बुधवार, ६ जुलै, २०१६

शिवाजी महाराजांच्या लढाया

प्रतापगढची लढाई : १६५९

* विजापूरचा मातब्बर सरदार अफझलखान हा छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा निर्धार करून प्रचंड फोजेनीशी राजावर चालून आला.

* राजांनी मोठे डावपेच लढवून अफझलखानचा प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीस बोलावले. राजांच्या योजनेप्रमाणे भेट झाली व नंतरच्या झटापटीत राजांनी अफझलखानाला ठार मारले. [ १६ नोव्हेंबर १६५९ ].

* अफझलखान व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीप्रसंगी उपस्थित असलेले त्यांचे वकील - कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खानाचा वकील. पंताजी गोपीनाथ छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील.

* भेटीच्या शामियान्याबाहेरील दोघांचे अंगरक्षक - सय्यद बंडा - खानाचा अंगरक्षक, संभाजी कावजी - राजाचा अंगरक्षक.

पन्हाळा किल्ल्यातून सुटका : १६६०

* रुस्तुमेज या विजापूरच्या सरदाराचा पराभव १६५९ करून विजापुरी सरदार सिद्दी जोहर राजावर चालून आला.

* त्याच्याबरोबर अफझलखानचा मुलगा फाझलखानही होता.

* राजे पन्हाळा किल्ल्यात असताना विजापुरी सैन्याने पन्हाळ्यास वेढा घातला.

* पण राजांनी मोठ्या हिकमतीने पन्ह्याळ्याहून निसटून विशाळगडाकडे यशस्वी प्रयाण केले.

* राजांचा पाठलाग करणाऱ्या विजापुरी सैन्याला बाजीप्रभू देशपांडे याने घोडखिंडीत - पावनखिंडीत रोखले.

* लढाईत बाजीप्रभू बलिदान झाले. राजे मात्र विशाळगडावर सुखरूप पोचले.

शाहिस्तेखानाचा पराभव १६६०-१६६३

* मोगल सरदार शाहिस्तेखान याने स्वराज्यावर आक्रमण करून पुण्यात तळ ठोकला.

* त्याचा एक मातब्बर सरदार कारतलबखान याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वी डावपेच आखून उंबरखिंडीच्या लढाईत पराभव केला.

* नंतर पुढे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात शाहिस्तेखान राहत असलेल्या लालमहालावर अचानक छापा घातला.

* या छाप्यात खान वाचला, पण त्याची बोटे राजांनी चाटून टाकली. या घटनेमुळे मोगल सत्तेची प्रतिष्ठा गेली.

* शाहिस्तेखानाला औरंगजेबने बोलावून घेतले व त्याची नेमणूक बंगालमध्ये केली.

सुरत हल्ला व लूट 

* शाहिस्तेखानाच्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराजांनी मोगलांचे वैभवशाली शहर व बंदर असलेल्या सुरतवर हल्ला केला व ते शहर लुटले.

पुरंदरचा तह : १६६५

* शाहिस्तेखानाचा पराभव व सुरतेची लूट या पार्श्वभूमीवर सम्राट औरंगजेबने राजांच्या बंदोबस्तासाठी मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान या मातब्बर सरदारांना दख्खनमध्ये पाठविले.

* त्यांनी झपाट्याने स्वराज्याची सर्व बाजूनी नाकेबंदी केली, अखेरीस स्वराज्याच्या हिताच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांशी तह केला.

* या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःकडे तोरणा, राजगड, रायगड, इत्यादी फक्त १२ किल्ले ठेवले.

* तर मोगलांना पुरंदर, सिंहगड, लोहगड, कर्नाळा, माहुली, प्रबळगड इत्यादी फक्त १२ किल्ले ठेवले.

* या तहानुसार राजांनी मोगलांविरुद्ध बंडखोरी न करण्याचे व आदिलशाही विरुद्धच्या कारवाईत मोगलांना मदत करण्याचे मान्य केले.

* या तहामुळे स्वराज्यचा वाटचालीमुळे खंड पडला, तरी स्वराज्याचे अस्तित्व काही प्रमाणात टिकून राहिले.


आगऱ्यातून सुटका १६६५ 

* पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनमध्ये न राहता, उत्तरेत औरंगजेबाच्या भेटीस जावे ही मिर्झाराजे जयसिंगाची इच्छा होती.

* छत्रपती शिवाजी महाराज मोगलांविरुद्ध विजापूरशी हातमिळवणी करतील, अशी जयसिंगाची भीती होती.

* या पार्श्वभूमीवर राजांची आग्राभेट ठरली. आग्ऱ्याला जाण्यापूर्वी कारभाराची सूत्रे जिजाबाईंकडे सोपविण्यात आली व त्यांच्या मदतीस मोरोपंत पिंगळे, निळोपंत मुजुमदार व प्रतापराव गुजर यांना नेमण्यात आले. राजाबरोबर राजपुत्र संभाजीही आग्ऱ्याला गेला.

* परंतु आग्रा येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून युक्ती साहस व योजकता यांच्या जोरावर राजांनी मिठाईच्या पेटाऱ्यातून बसून स्वतःची व राजपुत्र संभाजींचीही आग्रा येथील नजरकैदेतून सुटका करून घेतली.

* १७ ऑगस्ट १६६६ मध्ये आग्ऱ्यातून सुटका झाली व १२ सप्टेंबर १६६६ ला राजगड येथे आगमन.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.