सोमवार, २५ जुलै, २०१६

राज्यसेवा सराव प्रश्नपत्रिका - २

राज्यसेवा सराव प्रश्नपत्रिका - २

१] पुढीलपैकी दोन विधानापैकी कोणते विधान बरोबर?
१] भारतातील बहुतांशी भागात राज्य उत्पादन विभागाच्या परवानगी शिवाय घरी दारू बनविणे बेकायदेशीर आहे?
२] भारतात केवळ स्वतःच्या वापराकरिता [ परवानगी शिवाय ] घरी दारू केली जाऊ शकते.
१] केवळ १ योग्य आहे २] केवळ २ योग्य आहे ३] कोणतेही योग्य नाही ४] दोन्ही योग्य आहेत

२] कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे [ हम दो हमारे दो ] कोणत्या धोरणाच्या दोन उदिष्टापैकी एक आहे?
१] कुटुंब नियोजन कार्यक्रम १९५२ २] वीस कलमी कार्यक्रम ३] राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० ४] नवीन लोकसंख्या धोरण

३] २००० च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार कुठल्या वर्षापर्यंत आपल्या देशाची लोकसंख्या स्थिर होण्याचे उद्दिष्ट आहे?
१] २०४६ सालापर्यंत २] २०५० सालापर्यंत ३] २०४९ सालापर्यंत ४] २०४७ सालापर्यंत

४] लिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलांविषयीच्या ज्या तीन परिणामांचा समावेश होतो ती म्हणजे
१] सरासरी आयुर्मान शैक्षणिक यशप्राप्ती आणि उत्पन्न\मिळकत २] शिक्षण, आर्थिक सहभाग आणि आर्थिक संसाधननी मालकी ३] जननक्षम आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रामबाजारातील सहभाग ४] वरीलपैकी एकही नाही

५] जनगणना २०११ नुसार शहरी लोकसंख्या आणि दारिद्रय रेषेखाली असणारी लोकसंख्या यांचा सहगुणांक - ०.३९ इतका आहे. हि बाब असे दर्शविते की
१] ज्या पद्धतीचे शहरीकरण झाले आहे त्याचा गरिबी घटविण्यासाठी फारसा काही परिणाम झाला नाही
२] शहरीकरणाचा गरिबी घटविण्यासाठी फार खोलवर परिणाम झाला आहे.
३] शहरीकरणामुळे गरिबीत वाढ झाली आहे.
४] वरीलपैकी कोणताही नाही

६] शिक्षण हक्क कायदा २००९ चा मुख्य उद्देश खालीलपैकी आहे?
१] निरक्षरता निर्मूलन २] सर्वांना व्यापक प्रमाणात आणि आवश्यक शिक्षण ३] ६ ते १४ वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण ४] वरील सर्व

७] भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्विकारले?
१] आर्टिकल ३६ २] आर्टिकल ४६ ३] आर्टिकल ३९ ४] वरीलपैकी एकही नाही

८] भारतीय रिझर्व बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे?
१] ८५ कोटी २] ११५ कोटी ३] २०० कोटी ४] वरीलपैकी एकही नाही

९] ९ व्या व १० व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता?
१] ४% व ५% अनुक्रमे २] ५% व ७% अनुक्रमे ३] ४% व ७% अनुक्रमे ४] ७% व ५% अनुक्रमे

१०] राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशीष्ट्ये होते?
१] १० वी पंचवार्षिक योजना २] ८ वी पंचवार्षिक योजना ३] १२ वी पंचवार्षिक योजना ४] ११ वी पंचवार्षिक योजना

११] सकल प्रजनन/पुनरुत्पादन दर म्हणजे
१] लग्नापासून स्त्रीने जन्म दिलेली एकूण बालके
२] एका वर्षात जन्मलेली बालके वजा मृत बालके
३] जन्म दर वजा मृत्यू दर
४] स्त्रीच्या संपूर्ण जननकाळात जिवंत प्रसूती झालेली नवजात अर्भके

१२] व्यावसायिक शितगृहात, लोणी किती तापमानावर ठेवले जाते?
१] ० सें २] - २० सें ३] ४ सें ४] - ४ सें

१३] लेसरच्या साहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात?
१] रडार २] सोनार ३] लेडार ४] लिडार

१४] फळांच्या व भाज्यांच्या वितंचकीय तांबुसीकरणास तपाकिरीपणा कारणीभूत मुख्य वितंचक कोणते?
१] पेरॉक्सीडेज २] पॉलिफेनॉल ऑक्सिडेज ३] कॅटेलॉज ४] कोलेस्ट्रॉल ऑक्सिडेज

१५] - - -  - - - - च्या साहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठविणे शक्य आहे?
१] भूस्थिर उपग्रह २] अतंरंग तरंग प्रसारण ३] भू - तरंग प्रसारण ४] अणू तरंग
१] फक्त १ २] फक्त १,२,३ ३] फक्त १ आणि ३ ४] फक्त ४

१६] सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लास्टिक फिल्म कशाची असते?
१] पॉलिएथिन २] पॉलिस्टायरिन ३] पॉलिप्रोपिलीन ४] पॉली व्हिनाईल क्लोराईड

