रविवार, २४ जुलै, २०१६

राज्यसेवा सराव प्रश्नपत्रिका - १

राज्यसेवा सराव प्रश्नपत्रिका - १ 

१] ४ डिसेंबर १९४७ रोजी हैद्राबाद राज्य मुक्ती संग्रामात पुढीलपैकी कोणी निझामवर बॉम्ब टाकुन त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला?
१] देवीसिंह चव्हाण २] दिगंबर कुलकर्णी ३] विनायक विद्यालंकार ४] नारायण पवार

२] चुकीची जोडी ओळखा.
१] शिवाचे मंदिर - भुमरा
२] पार्वतीचे मंदिर - नाच्छ
३] विष्णूचे मंदिर - टिग्वा
४] शिवाच्या कोरीव मूर्ती असलेले गुंफा मंदिर - उदयगिरी टेकड्या

३] उत्तरेकडील पुष्कळशा हिंदू निर्वासितांना या राज्याने आणि शहराने आकर्षित केले आहे. समकालीन वर्णनावरून असे वाटते कि हे शहर श्रीमंत आणि खूप सुंदर असावे, अब्दुल रझ्झाक म्हणतो पृथ्वीतलावर इतरत्र कोठेही असे शहर बघितले नाही, किंवा संपूर्ण पृथ्वीवर असे शहर असे कानांनी ऐकले नाही. या वाक्यातून कोणत्या राज्याचा आणि शहराचा उल्लेख केला आहे?
१] महाबलीपूरम २] कोचीन ३] विजयनगर ४] त्रावणकोर

४] १९३० च्या दशकातील जागतिक महामंदीमुळे पुढीलपैकी काय झाले?
अ] मुंबईची लोकसंख्या घटली.
ब] अहमदाबादमधील कापडगिरण्यांची संख्या घटली.
क] मुंबई गिरणीमालकांनी कामगारांच्या वेतनात ३० ते ५०% कपात केली.
ड] वरील सर्व पर्याय योग्य
१] अ आणि क योग्य आहेत २] ड योग्य आहेत ३] ब आणि क योग्य आहेत ४] अ आणि ब योग्य आहेत

५] '' हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत '' असे जीनांचे वर्णन कोणी केले आहे?
१] महात्मा गांधी २] सरोजिनी नायडू ३] जवाहरलाल नेहरू ४] तेज बहादूर सप्रू

६] अगदी सुरवातीची संस्कृत नाटके त्याने लिहिली. ती ताडपत्रावर लिहिलेली हस्तलिखिते तुकड्यांच्या स्वरूपात खरे तर आहेत, व आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गोबीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुरफान या ठिकाणी सापडली. प्राचीन भारतातील हा कोणता लेखक होता?
१] कालिदास २] भास ३] अश्वघोष ४] विशाखादत्त

७] १९२६ साली मुंबई कायदेमंडळात - - - -  - - - - यांनी असे विधेयक मांडले कि ग्रामजोशांना संस्कार करायला बोलावले नसेल, तर त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क राहणार नाही?
१] बॅरिस्टर जयकर २] राव बहाद्दूर सी के बोले ३] भास्करराव जाधव ४] दामोदर सखाराम यंदे

८] खाली नमूद केलेली चीड आणणारी कृत्ये कोणी केले होते?
अ] भारतीय नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी करणे.
ब] वृत्तपत्र स्वातंत्र्यवार नियंत्रण घालणे
क] १८७८ चा शत्र कायदा
ड] ब्रिटिश उत्पादनावरील आयात कर काढून टाकने.
१] लॉर्ड लिटन २] जेम्स विल्सन ३] सर लॉरेन्स ४] लॉर्ड मेकॉले

९] पुढीलपैकी कोणते दोन वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते?
अ] रानडेंच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू
ब] राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी
क] बौद्ध
ड] जैन
१] फक्त अ आणि ब २] फक्त अ आणि ड ३] फक्त ब आणि क ४] फक्त अ आणि क

