गुरुवार, ७ जुलै, २०१६

शिवाजी महाराज : राज्याभिषेक व राज्यव्यवस्था

शिवाजी महाराज : राज्याभिषेक 

* विजापूर, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज अशा सर्व शत्रूच्या विरोधात शिवाजीराजांनी स्वराज्याची स्वतंत्र हिंदू मराठा उर्फ हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

* स्वराज्याला धर्माचा, कायद्याचा, आधार देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजानी रायगड किल्यावर स्वतःला ६जून   १६७४ साली राज्यभिषेक करवून घेतला.

* सुवर्णतुला - राज्यभिषेकावेळी ४ जून १६७४ रोजी १७,००० होन एवढे सुवर्णतुला करण्यात आली.

* पौरोहित्य - राज्यभिषेकासाठी काशीहून विद्वान ब्राहमण गागाभट्ट व सोबत बाळंभट्ट हे होते.

* राज्यभिषेकावेळी उपस्थित महत्वाच्या व्यक्ती - राजमाता जिजाऊ, महाराणी सोयराबाई, युवराज संभाजी, अष्टप्रधान, बाळाजी अप्पाजी चिटणीस, चिमणाबाई आवजी, इंग्रज वकील ऑक्झिडन.

* नवी कालगणना - नव्या स्वतंत्र राज्याची खून म्हणून राज्याभिषेक शक नावाची नवी कालगणना राजांनी सुरू केली.

* छत्रपती शिवाजी महाराजांची बिरुदे - क्षत्रिय कुलवंतस, सिहांसनाधिश्वर, महाराज, छत्रपती.

* स्वराज्याचा ध्वज - भगवा ध्वज.

* राजमुद्रेवरील लेख - शहाजीराजांनी दिलेली राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजानी कायम ठेवली. त्याचा अर्थ प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी व विश्वाला वंद्य असणारी ही शहाजीपुत्र शिवाजी मुद्रा कल्याणासाठी शोभून दिसते.

कर्नाटकची मोहीम 

* छत्रपती शिवाजी महाराजांनी भागानगर भेट - मोघलांनी शत्रुस्थानी असलेल्या गोवळकोंडा राज्याशी युती करण्याच्या राजकारणाचा भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७६ ला कुतुबशहा याची भेट घेतली.

* दोघांनी मिळून मोघलांचा व दक्षिणेतील पठाणांचा बिमोड करण्याचे ठरविले, राजांनी कर्नाटक मोहिमेत बिमोड करण्याचे ठरविले.

* दक्षिणेतील विजय - या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी, वेलोर, तिरुवाडी, वालदूर, चिदंबरम, कावेरीपट्टणम, वृद्धचलम, कोलार, बाळापूर, होस्कोट, शिरे इत्यादी ठाणी जिंकली.

* छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू - छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० या दिवशी रायगड येथे झाला. मृत्यूसमयी महाराजांचे वय अवघे ५० वर्षे होते.

स्वराज्याची रचना 

* स्वराज्याच्या प्रदेशाची विभागणी प्रांतात करण्यात आली.

* स्वराज्यातील प्रांत - मावळ, वाई, पन्हाळा, दक्षिण कोकण, ठाणे, त्रिंबक, बागलाण, वनगड, धारवाडचा काही भाग, बिदनूर, कोल्हार, श्रीरंगपट्टणम, कर्नाटक, वेलोर व तंजवूर.

* प्रांताच्या मुख्य अधिकाऱ्याला सुभेदार म्हणत, प्रांताची विभागणी महाल किंवा तरफ यात होई, दोन महिलांचा प्रांत होई.

* प्रांतातील अधिकारी - मुजुमदार, चिटणीस, दप्तरदार, फडणवीस, सबनीस, पोतनीस.

* खेड्यातील अधिकारी - पाटील, कुलकर्णी.

शिवाजींचे अष्टप्रधान मंडळ 

* मुख्य प्रधान उर्फ पेशवा - मोरोपंत पिंगळे

* अमात्य उर्फ मुजुमदार - अर्थमंत्री - रामचंद्र नीलकंठ.

* मंत्री उर्फ वाकनीस - राजकीय बाबी व हेर खाते - दत्ताजी त्रिंबक.

* सचिव  उर्फ सुरनीस - राजाचा पत्रव्यवहार - अण्णाजी दत्तो.

* सुमंत उर्फ डबीर - परराष्ट्रव्यवहार खाते - रामचंद्र त्रिंबक.

* पंडितराव उर्फ राजपुरोहित - धार्मिक बाबी, दानधर्म - रघुनाथ पंडितराव.

* सेनापती उर्फ सरनोबत - हंबीरराव मोहिते.

* न्यायाधीश - निराजी रावजी.

शिवाजी महाराजांची सैन्यव्यवस्था 

* घोडदळ - २५ घोडेस्वारांना अधिकारी म्हणजे हविलदार, अशा पाच हविलदाराचा अधिकारी म्हणजे जुमलेदार.

* १० जुमल्यांचा अधिकारी म्हणजे हजारी होय. पाच हजाराच्या वरचा अधिकारी म्हणजे पंचहजारी होय. घोडदळाचा सेनापती म्हणजे सरनोबत. या सरनोबतला अष्टप्रधानात स्थान होते.

* पायदळ - दहा सैनिकांचा हा अधिकारी हा नाईक होता, पाच नाईकवर एक जुमलेदार होता. एक हजार सैनिकावरील अधिकारी हजारी होत असे. एकूण पायदळ १,००,०००.

* नाविक दल - मध्ययुगात नौदलाची निर्मिती करणारा एकमेव राज्यकर्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत. नौदलप्रमुखांना दर्यासारंग म्हणत. मायनायक भांडारी व दौलतखान हे शिवकालीन दर्यासारंग होते.

किल्ल्यातील अधिकारी 

* हवालदार - गडाच्या संरक्षणव्यवस्थेचा प्रमुख अधिकारी रूढ भाषेत याला किल्लेदार म्हणत.

* सबनीस - गडावरील सर्व आर्थिक व्यवहारांचा मुख्य अधिकारी.

* कारखानीस - गडावरील वास्तुनिर्मिती, कामगार, धान्यकोठी, बांधकाम, दुरुस्ती, इत्यादी बाबीचा मुख्य अधिकारी.

शिवाजी महाराजाच्या ताब्यातील प्रदेश 

* महाराष्ट्रातील - सामांन्यता हल्लीच्या ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, व कोल्हापूर, या जिल्ह्याचा बराचसा भाग.

* महाराष्ट्रबाहेर - वेलोर, जिंजी, कोलार, बाळापूर, होस्कोट, ठाणी, तसेच काही तंजवरचा भाग. शिवाजीच्या महाराजांच्या ताब्यात होता.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.