बुधवार, २७ जुलै, २०१६

राज्यसेवा सराव प्रश्नपत्रिका - ४

राज्यसेवा सराव प्रश्नपत्रिका - ४ 

१] - - - - --  - मात्र अष्म युगानंतर लगेचच लोह युगाची सुरवात झाली, आणि मध्यंतरीच्या काळातील ताम्र युगाच्या खुणाही सापडत नाही.
१] उत्तर भारतामध्ये
२] पश्चिम भारतामध्ये
३] दक्षिण भारतामध्ये
४] पूर्व भारतामध्ये

२] दोन कोरड्या रोट्या, एक पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकीयबद्दल दहा वर्षाची सक्त मजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादकपदाची जाहिरात दिली होती?
१] केसरी २] स्वराज्य ३] वंदे मातरम ४] काळ

३] मुंबई आणि महाराष्ट्र्र यांच्यातील नाते वर्णन करताना ' जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख ' असे वर्णन कोणत्या कवीने केले?
१] अमर शेख २] अण्णाभाऊ साठे ३] प्र. के. अत्रे ४] द. ना. गव्हाणकर

४] खालील विवरनावरून व्यक्ती ओळखा.
१] यांना गंगाधर गाडगीळांसारखे अर्थशात्राचे विद्वान ' आधुनिक भारताचे शिल्पकार ' मानतात.
२] दादाभाई नौरोजी व न्यायमूर्ती रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो.
३] भारतीय जीवनात त्यांनी शेतीचे महत्व जाणले होते.
१] नाना शंकरशेठ २] डॉ भाऊ दाजी लाड ३] भाष्कर तर्खडकर ४] दादोबा पांडुरंग

५] खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.
१] ते पक्के महाविदर्भवादी होते.
२] महाविदर्भास उपप्रांताचा दर्जा द्यावा हि धनंजयरावांची कल्पनाही त्यांना मेनी नव्हती.
३] त्यांना महाविदर्भ हे स्वतंत्र राज्य असावे असे सतत वाटत असे.
१] बॅरिस्टर रामराव देशमुख २] ग. त्रय. माडखोलकर ३] डॉ मुकुंदराव जयकर ४] बापूजी अणे

६] पुणे - - - - - येथे उत्सव साजरा केल्यावर दहा दिवसातच पुण्याचे कलेक्टर श्री रॅड व दुसऱ्या अधिकाऱ्याची सरकारी घरातून परत येताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
१] शिवाजी २] गणपती ३] दुर्गा ४] नवरात्री

७] तरुण बंगाली यंग इटलीशी परिचित होते - - - - - - - यांच्या भाषणातून त्यांचा यंग इटलीशी परिचय झाला होता.
१] सुरेंद्रनाथ बॅनर्जी २] रवींद्रनाथ टागोर ३] स्वामी विवेकानंद ४] राजा राम मोहन राय

८] प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी हि आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हंटले आहे?
१] डॉ राधाकृष्णन २] कोठारी आयोग ३] हंटर आयोग ४] वरीलपैकी एकही नाही

९] खालील विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले, कारण
१] भारतीय नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित असे
२] ग्रीकांची नाणी आकर्षक होती.
३] ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती.
४] भारतीय नाणी अहतमुद्रा पद्धतीची असत.
१] १ आणि २ बरोबर असून ३ आणि ४ चूक आहेत. २] १ आणि २ चूक असून ३ आणि ४ बरोबर आहेत.
३] चारही कारणे चुकीची आहेत. ४] चारही कारणे बरोबर आहेत

१०] पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला?
१] बॅरिस्टर जिन्ना २] सर सय्यद अहमद ३] मुहम्मद इकबाल ४] रहमत खान

११] ख्रिस्तपूर्व ३२३ मध्ये बॅबिलोन येथे अलेक्झांड्रिया मृत्यू झाल्याची बातमी आली आणि - - -- - - आणि - - - - -- यांनी लोकांना परकीय आक्रमका विरुद्ध भडकवले.
१] चंद्रगुप्त, चाणक्य २] अशोक, बिंदुसार ३] चंद्रगुप्त, बिबीसार ४] अशोक, राधागुप्त

