मंगळवार, २६ जुलै, २०१६

राज्यसेवा सराव प्रश्नपत्रिका - ३

राज्यसेवा सराव प्रश्नपत्रिका - ३

१] पुढील शास्त्रज्ञांपैकी कोणी त्याच्या १९४० मध्ये प्रकाशित झालेल्या 'विज्ञान व धर्म' या लेखात असे प्रतिपादन केले की '' धर्माविना विज्ञान लंगडे आहे व विज्ञानाविना धर्म आंधळा आहे?
१] अल्बर्ट आईन्स्टाईन २] आयझॅक न्यूटन ३] नील्स बोर ४] कोपर्निकस 

२] संसदेबाबत खालील विधाने विचारात घ्या 
१] लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतूद सन १९५४ मध्ये करण्यात आली. 
२] लक्षवेधी संबंधी सूचना सद्यस्याद्वारें लिखित स्वरूपात सकाळी १० पर्यंत द्यावी लागते. 
२] एका बैठकीसाठी सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही. 
वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१] १ २] २ ३] ३ ४] कोणतेही नाही 

३] खालील विधाने विचारात घ्या : 
१] ब्रिटनमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुनर्विलोकनाची परवानगी नाही. 
२] जेथे न्यायालयीन पुनर्विलोनाबाबत कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थे इतकी भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठ नाही. 
१] विधान १ बरोबर २ चुकीचे २] विधान १ चुकीचे २ बरोबर ३] दोन्हीही विधाने चुकीची ४] दोन्हींही विधाने बरोबर 

४] खालील विधाने विचारात घ्या : 
१] ब्रिटिश घटना हि अलिखित आहे. 
२] ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. 
३] ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. 
वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. 
१] १ २] २ ३] ३ ४] वरीलपैकी कोणतेही नाही

५] कोणत्या देशाविरुद्ध खेळतांना भारतीय क्रिकेट संघाने ७ ऑगस्ट २०१४ रोजी कसोटी डावांमध्ये जास्तीत जास्त सहा फलंदाज शून्य धावसंख्येवर बाद होण्याच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली?
१] दक्षिण आफ्रिका २] ऑस्ट्रेलिया ३] वेस्ट इंडिज ४] इंग्लंड

६] त्सुनामी या जपानी शब्दातील त्सु आणि नामी म्हणजे?
१] संपूर्ण विनाश २] राक्षसी लाट ३] बंदर लाट ४] हिंस्त्र लाट

७] फ्रेडरिक सेंजर यांना दोन वेळा रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता, दोन पुरस्कारांमध्ये अंतर किती होते?
१] १० वर्षापेक्षा अधिक २] १० वर्षापेक्षा कमी ३] २० वर्षापेक्षा अधिक ४] २० वर्षापेक्षा कमी

८] '' चांगला खेळला निळा, लाल जिंकलेला आहे, हे रेफरीचे वाक्य सर्वसाधारांमध्ये कुठे ऐकतो?
१] फुटबॉल २] बास्केटबॉल ३] स्क्वॉश ४] बॉक्सिंग

९] राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षपदाची नेमणूक करतात?
१] राज्यपाल २] राष्ट्रपती ३] उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ४] राष्ट्रीय न्यायिक आयोग

१०] भारतीय राज्यघटनेच्या ' मूलभूत चौकटीच्या ' तत्वातून - - - - - - व्यक्त होते?
१] राज्यघटनेची काही वैशिष्टे अत्यंत आवश्यक असतात कि जी केव्हाच रद्द करता येत नाहीत.
२] मूलभूत अधिकार संक्षिप्त करता येत नाहीत अथवा हिरावून घेता येत नाहीत.
३] अनुच्छेद ३६८ मध्ये नमूद केलेल्या घटनादुरुस्तीच्या पद्धती व्यतिरिक्त अन्य मार्गाने राज्यघटनेत बदल करता येऊ शकत नाही.
४] सरकारनामामध्ये बदल केला जाऊ शकत नाही कारण तो राज्यघटनेचा भाग असत नाही.

११] खालील पैकी कोणास संसद सभासदांचा ' मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक ' म्हणून ओळखले जाते?
१] महान्यायवादी २] नियंत्रक व महालेखापरीक्षक ३] महासचिव ४] संसदीय कामकाज मंत्री

१२] २०११ सालच्या जंगणणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि - - - - - -  जिल्ह्याची लोकसंख्येची घनता एक समान आहे?
१] जळगाव २] नाशिक ३] औरंगाबाद ४] रायगड

१३] भारताचा प्रथम सहापदरी अति जलद वेग रोज ४३००० हजार वाहने वाहणारा मुंबई - पुणे जलद मार्ग किती लांबीचा आहे?
१] ८३ किमी २] ९३ किमी ३] १०३ किमी ४] ११३ किमी

१४] रमण मॅगसेसे पुरस्काराची सुरवात १९५७ पासून झाली. रॅमन मॅगसेसे कोणत्या वर्षी विमान दुर्घटनेत मरण पावले आहेत?
१] १९५४ २] १९५५ ३] १९५६ ४] १९५७

१५] क्रॉस कंट्री स्किईन्ग हा - - - - - हा राष्ट्रीय खेळ आहे?
१] स्विडन २] डेन्मार्क ३] फिनलँड ४] नॉर्वे

१६] खालील विधाने विचारात घ्या :
१] प्रथमतः खाजगी व्यक्ती राष्ट्रीयदिवस सोडून राष्ट्रध्वज फडकवू शकत नव्हता.
२] आचारसंहितेला २००९ मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली.
वरील कोणती विधाने बरोबर कि चूक ते सांगा?
१] फक्त १ २] फक्त २ ३] १ आणि २ ४] कोणतेच नाही