१०] रावसाहेब पेशवे, भाऊसाहेब लिमये, गणेश केशव लिमये, भाऊराव लिमये, भाऊसाहेब काशिनाथ खाजगीवाले, राजेसाहेब, विठ्ठल छत्रे, आणि बळवंत जगदंब हि नावे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने घेतली?
१] पुण्याचे सदाशिव नीलकंठ जोशी २] अहमदनगरचे जयसिंग रामचंद्र पवार ३] नाशिकचे दामोदर भिडे ४] पुण्याचे केशवराव वकील

११] पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?
१] आर्य महिला समाज २] भारत महिला समाज ३] द मुस्लिम वुमेन्स असोसिएशन ४] भारत स्त्री महामंडळ

१२] क्रिप्स यांचे भारतीय मित्र - - - -  - - हे देखील त्यांच्यावर इतके नाराज झाले कि त्यांनी कबुल केले, हि एक खेदाची गोष्ट आहे की क्रिप्स सारखी व्यक्तीही स्वतःला सैतानाचा वकील बनू देते.
१] जवाहरलाल नेहरू २] सुभाष चंद्र बोस ३] महात्मा गांधी ४] जिन्हा

१३] पुढील कोणते विधान अयोग्य आहे?
अ] २०१४ च्या भारताच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी सर्वात उत्तुंग म्हणजे जवळपास ६६% होती.
ब] या पूर्वीचा सर्वात मोठा आकडा १९८४ मधील होता, तो होता सुमारे ५४%.

१४] - - - - -  - - - स्फूर्ती घेऊन १८९३ टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले?
१] मुसलमानांच्या ईद सणावरून २] मुसलमानांच्या मोहरम सणावरून ३] बंगालच्या दुर्गापूजावरून ४] योम किप्पूर सणावरून

१५] वालचंद उद्योगसमूहाने स्वतंत्रपूर्व काळात पुढीलपैकी कोणत्या उद्योगाची स्थापना केली?
१] हिंदुस्थान एअरक्राफ्ट २] सिंधिया स्टीम नेव्हिगेशन ३] प्रीमिअर अटोमोबाईल ४] हिंदुस्थान मोटर्स

१६] आपले क्रिकेट दैवत सचिन तेंडुलकर नेहमी १० क्रमांकाच्या जर्सीत असतात? तसेच पुढीलपैकी कोण १० क्रमांकाच्या जर्सीत नसते/नव्हते?
१] मेस्सी २] पेले ३] नेमार ४] मॅराडोना ५] बगीयो ६] काका ७] रोनाल्डो ८] रुनी
१] पेले व रोनाल्डो २] नेमार व रुनी ३] बगीयो व काका ४] सगळे १० क्रमांकाच्या जर्सीत असत.

१७] पृथ्वीच्या अंतर्गत भागात जस जसे खोल जावे तस तसे सरासरी तापमानात वाढ कशी होते?
१] १ से दर मिनिटाला २] १ से दर ६४ मिनिटाला २] १ से दर ४० मिनिटाला ४] १ से दर ८० मिनिटाला

१८] मंगळासंबंधी खालील विधानांचा विचार करा?
१] विरळ वातावरण २] शुष्क नदी पात्र ३] - ३० से व - १०० सें तापमान ४] फोबोस हा एकमेव उपग्रह
१] १ आणि ४ २] २आणि ३ ३] ३ आणि ४ ४] १ आणि २

१९] समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते?
१] मिसिसिपी २] अमेझॉन ३] कोलोरॅडो ४] बियास

२०] खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही?
१] उष्णोदकाचे फवारे २] बेथोलीथ ३] डाईक ४] घड्या

२१] मध्यवर्ती खिलापत समितीच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले त्यांना - - - --  - यांचा पाठिंबा होता?
१] टिळक २] गांधीजी ३] अली बंधू ४] मोतीलाल नेहरू

२२] सुवर्ण क्रांतीचा संबंध  - - - - -  - - आहे.
१] अन्न उत्पादन २] दुग्ध उत्पादन ३] मधूमक्षिका पालन ४] फुलोत्पादन

२३] ६ एप्रिल १९३० रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरवात केली, त्याच वेळी ६ एप्रिल १९३० ला महाराष्ट्रात - - - - - - या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला?
१] वडाळा २] वाडी बंदर ३] विले पार्ले ४] अंधेरी

