गुरुवार, ७ जुलै, २०१६

शिवाजी महाराजांनंतरची मराठा सत्ता

शिवाजी महाराजांनंतरची मराठा सत्ता 

छत्रपती संभाजी 

* छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर युवराज संभाजी ऐवजी महाराणी सोयराबाई यांचा पुत्र राजाराम महाराज यांना राज्यभिषेक करण्यात आला.

* युवराज संभाजीच्या वर्तनावर नाराज असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी युवराजांना सज्जनगडवर समर्थ रामदासपाशी ठेवले होते.

* संभाजीबरोबर त्यांची पत्नी येसूबाई व कन्या भवानीबाई याही होत्या. पण संभाजीराजे सज्जनगडाहून मोगल सरदार दिलेरखानाच्या आश्रयाला गेले.

* परंतु दिलेरखानाने हिंदूंवरील अत्याचार पाहून संभाजीराजांना भान आले. व ते आपल्या कुटुंबासह तेथून पन्हाळा किल्यावर आले.

* जेव्हा महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा संभाजीराजे पन्हाळ्यास होते. परंतु छत्रपतींच्या मृत्यूनंतर राजारामांना राजभिषेक करण्यात आलेला पाहून संभाजीराजे पन्हाळ्याहून रायगडावर आले.

* औरंगजेबाने छत्रपती संभाजीचा अत्यंत्य क्रूरपणे तुळापूर येथे ठार केले.

छत्रपती राजाराम  

* छत्रपती संभाजीचा पुत्र शाहू अल्पवयीन असल्याने राजारामांचा रायगड येथे राज्यभिषेक केला.

* मोगल सैन्याचा रायगडाला वेढा व छत्रपती राजारामांचे रायगड सोडून दक्षिणेस जिंजी येथे प्रयाण.

* जिंजी ही मराठ्यांची नवी राजधानी.

* मराठ्यांच्या या स्वातंत्र्याच्या गाजलेले मराठा वीर संताजी घोरपडे व धनाजी जाधव, छत्रपती राजारामांचा मृत्यू सिंहगड येथे झाला.

महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू महाराज 

* मराठ्यांचे स्वतंत्रयुद्ध - छत्रपती मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई आपला अल्पवयीन पुत्र दुसरा शिवराय यास राज्यावर बसविले.

* ताराबाई व शाहू संघर्ष - औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांत फूट पडण्याच्या अपेक्षेने मोघलांनी छत्रपती संभाजींचा पुत्र शाहू सुटका केली.

* दोन राज्ये - शाहूविरुद्ध ताराबाई या संघर्षांतून मराठ्यांची दोन राज्ये अस्तित्वात आली. छत्रपती राजारामांचे वारस कोल्हापूर येथून राज्य करू लागले. तर छत्रपती संभाजीचे वारस सातारा येथून राज्य करू लागले.

* छत्रपती शाहू - बाळाजी विश्वनाथ यांची छत्रपती शाहूंनी १७१२ मध्ये प्रथम सेनाकर्ते म्हणून केली. पुढे १७१३ मध्ये त्यांची पेशवे पदावर नियुक्ती करण्यात आली. यानंतर सर्व सत्ता पेशव्यांच्या हातात केंद्रित होत गेली. छत्रपती शाहू १७४९ मध्ये मृत्यू पावले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.