मंगळवार, ५ जुलै, २०१६

सिंधू संस्कृती

सिंधू संस्कृती 

* प्राचीन सिंधू संस्कृतीचे अवशेष प्रथम जेथे आढळले ती स्थाने - हरप्पा पश्चिम पंजाब पाकिस्तान, मोहोंजोदारो सिंध पाकिस्तान, छन्नुदारो.

* सिंधू संस्कृतीची भौगोलिक व्याप्ती - उत्तरेला जम्मू ते दक्षिणेला नर्मदा नदीच्या मुखापर्यंत व पश्चिमेला मकरान बलुचिस्तानचा किनारी प्रदेश, ते पूर्वेला मेरठ उत्तरप्रदेश पर्यंतचा विस्तृत प्रदेश.

* भारतात सिंधू संस्कृतीचे अवशेषस जेथे सापडले अशी महत्वाची स्थळे - लोथल सुरकोटडा लंघजण धोळीवीरा कुरण - गुजरात, रोपार - पंजाब, बाणवली कुणाल भिरदाना दक्षखेडा राखिगढी - हरियाणा. कालीबंगन - राजस्थान.

* सिंधू संस्कृतीचा शोध लावणारे आद्य संशोधक - दयाराम सहानी, हरप्पा, राखालदास बॅनर्जी, मोहोंजोदारो.

* सिंधू संस्कृतीच्या अभ्यासकांची अन्य काही नावे - भारतीय अभ्यासक : फादर हेरास, एस एस राव. पाशात्य अभ्यासक : जॉन मार्शल, मॉर्टिमर व्हीलर, अस्को पारपोला.

* सिंधू संस्कृतिकालीन धार्मिक जीवन - निसर्गपूजा हत्ती, वाघ, घोडा, साप, पिंपळ, वृक्ष यांची पूजा, आदिमातेची पूजा, शिवपूजा, पारलौकिक जीवनावर विश्वास, मृतावरील संस्कार, दफन, दहन.

* भारतातील सर्वात प्राचीन लिपी सिंधू लिपी आहे.

* सिंधू लिपीचे संशोधन वाचन करणारे काही विद्वान - फादर हेरास, एस आर राव, एल इ वडेल, जॉन मार्शल, अस्को पारपोला.

* सिंधू संस्कृतीचे वासुशिल्पे - निवासी घरे, किल्ला, महास्नानगृह, धान्यकोठारे.

* सिंधू संस्कृतिकालीन कला - रंगवलेली मातीची भांडी, खार माकडांसारख्या भांड्यावर कोरलेली चित्रे, शिक्क्यावर कोरलेली गवा, रेडा, वशिंड असणारा बैल यांची चित्रे, ब्राँझमधील नर्तकाची प्रतिमा, पुतळे उच्च कौश्यल्याचे सोन्याचे दागिने.

* सिंधू संस्कृतिकालीन लोकांची वांशिक जडणघडण : ऑस्ट्रेलॉइड, मंगोलॉइड, अल्पाइन, मेडिटरेनियन वंश.

* सिंधू संस्कृतीचा वारसा - हिंदू धर्मात आजही टिकून राहिलेल्या बाबी : निसर्गपूजा, प्राणिपूजा, वृक्षपूजा, शिवपूजा, स्वस्तिक हे सूर्याचे प्रतीक.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.