मंगळवार, ५ जुलै, २०१६

दक्षिण भारतातील राजवंश व राज्ये

दक्षिण भारतातील राजवंश व राज्ये 

* महत्वाचे राजवंश - चोल, पाण्ड्य, चेर, सातवाहन.

* तामिळभाषिक प्रदेशातील पेन्नार व वेलार नद्यांच्या प्रदेशातील चोल राज्याचे नाव - चोल मंडलम.

* चोलांची पहिली राजधानी - उरैयुर.

* चोल राजवंशकालीन पहिला महत्वाचा राजा - कारिकल चोल.

* करीकाल चोल राजाच्या कारकिर्दीची वैशिष्ट्ये - लंकेवर स्वारी, नदीच्या मुख्य मुखाशी पुहार बंदराची निर्मिती, कावेरी नदीला बांध घालून कालव्याने पाणीपुरवठा, कावेरी पट्टणमला राजधानीशी स्थापना, तामिळ साहित्यनिर्मितीत उत्तेजन.

* महत्वाचा पांड्य राजा - नेंदूजेलीयन या राजाने तामिळ साहित्यास उत्तेजन दिले.

* केरळ मधील चेरराजवंशातील महत्वाचे राजे - चेरल आदण, नेदून चेरल, सेनगुत्तुवन.

* चेर काळातील अन्य विशेष - पॅलेस्टाईनमधून हकालपट्टी झालेल्या ज्यू लोकांच्या केरळमध्ये आश्रय मिळाला, भारतात आलेला पहिला ख्रिस्ती जीवनव्रती सेंट थॉमस हा चेर कालखंड केरळ मध्ये आला.

* सातवाहन राजवंशातील महत्वाचे राजे - सिमुक, हाल, गौतमीपुत्र, सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी, पहिला सातकर्णी.

* सातवाहनांच्या ताब्यातील प्रदेश - महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, माळवा, कर्नाटक काही भाग.

* सातवाहनकालीन राजधन्या - श्रीकाकुलाम, प्रतिष्ठान, धान्यकटक.

* सातवाहनकालीन प्रसिद्ध नगरे - प्रतिष्ठान, तेर, नेवासे, कल्याण, नाशिक, जुन्नर, धान्यकटक.

* सातवहनकालीन लेणी - कार्ले, भाजे, कोंडाणे, बेडसे, जुन्नर, कान्हेरी, नाशिक, पितळखोरे.

* देश व कोकण यांना जोडणारा सातवाहकालीन प्राचीन घाट - नाणेघाट.

* सातवाहन वंशातील पहिला राजा - सिरी सातवाहन.

* आपल्या नावाबरोबर आईचे नाव लावणारा पहिला सातवाहन राजा - गौतमीपुत्र सातकर्णी.

* सातवाहन राजा हालचरीत्र ग्रंथ - गाथा सत्ताई.

* राजा हाल याच्या दरबारातील प्रसिद्ध लेखक - बृहतकथा या ग्रंथाचा कर्ता गुणाढ्य.

* तामिळ भाषेचा उदय - इसवी सन सुमारे दहावे शतक.

* प्राचीन तामिळ वाड्यमयाचे सुवर्णयुग - संगम कालखंड चौथे शतक सन तिसरे शतक तामिळ म्हणजे विद्वान, कवी यांच्या सभा म्हणजे संगम.

* महत्वाच्या तामिळ रचना - तिरुवल्लूवरलिखित कुरल, शीलापडीक्करम व मणीमेखलै, यशोधरा काव्यम, उदयन काव्यम, निलकेशी.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.