१२] पुढील विधानात कोणाचे वर्णन केले आहे?
मुळात तो तुर्कस्तान मधील एक गुलाम होता. त्याच्या लहानपणी एका व्यापाऱ्याने त्याला निशाणपूरला आणले, तिथे त्याला काझी फक्रुद्दीन अब्दुल अझीझ कुफी यांनी विकत घेतले. काझीच्या मुलाने त्याला एका व्यापाराला विकले आणि व्यापाऱ्याने त्याला मुहंमदद घोरीला विकले.
१] कुतुबुद्दीन ऐबक २] बल्बन ३] इखत्यार उद्दीन मुहम्मद ४] अल्तमश

१३] इंग्रजी शिक्षित बंगाली पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द - - - -  --  हा होता.
१] राष्ट्रवाद २] बुद्धिप्रामाण्यवाद ३] पाश्चातिकरण ४] वरीलपैकी एकही नाही

१४] योग्य जोड्या जुळवा.
१] अलावल   १] वैष्णव विषयावरील पुष्कळश्या गीतांचा लेखक होता.
२] अब्दुल्ला खान २] होळीचा सण साजरा करत असे.
३] मीर जाफर ३] मृत्यूशैयेवर असताना याने मुर्शिदाबाद जवळील किर्तीश्वरीच्या मूर्तीवरील पाण्याचे काही थेंब प्यायले होते.
४] दौलतराव सिंधिया ४] हिरवे कपडे घालून मोहरमच्या मिरवणुकीत सामील झाले आहे.
१] १,३,२,४ २] १,२,३,४ ३] २,४,१,३ ४] ३,१,२,४

१५] पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा.
१] चाणक्य २] विष्णुगुप्त ३] रामगुप्त ४] कौटिल्य ५] विष्णू शर्मा ६] पक्षीण स्वामी
१] १ आणि ५, २] २,३,६ ३] फक्त ४ आणि ५ ४] फक्त ३ आणि ५

१६] खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
१] नजीकच्या काळातील संशोधन असे दर्शविते कि भारतीय व आशियाई तबकांच्या अभिसरणामुळे भूखंडकवचाचे हिमालयीन प्रदेशाचे ५०० किमी ने संक्षेपण झालेले आहे.
२] हिंद महासागराच्या सागर तळाचा महासागरी काटकापासून विस्तार झालेलाही दिसतो.
१] १ आणि २ २] १ बरोबर २ चूक ३] १ चूक २ बरोबर ४] १ आणि २ चूक

१७] भारतातील जलसिंचनासंदर्भात खालीलपैकी कोणते\कोणती विधाने सत्य आहेत.
१] फिरोज शहा तुघलकने सुदर्शन सरोवर बांधले होते.
२] पुण्य गुप्तने पश्चिम यमुना कालवा बांधला.
१] विधान १ २] विधान २ ३] विधान १ आणि २ ४] एकही विधान नाही

१८] खालील दोन विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे?
१] चुंबकीय अनुनाद प्रतिमा [MRI] शरीराच्या कोणत्याही भागाची छेद प्रतिमा निर्माण करते.
२] सी टी स्कॅन क्ष किरण व एम आर आय पेक्षा उच्च दर्जाची आहे.
१] फक्त १ २] फक्त २ ३] दोन्हीही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

१९] खालील वाक्ये वाचा आणि दिलेल्यापैकी योग्य पर्याय निवडा :
१] एल निनो म्हणजे फक्त उष्ण विषुवृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय.
२] एल निनो म्हणजे बाल ख्रिस्त होय.
३] एल निनो म्हणजे डिसेंबर मधील नाताळाच्या ख्रिसमसच्या काळात दिसणारा प्रवाह होय.
४] एल निनो, भारतामध्ये दीर्घकाळासाच्या मान्सून पर्जन्याच्या अंदाजासाठी वापरण्यात आणला जातो.
१] विधान ३ हे असत्य आहे.
२] विधाने २ आणि ३ हि असत्य आहेत.
३] विधान ४ हे असत्य आहे.
४] सर्व विधाने सत्य आहेत.

२०] पुढील शिखरे उंचीच्या उतरत्या क्रमाने लावा :
१] नंदा देवी ब] कांचनगंगा ३] गंगोत्री ४] बद्रीनाथ ५] नंगा पर्वत
१] २,१,५,३,४ २] २,५,१,३,४ ३] २,५,१,४,३ ४] १,२,५,४,३

२१] कोणत्या लोकांच्या गटास अचुवा असे म्हणतात?
१] बुशमेन २] पिग्मी ३] एस्किमो ४] नागा

