गुरुवार, ७ जुलै, २०१६

शिवाजीचे : नवे विजय

शिवाजीचे : नवे विजय 

* मोगलांकडून जिंकून घेतलेले किल्ले - कर्नाळा, रोहिडा, लोहगड, विसापूर, राजमाची, तुंग, तिकोना, पुरंदर,  सिंहगड.

* सिंहगड जिंकणारा व लढताना वीरमरण प्राप्त झालेला प्रसिद्ध मराठा योद्धा : तानाजी मालुसरे.

* सुरतेवर दुसरी स्वारी - १६७० साली मोगलांच्या समृद्ध सुरतेवर राजांनी दुसऱ्यांदा स्वारी केली व ते शहर लुटले.

* कांचनबाईची लढाई - सुरतहून परततांना वाटेत राजांनी नाशिक जिल्ह्यातील कांचनबारीचा बारी म्हणजे खिंड  सरदारांच्या दाऊदखान याचा समोरासमोरच्या मैदानी लढाईत पराभव केला.

* साल्हेर किल्ला जिंकला - मोगलकडून १६७१ साली साल्हेरचा किल्ला जिंकला.

नाविक मोहीमा 

* बसरूरची स्वारी १६६५ - छत्रपती शिवाजी महाराजांनी ८५ गलबते घेऊन कारवार जिल्ह्यातील बसरूर बंदरावर स्वारी केली व ते लुटले.

* खांदेरी बेट - मुंबई बंदरापासून सुमारे १५ सागरी मैल दक्षिणेस खांदेरी व उंदेरी ही दोन छोटी बेटे आहेत. या बेटावरून मुंबई बंदरावरील जहाजांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येते. मराठ्यांनी खांदेरी बेट व्यापल्यामुळे मुंबईस्थित असलेल्या इंग्रजांना नाविक शह मिळाला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.