकल्प ४] गेंडा संवर्धन प्रकल्प
१] २,१,३,४ २] १,२,३,४ ३] २,१,४,३ ४] १,२,४,३

२] तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये
१] दात अणुकुचीदार असतात.
२] आतडे आखूड असतात.
वरील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे?
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

३] राष्ट्रीय एड्स नियंत्रणात कार्यक्रमाबाबत [NACP] खालील कोणते विधान बरोबर आहे?
१] या कार्यक्रमातील खर्च केंद्र आणि राज्य यांच्याकडून ८० : २० सूत्रानुसार केला जातो.
२] कार्यक्रमाचा हेतू एड्सची नवीन लागण रोखणे असा होता.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

४] १९८७ साली प्रसिद्ध झालेल्या ब्रुन्टडलॅण्ड अहवालाचे शीर्षक खालीलपैकी काय होते?
१] आपले पर्यावरण २] आपले समान भविष्य ३] शाश्वत विकास ४] आपला एक उपग्रह [पृथ्वी]

५] पुढील विकास वित्त संस्थांची मांडणी त्यांची स्थापना झाल्याप्रमाणे करा.
१] भारतीय औद्योगिक विकास बँक - IDBI
२] भारतीय औद्योगिक गुंतवणूक बँक - IIBI
३] भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ - ICICI
४] भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ - IFCI
१] ४,१,२,३ २] ४,३,२,१ ३] ४,३,१,२ ४] ४,२,१,३

६] खालीलपैकी कोणते काम सूतिकापडाच्या गिरण्यांमध्ये समाविष्ट होत नाही?
१] सूत कातणे २] विणणे ३] डिझायनिंग ४] सरकी काढणे

७] १९९१ च्या आर्थिक अरिष्टाची कोणती लक्षणे होती?
१] परकीय चलन गंगाजळीत घट २] भारतीय विदेशी कर्जास आंतरराष्ट्रीय धनकोकडून फेरमंजुरी ३] राजकोषीय तुटीतील वाढ ४] साठ्यातून सुवर्णविक्री
१] १,२,३ २] २,३,४ ३] ३,४,१ ४] ४,१,२

८] पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे.
१] आयकर भरन्याची क्षमता ह्या तत्वावर आकारला जातो.
२] आय कराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे काळा पैसा बाढतो.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

९] सन २००१ ते २०११ दरम्यानच्या दशवार्षिक शेकडा लोकसंख्या बदलाबाबत पुढील विधानापैकी कोणते योग्य आहे?
१] महाराष्ट्रात शहरी दशवार्षिक शेकडा बदल ग्रामीणच्या दुप्पट पेक्षा अधिक होता.
२] संपूर्ण देशाकरता शहरी दशवार्षिक शेकडा बदल ग्रामिणांच्या तुलनेत त्यापेक्षाही अधिक होता.
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ ४] दोन्हीही नाही.

१०] पुढील दोन विधानापैकी कोणते अयोग्य आहे.
१] महाराष्ट्रात शहरी लिंगगुणोत्तरात शहरी व ग्रामीण क्षेत्राकडे दोन्हीकडे सदर काळात सुधारणा झाली.
२] संपूर्ण देशात लिंगगुणोत्तर शहरी व ग्रामीण क्षेत्रात दोन्हीकडे सदर काळात सुधारणा झाली.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

११] क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्वाचे कार्य अँड्रेनल ग्रंथी कडून केले जाते. त्या कोठे विसावल्या असतात?
१] मूत्रपिंडामध्ये २] मूत्रपिंडावर ३] मूत्रपिंडाच्या विरुद्ध बाजूस ४] दोन्ही मूत्रपिंडामध्ये

१२] एक वस्तू निर्वातपोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रियेअंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अश्या प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील?
१] गतिज ऊर्जा २] स्थितिज ऊर्जा ३] संपूर्ण यांत्रिक ऊर्जा ४] संपूर्ण एकरेखीय संवेग

१३] पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे?
१] अतिनील किरणे किरकोळ गाठीवर उपयुक्त ठरतात.
२] अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथ्थकरण करतात.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्हीही १ आणि २ ४] दोन्हीही नाहीत

१४] आजकाल दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या कांचनची पाने अधिक दिली जातात आपट्यांच्या पानांपेक्षा कांचनची पाने
१] आकाराने लहान असतात.
२] स्पर्शास रुक्ष असतात.
वरील कोणती विधाने योग्य आहेत?
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ ४] दोन्हीही नाहीत

१५] सिंधू संस्कृतीतील लोकांनी - - - - - - - पाळलेला होता किंवा नाही या बद्दल शंका आहेत.
१] कुत्रा २] घोडा ३] हत्ती ४] उंट

१६] कोणाचे आत्मचरित्र पुढील विधानाने सुरु होते?
'' विशेषतः भारतात, सुखवस्तू कुटुंबाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते ''
१] जवाहरलाल नेहरू २] मोहनदास करमचंद गांधी ३] नासिरुद्दीन शहा ४] जे आर डी टाटा

१७] पुढील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य आहे?
१] आधुनिक मनुष्य इओसीन कालखंडात जन्मास आला.
२] डायनासोर क्रिटेशियस कालावधीत नाहीसे झाले.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