२२] ज्यांनी सर्वसामान्य मनुष्य निर्माण केला ते आर के लक्ष्मण रोज सकाळी वाचकांना हसवीत.
त्यांनी निर्माण केलेला ' सर्वसामान्य मनुष्य '.
१] चष्मा वापरायचा व चेकचा कोट घालायचा
२] टक्कलवाला होता व हाफ पॅन्ट घालायचा
३] आकर्षक केस रचना होती, परंतु धोतर नेसायचा
४] गुळगुळीत दाढी केलेली असायची व व्यवस्थित पोशाखात असायचा

२३] कसोटी सामने कधी कधी कंटाळवाणे व एकसुरी होतात, ज्यात एक बाजू दिवसभरापेक्षा जास्त बल्लेबाजी करते. परंतु भारताच्या संपूर्ण चमूची एकदा १९५२ मध्ये कसोटी सामन्यात एकाच दिवसात दोनदा गच्छन्ती झाली. आपण कोणाविरुद्ध खेळत होतो?
१] इंग्लंड २] ऑस्ट्रेलिया ३] वेस्ट इंडिज ४] न्यूझीलंड

२४] खालील वर्णनावरून नदीचे नाव ओळखा :
१] ह्या नदीचा उगम मानसरोवराच्या दक्षिणेस गुरला मनधाता शिखर येथे होतो.
२] पश्चिम नेपाळमध्ये हिला करलानी असे म्हणतात.
३] सारदा, सरजू, राप्ती, ह्या तिच्या उपनद्या होत.
४] बिहार मधील छपरा येथे हि नदी गंगेला येऊन मिळते.
१] घागरा २] गंडक ३] गोमती ४] काली

२५] भारतामध्ये जलविदयुत ऊर्जा विकासाची सुरवात म्हणून, - - - - - - - जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची १३० kw उभारणी करण्यात आली होती.
१] दार्जिलिंग [पश्चिम बंगाल] - १८८७
२] रावतभाटा [राजस्थान] - १८९६
३] काकरापारा [गुजरात] - १८०९
४] नरोरा [उत्तर प्रदेश] - १९३९

२६] भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात ९०% पेक्षा जास्त हिंदूंची लोकसंख्या आहे?
१] मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश २] मध्यप्रदेश, हिमाचलप्रदेश, उत्तरप्रदेश ३] हिमाचलप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ ४] पंजाब, उत्तरप्रदेश, छत्तीसगढ

२७] टिकिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर - - - - - - देशामध्ये वसले आहे.
१] पेरू आणि बोलिव्हिया २] अर्जेंटिना आणि चिली ३] इक्वाडोर आणि कोलंबिया ४] चिली आणि बोलिव्हिया

२८] महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर एकाही राष्ट्रीय महामार्गावर नाही?
१] चाळीसगाव २] धुळे ३] संगमनेर ४] औरंगाबाद

२९] भारताच्या भूसीमा - - - - -- या देशांना भिडतात.
१] सात २] आठ ३] सहा ४] नऊ

३०] पुढील कोणते विधान योग्य आहे?
१] पृथ्वी पूर्वेकडे पश्चिमेकडे फिरते.
२] पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
३] पृथ्वी दक्षिणेकडे उत्तरेकडे फिरते.
४] पृथ्वी उत्तरेकडे दक्षिणेकस फिरते.

३१] झाडांच्या उंचीनुसार खाली दिलेल्या जंगलाच्या प्रकारांची चढत्या क्रमाने मांडणी करा.
१] उष्णकटिबंधीय जंगले २] पानझडी वने ३] सूचिपर्णी जंगले
१] ३,१,२ २] २,३,१ ३] १,३,२ ४] २,१,३

३२] ph मापणी हि पाणी द्रावणाची आमलत्ता व अल्कधर्मीता मोजण्याकरिता वापरली जाते. ही मापणी हायड्रोजन आयन [H+] चे संकेंद्रनावर आधारित असते. खालीलपैकी काय आमल नाही?
१] केळी २] रक्त ३] दूध ४] टोमॅटो

३३] जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे [२०११] खालीलपैकी कोणता देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जन करतो?
१] यु. एस. ए २] रशिया ३] भारत ४] चीन


उत्तरे - १] ३, २] २, ३] २, ४] १, ५] ४, ६] १, ७] १, ८] १, ९] ४, १०] ४, ११] १, १२] १, १३] २, १४] २, १५] ४, १६] १ १७] ४, १८] १, १९] ४, २०] ३, २१] २, २२] १, २३] १, २४] १, २५] १, २६] ३, २७] १, २८] ४, २९] १, ३०] २, ३१] २, ३२] २, ३३] ४. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.