२४] मुगा रेशीमच्या उत्पादनात मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन - - - - - -  - या राज्यात होते.
१] आसाम बिहार २] बिहार व उत्तरप्रदेश ३] कर्नाटक व तामिळनाडू ४] काश्मीर व हिमाचल प्रदेश

२५] योगा आपण जे सहन करू शकत नाही ते बरे करायला व जे बरे होऊ शकत नाही ते सहन करायला मदत करतो' एक योगगुरू म्हणाले ज्यांचे पुढील सर्व शिष्य होते येहुदी मेनुहिन, आर के लक्ष्मण, नासिरुद्दीन शहा, सचिन तेंडुलकर त्या योगगुरू चे नाव सांगा?
१] बी के अयंगार २] बाबा रामदेव ३] सत्यनंदा सरस्वती ४] बाबा रामदेव

२६] भारतातील कोणते खालील राज्य प्रथम कार्बनमुक्त झाले आहे?
१] अरुणाचल प्रदेश २] छत्तीसगढ ३] हिमाचल प्रदेश ४] गुजरात

२७] न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क येथे जागतिक नागरिक उत्सवाच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींच्या अविस्मरणीय भाषणातील अखेरच्या कोणत्या शब्दांनी अमेरिकनांची मने जिंकली?
१] मे द फोर्स बी विथ यु २] नमस्ते ३] थँक्यू वन्स अगेन फॉर हॅविंग मी ओव्हर ४] गॉड ब्लेस यु ऑल

२८] खालील पैकी कोणते पठार कललेले पठार नाही?
१] दक्खनचे पठार २] अरेबियाचे पठार ३] ब्राझीलचे पठार ४] तिबेटचे पठार

२९] खालीलपैकी कोणत्या प्रदेशात हजारो भाषांची भूमी म्हणतात?
१] दक्षिण अमेरिका २] आफ्रिका ३] आशिया ४] युरोप

३०] मिनी कार साठाव्या दशकातील नमुनेदार आकृती होती, त्यापासून प्रोत्साहित होऊन कोणी त्याच दशकात रस्त्यावर क्रांती घडविणारा मिनीस्कर्ट निर्माण केला?
१] कोको चॅनेल २] येस सेंट लॉरेन्ट ३] मेरी क्वांट ४] पियरे कार्डीन

३१] - - - - - - - प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे?
१] वनस्पती २] किटके ३] मनुष्य ४] प्राणी

३२] पुढील दोनपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१] घटना समिती नंतर विधान समिती बनली जिचे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत झाले.
२] ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती जो एक शकुन मानला गेला.
१] केवळ १ २] केवळ २ ३] दोन्ही १ आणि २ ४] दोन्ही नाहीत

३३] खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो?
१] नायट्रोजन २] सल्फर डायॉकसाईड ३] कार्बन डायॉकसाईड ४] वरील सर्व

३४] जोड्या लावा.
१] पर्यावरण संरक्षण ऍक्ट                         १] १९९१
२] पर्यावरण स्नेही खुपट्टी योजना               २] २०००
३] जैव औषधी कचऱ्याचे संबंधी कायदे        ३] १९८६
४] नगरपालिका घनकचरा नियोजन कायदे   ४] १९९८
१] ४,२,३,१ २] ३,४,१,२ ३] ३,१,२४ ४] ३,१,४,२

३५] कोणते विधान चुकीचे आहे?
१] सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची भारतीय नागरी सेवेसाठी निवड झाली होती, परंतु राजकीय संघटना स्थापन करून करण्यासाठी ती त्यांनी स्वतःहून सोडून दिली.
२] सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी डिसेंबर १८८५ मध्ये अखिल भारतीय सभा येथे बोलविली.
१] केवळ १ २] केवळ ३] दोन्ही १ व २ ४] दोन्ही नाहीत

उत्तरे - १] १, २] ४, ३] ३, ४] १, ५] २, ६] ३, ७] २, ८] १, ९] १, १०] १, ११] ४, १२] १, १३] २, १४] २, १५] २, १६] १, १७] १, १८] ४, १९] ३, २०] ४, २१] २, २२] ३, २३] ३, २४] १, २५] १, २६] ३, २७] ३, २८] ४, २९] २, ३०] ३, ३१] २, ३२] ४, ३३] १, ३४] ४, ३५] ३.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.