१८] खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत.
१] श्रवणक्षमता आंशिक कमी होते [ बहिरेपणा येतो ].
२] पुनरुत्पादनावर यंत्रणेवर वाईट परिणाम होतो.
३] गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते.
४] मानवाची विचार क्षमता आणि संपर्क कौशल्य यावर परिणाम होतो.
५] उच्च रक्तदाब [B.P] निर्माण होतो.
१] १,२,३,५ २] १,३,४,५ ३] १,२,४,५ ४] १,२,३,४,५

१९] खालील विधानांचा विचार करा:
१] दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते.
२] ध्वनीचा वेग हा हवेच्या आद्र्रतेच्या समानुपाती होता.
वरीलपैकी कोणते विधान सत्य आहेत?
१] १ आणि २ दोन्ही बरोबर आहे.
२] १ आणि २ चूक आहे.
३] १ बरोबर आणि २ नाही
४] २ बरोबर १ चूक

२०] विद्युत चुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत?
१] दूरदर्शन लहरी २] अतिनील लहरी ३] क्ष किरणे ४] सूर्यप्रकाश किरणे
१] १,२,३ २] १,३,४ ३] १,२,४ ४] १,२,३,४

२१] अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरला जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे?
१] अभ्रक विजेचा सुवाहक आहे.
२] अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

२२] डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्या दगडाचे आपण जर निरीक्षण केल्यास तो आपणास
१] पाण्यामध्ये खरोखरच्या खोलीपेक्षा जास्त खोल दिसेल.
२] आहेत्याच खोलीवर वाटेल
३] पृष्ठभागाजवळ प्रत्यक्ष असल्यासारखा वाटेल.
४] अदृश्य वाटेल.

२३] पुढील दोन विधानापैकी कोणते अयोग्य विधान आहे?
१] अनुअंक म्हणजे अनु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.
२] अनु वस्तुमान म्हणजे अनु केंद्रकातील एकूण प्रोट्रॉन व न्यूट्रॉनची संख्या
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्हीही १ आणि २ ४] दोन्हीही नाही

२४] इसबगोल जे कि पोटाच्या विकारावर वापरले जाते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते?
१] प्लॅन्टगो ओवॅटा २] पोंगामिया पिन्नाटा ३] आऊजीनिया उजनेनीन्स ४] ऑसिमम सँक्टम

२५] एका मिनिटातून मूत्रपिंडातुन किती रक्त वाहते?
१] १ लिटर २] ०.७५ लिटर ३] ०.५० लिटर ४] ०.२५ लिटर

२६] पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे?
१] उपदाने हि उपचार म्हणून स्टेरॉइड्स सारखी असतात.
२] स्टेरॉईड्स टिकून राहणारा इलाज आश्वासित करतात.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत.

२७] कोणत्या हरणाने रामायणातील सितेला भुरळ पाडली होती?
१] कस्तुरी मृग २] काळवीट ३] चितळ ४] चिंकारा

२८] ४ वर्ष वयाच्या मुलांच्या अँटीरीयरर पिट्यूटरिस एका अपघातात गंभीर हानी पोहोचलेली होती. तरीही तो तग धरून जिवंत राहिला. त्याला काय होऊ शकते?
१] थायरॉक्सझिन २] स्परमॅटोजिनियस उत्तेजित होणार नाहीत ३] मुलांच्या उंचीची वाढ कुंठित होईल ४] मेमॉरी ग्लॅन्डची वाढ उत्तेजित होईल

२९] ' बंडल ऑफ हिज ' चे जाळे
१] संपूर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतू चे असते.
२]  संपूर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतू चे असते.
३] फक्त हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूंचे असते.
४] हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या मज्जातंतूचे असते.

३०] जस अशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग - - - --- ?
१] मंदावतो २] वाढतो ३] बदलत नाही ४] खूप वेगाने वाढतो

३१] नैसर्गिक रबर हा एक - - - - - - चा पॉलिमर आहे?
१] प्रोपीन २] आइसोप्रिन ३] फॉर्मलडिहाईड ४] फिनॉल

३२] पुढीलदोन विधानापैकी कोणते योग्य आहे?
१] विशेषआर्थिक क्षेत्रातील उत्पादकांना ज्या सूट व सवलती दिल्या जातात त्या प्रत्यक्ष करात नाही परंतु निर्यात प्रोत्सानार्थ व पायाभूत सुधारणाकरिता दिल्या जातात.
२] तसेच त्या कोणत्याही कामगारविषयक आदेश, निर्देशांक वा कायद्यासंदर्भात नाहीत.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्हीही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

३३] खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डाय सकेराइट्स आहे?
१] ग्लुकोज २] फ्रॅकटोज ३] सुक्रोज ४] सेल्युलोज


उत्तरे - १] २, २] १, ३] २, ४] २, ५] ३, ६] ४, ७] ३, ८] ३, ९] ३, १०] ४, ११] २, १२] ३, १३] ४, १४] ४, १५] २, १६] १, १७] २, १८] ४, १९] १, २०] ४, २१] २, २२] ३, २३] ४, २४] १, २५] १, २६] १, २७] ३, २८] ३, २९] ३, ३०] १, ३१] २, ३२] २, ३३] ३.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.