बुधवार, ६ जुलै, २०१६

भारत : मध्ययुगीन इतिहास

भारत : मध्ययुगीन इतिहास 

दिल्लीची सुलतानशाही 

सुलतानशाहीपूर्व काळ :-

* सुलतानशाहीपूर्व काळातील महत्वाची रजपूत घराणी - प्रतिहार, चौहान, सोळंकी, गुहिलोत, परमार.

* अरब आक्रमण - बगदादच्या खलिफाचा अरब सेनापती मुहंमद बिन कासीमचे सिंधवर आक्रमण, सिंधचा राजा दाहीर यांचा पराभव.

* सिंध व त्याच्या उत्तरेकडील मुलतान अरब प्रभावाखाली, अरब आक्रमकांना यशस्वी प्रतिकार करणारा महत्वाचा राजपूत राजा - चितोडचा राजा बाप्पराजवळ.

तुर्की आक्रमणापूर्वीच्या महत्वाच्या राजसत्ता :-

* कश्मीर - लोहार राजवंश.

* पंजाब - शाही राजवंश.

* कनौज - प्रतिहार राजवंश.

* माळवा - परमार राजवंश.

* बुंदेलखंड - चंदेल राजवंश.

* गुजरात - चालुक्य राजवंश.

* मेवाड - गुहिलोत राजवंश.

* बंगाल - सेन राजवंश.

* आसाम - प्रालंभ राजवंश.

* मगध - पाल राजवंश.

* देवगिरी महाराष्ट्र - यादव राजवंश.

* आंध्र - काकतीय राजवंश.

* कर्नाटक - होयसळ राजवंश.

* तामिळनाडू - चोल राजवंश.

तुर्की आक्रमण :-

* सुलतान सबुक्तगीन - इसवी ९७७ ९९७ या कालखंडात सबुकतगिनने भारतावर स्वाऱ्या केल्या.

* सुलतान महमूद गझनी - इस्लामचा प्रसार करणे व लुटालूट करणे. भारतावर सतरा स्वाऱ्या करणे. सोरटी सोमनाथवर गुजरातवर स्वारी प्राचीन समृद्ध मंदिराचा विध्वंस व प्रचंड लूट.

* जिंकलेला प्रदेश - पंजाब, मुलतान व पूर्वेस कनौज मथूरेपर्यंतचा प्रदेश.

* महमूदच्या उपाध्या - गाझी, धर्मयोद्धा, बुतशिकन.

* महंमदाबरोवबर भारतात आलेला अरब विद्वान - अल्बिरुनी.

मुहंमद घोरी गझनी :-

* तराईची पहिली लढाई - या लढाईत दिल्लीचा राजा पृथ्वीराज चौहान याने मुहमंद घोरीचा पराभव केला.

* तराईची दुसरी लढाई - या लढाईत घोरीने पृथ्वीराजाला पराभूत करून व पुढे त्याला ठार मारण्यात आले.

* दिल्ली, पूर्व राजस्थान त्याने ताब्यात घेतले.

* पूर्वेस बंगालपर्यंतचा प्रदेश तुर्कांनी जिंकला. तुर्की सरदार बख्त्यार खल्जी याने नालंदा व विक्रमशिला या प्राचीन बौद्ध विद्यापीठाचा विध्वंस केला.

दिल्लीची सुलतानशाही 

* गुलाम राजवंश - कुतुबुद्दीन ऐबक १२०६-१०, अल्तमश किंवा इल्तमश १२१०-३६, सुलताना रझिया १२३६-३९, नासिरुद्दीन बल्बन.

* खलजी राजवंश - जलालद्दीन खिलजी १२९०-९६, अल्लुद्दीन खिलजी १२९६-१३१६.

* तुघलक राजवंश - घियासुद्दीन तुघलक १३२०-२५, मुहंमूद बिन तुघलक १३२५-५१, फिरुज तुघलक १३५१-८८.

* सय्यद राजवंश - खिजर खान १४१४-२१, मोहंमद शहा १४३४-४५.

* लोदी राजवंश - बहसोल लोदी १४५१-८९, सिकंदर लोदी १४८९-१५१७, इब्राहिम लोदी १५१७-२६.

सुलतानशाही : विशेष घटना 

* अल्तमशच्या कारकिर्दीतील हिंदुस्थानावर झालेले परकीय आक्रमण - मध्य आशियातील चंगिस्तानचे मंगोल आक्रमण.

* दिल्लीच्या सिंहासनावरील पहिली स्त्री राज्यकर्ती - सुलताना रझिया.

* साध्या राहणीसाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्लीचा सुलतान - नासिरूद्दीन महमूद.

* सुलतान बल्बनचा आश्रयास असलेल्या प्रख्यात कवी व संगीततज्ञ - अमीर खुश्रो.

* दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती - अलाऊद्दीन खलजी.

* दिल्लीवून दौलतबादच्या राजधानी नेण्याच्या अयशस्वी प्रयत्न करणारा सुलतान - मुहंमूद बिन तुघलक.

* तांब्याच्या नाण्याच्या चलन म्हणून वापर करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारा सुलतान - मुहंमद बिन तुघलक.

* मुहंमद बिन तुघलकच्या काळात भारतात आलेला आफ्रिकी मुस्लिम प्रवासी - इब्न बतूता.

* तुघलक कालखंडात भारतावर आक्रमण करणारा १३९८ व दिल्ली लुटून कत्तली करणारा मध्य आशियाई सुलतान तैमूरलंग.

* दिल्लीच्या सुलतानशाही कालखंडातील शेवटचा राजवंश व शेवटचा सुलतान - लोदी राजवंश इब्राहिम लोदी.

* सुलतान इब्राहिम लोदीचा पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभव करणारा व सुलतान शाही राजवटीचा सुलतानशाही राजवटीचा अंत करणारा अफगाणिस्तानचा तुर्की सुलतान - जाहिरउद्दीन मुहंमद बाबर. 
 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.