बुधवार, ६ जुलै, २०१६

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज १६३०-१६८०

शिवाजी महाराज

* शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली झाला.

* पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ शिवनेरी किल्ला या ठिकाणी शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे.

* सिंदखेडचे लखोजी जाधव यांची कन्या जिजाबाई ही शिवाजी महाराजांची आई.

* शहाजीराजे हे शिवाजी महाराजांचे पिता.

* स्वराज्य स्थापनेची शपथ १६४६ - पुण्याजवळील भोर तालुक्यातील रायरेश्वर या जागृत देवस्थानात बालशिवाजीने स्वराज्यस्थापनेची शपथ घेऊन आपल्या कार्याला सुरवात केली.

शिवाजी महाराज : ठळक घटना 

* तोरणा किल्ला हस्तगत - १६४६ मध्ये आपल्या जहागिरीची व्यवस्था लावण्याचा एक भाग म्हणून दुर्लक्षित असलेला तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.

* पुरंदरची लढाई - १६४९ साली स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नशील पहिल्या लढाईत राजांनी विजापूरच्या सरदार फत्तेखानाचा पराभव केला. येथून पुढे राजा व विजापूरची आदिलशाही यांच्यात उघड शत्रुत्वाचा प्रारंभ झाला.

* जावळीच्या चंद्रकांत मोरेचा पारिपत्य  [१६५६] - महाबळेश्वरचा डोंगर व सह्यांद्रीची रांग यातील अतिशय दुर्गम व मोक्याचा प्रदेश प्रदेश म्हणजे तत्कालीन जावळी प्रांत. या भागाचा अधिपती विजापूरशी निष्ठा ठेवणारा चंद्रकांत मोरे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा म्हणून मानत नसे. या प्रदेशाचे मोक्याचे स्थान लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रकांत मोरेंचे परिपात्य करून त्याला ठार मारले. व जावळी प्रांत स्वराज्यात सामील केला.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.