शनिवार, ३० जुलै, २०१६

चालू घडामोडी २५ -३१ जुलै २०१६

चालू घडामोडी २५ -३१ जुलै २०१६  

* देशातील पहिला ग्रीन कॉरिडोर रामेश्वरम ते मनामदुरै यांच्या दरम्यान सुरु करण्यात आला, या रेल्वेमध्ये बायोटॉयलेट, मोफत वायफाय याची सुविधा असणार आहे.

* भारताचा ऍथलिटिक नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात ८६ मीटर भाला फेकून जागतिक २० वर्षाखालील ऍथलेटिक स्पर्धेत ज्युनियर गटात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.

* उद्योजक गुंजन जैन यांच्या '' शी वॉक, शी लीड्स '' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकात महिलांच्या नोकरी क्षेत्रामध्ये महिलांनी केलेल्या कामगिरीचे लेखन करण्यात आले आहे.

* शरद पवार यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक जाहीर करण्यात आला.

* अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी हिलरी क्लिंटन यांना डेमोग्राफिक पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आले.

* संपूर्ण सौरशक्तीवर आधारित सोलर इम्पल्स २ या विमानाने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करीत अबूधाबी या विमानतळावर यशस्वी लँडिंग केले आहे.

* सरकारने सातव्या आयोगाच्या शिफारशी स्वीकारून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे १ जानेवारी २०१६ पासून किमान वेतन १८,००० हजार व तर उच्च वेतन २,५०००० एवढे होणार आहे.

* महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सतीश माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना ३१ मे २०१८ पर्यंतचा २२ महिन्यांचा कार्यकाळ असेल.

* २०१६ सालचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते बेजवाडा विल्सन आणि दक्षिणेतील शास्त्रीय संगीतकार टी. एम. कृष्णा यांना आशियातील सर्वोच्च सन्मान म्हणून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
स्वच्छता कामगारातील स्वत्व आणि स्वाभिमान जागा व्हावा म्हणून त्यांनी सफाई कर्मचारी यांचे आंदोलन उभारले.
तसेच संगीताच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामासाठी टी एम कृष्णा यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

* सातारा जिल्ह्यातील मोही ता - माण, या छोट्याश्या गावातून माणदेशी एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी ललिता शिवाजी बाबर हिची रिओ येथे होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये निवड करण्यात आली. तसेच सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कविता राऊत हिची सुद्धा निवड करण्यात आली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.