१७] ज्ञानपीठ पुरस्कारांची सुरवात १९६१ मध्ये झाली. कोणता वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे?
१] द इंडियन एक्सप्रेस २] द टाइम्स ऑफ इंडिया ३] हिंदुस्थान टाइम्स ४] द हिंदू

१८] भारताच्या झेंड्यात हळूहळू विकास होत गेला. ऑगस्ट ७ १९०६ रोजी कोलकाता मधील ग्रीन पार्क येथे पारसी बागान चौकात सर्वप्रथम झेंडा फडकवला गेला सन १९२१ मध्ये काँग्रेस समितीच्या बैठकीत महात्मा गांधी पुढे झेंडा आणला गेला. गांधीजीनि त्यात कोणत्या रंगाचा पट्टा समाविष्ट करण्यात सुचविले?
१] लाल २] केशरी ३] पांढरा ४] हिरवा

१९] कॉमनवेल्थ राष्ट्रे स्वतंत्र आहेत, जी पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात होती.
१] हि सर्व राष्ट्रे इंग्लंडच्या राणीला कॉमनवेल्थची प्रमुख मानतात, परंतु आपापल्या राष्ट्रांचे प्रतीकात्मक प्रमुख मानीत नाहीत.
२] कॉमनवेल्थ देशात एकमेकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्याचा अँबॅसिडर संबोधतात.
वरील कोणती विधाने बरोबर व चूक आहेत ती सांगा.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

२०] त्या व्यक्तीचे नाव सांगा, जिने स्वतःच्याच मृत्यूशिलेसाठी पुढीलप्रमाणे स्मृतीलेख लिहून ठेवला होता?
'' इथे एक असा चिरनिद्रा घेत आहे, ज्यानं माणसालाच नव्हे तर देवालाही सोडलं नव्हतं''
१] आर के लक्ष्मण २] बी. के. एस. अयंगार ३] पु ल देशपांडे ४] खुशवंत सिंग

२१] संघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे?
१] उत्तर ध्रुव २] दक्षिण ध्रुव ३] विषुववृत्त ४] कर्कवृत्त

२२] अटलबिहारी वाजपेयी यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
१] ते १९९६ ते २००४ या काळात तीन वेळा भारताचे पंतप्रधान होते.
२] ते लोकसभेचे आठ वेळा, तर राज्यसभेचे तीनदा सभासद होते.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर ते चूक सांगा
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

२३] कॉमन मॅन [ सर्वसाधारण मनुष्य ] चे निर्माते श्री आर के लक्ष्मण रोज वाचकांना सकाळी हसवायचे.
द टाइम्स ऑफ इंडिया मधील त्यांच्या व्यंगचित्र मालिकेतील शीर्षक काय होते?
१] हू सेड इट २] यु सेड इट ३] ऑल सेड इट ४] नन सेड इट

२४] व्हॅटिकन सिटीच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या :
१] क्षेत्रफळाच्या संदर्भात हा जगातील सर्वात छोटा देश आहे, व या देशाचे क्षेत्र १ चौ किमि पेक्षा कमी आहे.
२] व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या ५०० पेक्षा कमी आहे.
वरील कोणते विधान बरोबर कि चूक ते सांगा?
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ ४] यापैकी नाही

२५] ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याजवळील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?
१] लॉर्ड कॉर्नवोलीस २] वॉरन हेस्टिंग्स ३] लॉर्ड रिपन ४] विलियम हंटर

२६] मलाला युसूफझाई ज्या पाकिस्तानमधील पखतून आदिवासी क्षेत्रात दहशतवादाच्या विरोधातील लढाईत धैर्याच्या प्रतीक मानल्या जातात त्या नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सगळ्यात तरुण व्यक्ती ठरल्या आहेत, मलाला युसूफझाई किती वर्षाच्या आहेत?
१] १७ वर्षे २] २१ वर्षे ३] २५ वर्षे ४] २९ वर्षे

२७] भारताची पहिली इथेनॉलवर धावणारी बस कोणत्या शहरात धावली?
१] मुंबई २] बंगलोर ३] नागपूर ४] दिल्ली

२८] श्री भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या प्रख्यात कादंबरीसाठी २०१४ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. या कादंबरीत
१] हिंदूंचे सण आणि त्यांचे महत्व यांचे वर्णन आहे.
२] हिंदू संस्कृतीचे वर्णन ' जगण्याची अप्रतिम कला ' असे आहे.
३] हिंदू धर्माच्या उदयाबाबत वर्णन आहे.
४] हिंदू संस्कृतीचे वर्णन जगण्याची समृद्ध अडगळ ' असे आहे.

२९] इबोलाचा मनुष्यात शिरकाव लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कामुळे होतो, मात्र या प्राण्यात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही?
१] चिंपांझी २] फळ वाघूळ ३] माकडे ४] मच्छर

३०] नेल्सन मंडेला १० मे १९९४ रोजी दक्षिण आफ्रिकेचे प्रथम निवडून आलेले राष्ट्रध्यक्ष ठरले, राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी किती वर्षे त्यांनी तुरुंगवासात सोसला?
१] २७ वर्षे २] २३ वर्षे ३] १७ वर्षे ४] १३ वर्षे


उत्तरे - १] १, २] १, ३] ३, ४] ४, ५] ४, ६] ३, ७] ३, ८] ४, ९] २, १०] १, ११] ३, १२] ३, १३] २, १४] ४, १५] ४, १६] १, १७] २, १८] ३, १९] ४, २०] ४, २१] १, २२] १, २३] २, २४] १, २५] १, २६] १, २७] ३, २८] ४, २९] ४, ३०] १. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.