मंगळवार, ५ जुलै, २०१६

वैदिक संस्कृती

वैदिक संस्कृती 

* वैदिक संस्कृतीला हिंदू संस्कृती असे देखील म्हटले जाते इसवी सण १५०० ते इसवी ६०० हा या  संस्कृतीचा कालखंड होता.

* इसवी सण १५०० ते १००० या ठिकाणी आर्याचे आगमन झाले.

* वैदिक कालखंड - पूर्ववैदिक कालखंड - ऋग्वेदीय कालखंड, उत्तर वैदिक कालखंड, ऋग्वेदोत्तर वैदिक कालखंड.

* इंडो युरोपियन लोक - प्रस्थापित मतानुसार हिन्दुस्तनबाहेर ज्यांची मूळ भूमी असल्याचे मानण्यात आले आहे, जे आद्य आर्यभाषा आद्य संस्कृती बोलत असत असे लोक होत.

* इंडो आर्यन लोक - इंडो युरोपियन भाषाकुळातील संस्कृत भाषा बोलणारे लोक म्हणजे इंडो आर्यन लोक होत.

* इंडो युरोपियन भाषाकुल - आद्य आर्यभाषा किंवा आद्य संस्कृत भाषा ज्यांच्या पितृस्थानी आहे. अशा भाषांचा गट म्हणजे इंडो युरोपियन भाषाकुल होय.

* इंडो युरोपियन भाषा - संस्कृत, ग्रीक, लॅटिन, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, काश्मिरी, हिंदी, मराठी, गुजराथी.

* संस्कृत भाषा व भारताबाहेरील युरोपीय भाषा यांच्यातील साम्य प्रथमतः नजरेस आणणारी युरोपीय व्यक्ती फिलीप्पो सास्सेटी हा होय.

* आर्याचे मूळ स्थान हिंदुस्थनांबाहेर आहे असे मानणारे विद्वान - मॅक्स मुल्लर, के एम पन्नीकर, स्वामी दयानंद सरस्वती, लोकमान्य टिळक.

* हिंदुस्तान हेच आर्याचे मूळ स्थान असल्याचे मत मांडणारे विद्वान - डॉ. के एम मुन्शी, डॉ संपूर्णानंद, डॉ बी आर आंबेडकर, श्रीकांत तलगोरी.

* हिंदुस्तान बाहेरील आर्याचे मूळ स्थान मानले गेलेले काही प्रदेश  - कॉकेशस पर्वतीय प्रदेश, इराण, लिथुआनिया, उत्तर ध्रुवीय
.
* सप्तसिंधू - ऋग्वेदीय आर्याची भूमी. या भूमीशी संबंधित सात नद्या - सिंधू, वितस्ता, अशिवानी, परुष्णी, शुतुद्र, व्यास, सरस्वती.

* चार वेद - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद.

* काही ब्राह्मणे - ऐतरेय ब्राह्मण, कौषीतकी ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण.

* आरण्यके - इतरेयारण्यक, शांखायारण्यक, तैत्तिरीयारण्यक, बृहदारण्यक.

* उपनिषदे - ऐतरेय, ईश, केन, कठ, प्रश्न, मांडुक्य, छंदोग्य, मुंडक, बृहदारणक, तित्तिरिय इत्यादी १०८ उपनिषदे.

* उपवेद - आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, शिल्पवेद.

* वेदांडगे - शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष.

* वेदांचे काही भाष्यकार - यास्क, उव्वाट, सायनाचार्य.

* चार वर्ण - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र.

* चार आश्रम - ब्रह्मचर्यश्रम, गहृस्थाश्रम, वाणप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम.

* चार पुरुषार्थ - धर्म, अर्थ, काम, मोक्ष.

* वैदिक देवता - स्वर्ग देवता, पृथ्वीवरील देवता, अंतरिक्ष देवता.

* वेदकालीन प्रातिनिधिक संस्था - सभा, समिती.

* धर्मसूत्र वाङमयात उल्लेखलेले विवाहांचे प्रकार - ब्राह्मण, दैव, प्रजापत्य, आर्ष, आसुर, पैशाच, राक्षस, गांधर्व.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.