१७] अतिनील किरणे - - - - - -  मधून आरपार जाऊ शकत नाहीत?
१] कांच २] क्वार्ट्झ ३] फ्ल्युओराइट ४] रॉक सॉल्ट
१] फक्त १ २] फक्त ४ ३] २,३, आणि ४ ४] फक्त २ आणि ४

१८] दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?
१] वस्तुभिंग २] संयुक्त नेत्रभिंग ३] विशालक ४] वरीलपैकी एकही नाही

१९] पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहा Ek इतकी ऊर्जा आहे. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर निसरण्यासाठी किमान केवढी ऊर्जा दिली पाहिजे?
१] Ek\४ २] Ek\२ ३] Ek ४] २Ek

२०] सन २००६ सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला\सूर्यमालिकेतील ग्रह मानले जात नाही, परंतु बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते?
१] बुध २] युरेनस ३] नेपच्यून ४] प्लूटो

२१] ऑक्सीश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती भूमिका बजावतो?
१] इलेक्ट्रॉन दाता २] इलेक्ट्रॉन ग्राही ३] प्रोट्रॉन दाता ४] प्रोट्रॉन ग्राही

२२] अतिश्रमामुळे स्नायूदेखील खालीलपैकी कोणते रसायन जवाबदार असते?
१] लॅक्टिक आल्म २] इथेनॉल ३] फॉरमिक आल्म ४] अस्कॉर्बिक आल्म

२३] खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
१] गर्द पिवळा मूत्र - मेल्यान्यूरिया २] रंगहीन मूत्र - निर्जलीकरण ३] रक्तरंग मूत्र - हिम्याच्युरिया ४] हिरवट रंगाचे मूत्र - बिट खाल्यामुळे

२४] खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास ' अग्रिमायसिन ' वापरतात......
१] कवक आजार २] विषाणू आजार ३] जिवाणू आजार ४] कवकविद्राव्य आजार

२५] पचनसंस्थेमध्ये मुख ते गुदद्वार ह्या मार्गामध्ये ph मध्ये काय बदल होत जातो?
१] अल्कली - अल्क - अल्कली २] आल्म - अल्कली - आल्म ३] आल्म - अल्कली ४] अल्कली - आल्म

२६] खालीलपैकी मायक्रोन्यूट्रियंट कोणते आहे?
१] मॅग्नेशियम २] मॉलीबडेनियम ३] बोरॉन ४] झिंक

२७] ग्लुकोजमध्ये कार्बनचे प्रमाण - - - - - एवढे आहे?
१] ४०% २] ५३% ३] ४५% ४] ५५%

२८] पुरातनकाळापासून वनस्पती आजार बरे करण्यास्तव व आरोग्य सुदृढीस्तव व वापरली गेली आहेत.
आपल्या उपचार पद्धतीतील अर्ध्यापेक्षा अधिक औषधे वनस्पतीजन्य आहेत.
भारतीय औषधी वनस्पतीच्या शब्दावलीत ३००० वनस्पती आहेत, वनस्पती आहेत. वनस्पतीचा कोणता भाग सर्वात अधिक औषधीयुक्त म्हणून वापरला जातो?
१] मुळे २] साल ३] पाने ४] बिया

२९] पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आल्म-क्षार [ ऍसिड - बेस ] संतुलन राखते?
१] कॅल्शियम २] सोडियम ३] पोटॅशियम ४] लोह

३०] रासायनिक पदार्थाचा आद्रताग्राही स्वभावगुणधर्म दर्शवितो कि तो चांगला
१] ऑक्सिडीकारक अभिकर्ता २] निर्जलन अभिकर्ता ३] क्षपणकारक अभिकर्ता ४] क्लिष्टीकरण अभिकर्ता

३१] महाराष्ट्राचे शासनाचे प्राणी संधारण सुधारणा बिल १९९५ ज्याला राष्ट्रपतींची मान्यता एक महिन्यापूर्वी मिळाली खालील कोणत्या प्राण्यांना वगळते जेणेकरून त्यांची कत्तल केली जाऊ शकते?
१] बैल व सांड २] गायी व वासरे ३] म्हैस व तिचे बछडे ४] वरील एकही नाही

३२] महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती?
१] नर्मदा २] कावेरी ३] गोदावरी ४] कोणतेही नाही

३३] अल्फा कण यांनी शोधून काढले?
१] जे जे थॉमसन २] अल्बर्ट आईन्स्टाईन ३] ई रुदरफोरर्ड ४] मादाम क्युरी

३४] सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष - - - - - - - -  हे असते?
१] १ एप्रिल ते ३१ मार्च २] १ जानेवारी ते ३१ डिसेंबर ३] १ जुलै ते ३० जून ४] १ मे ते ३० एप्रिल


उत्तरे - १] १, २] ३, ३] २, ४] ३, ५] १, ६] ३, ७] २, ८] २, ९] १, १०] १, ११] ४, १२] २, १३] ४, १४] २, १५] १, १६] १, १७] १, १८] २, १९] ३, २०] ४, २१] २, २२] १, २३] ३, २४] ३, २५] ३, २६] १, २७] १, २८] १, २९] २, ३०] २, ३१] ३, ३२] ४, ३३] ३, ३४] १,

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.