शनिवार, ३० जुलै, २०१६

राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार २०१४-१५ जाहीर

राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार २०१४-१५ जाहीर 

* सर्वोत्कृष्ट पर्यटन विकासाचा २०१४-१५ चा पहिला पुरस्कार मध्यप्रदेश ला मिळाला आहे, तर दुसरा क्रमांक गुजरात, तिसरा क्रमांक कर्नाटकचा आहे.

* महाराष्ट्र राज्याला एकही पुरस्कार नसला तरीही मुंबईच्या सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पर्यटनाचा पुरस्कार मिळाला आहे.

* राजस्थानमधील सवाई माधोपूर स्थानकाची सर्वोत्कृष्ट पर्यटनस्नेही रेल्वे स्थानक म्हणून निवड करण्यात आली, तर तेलंगणामधील वारंगळ या शहराची उत्कृष्ट हेरिटेज शहर म्हणून निवड झाली आहे. मध्यप्रदेशमधील अमरकंटक या धार्मिक शहरातील ऐतिहासिक वस्तूंचे उत्कृष्ट जतन केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.

* यंदा हॉटेलांना पुरस्कार ताज एक्झॉटीका [गोवा], फतेह प्रकाश पॅलेस उदयपूर, कोकोनट कागून कोट्टायम, आणि गजानन पॅलेस बिकानेर, यांचा समावेश आहे.

* जगभरातील पर्यटनासाठी जितके पर्यटक जातात त्यापैकी १ टक्का ही पर्यटक भारतात येत नाहीत. त्यामुळे २०२० पर्यंत भारतात १% पर्यटक यावेत तर २०२५ पर्यंत २% पर्यटक यावेत यासाठी सरकार प्रयत्न करीत आहेत.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.