सोमवार, ४ जुलै, २०१६

चालू घडामोडी २९जून ते ५ जुलै - २०१६

चालू घडामोडी २९जून ते ५ जुलै - २०१६

* मॉडेल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट विधेयक २०१६ या कायद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. या कायद्यामुळे आता दुकाने, मॉल्स, चित्रपट गृहे आता बाराही महिने बारा तास सुरू राहू शकतात.

* औद्योगिकदृष्टया प्रगत देशात महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर आहे तर तामिळनाडू दुसऱ्या, उत्तर प्रदेश हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. असे रिझर्व्ह बँकेच्या एक अहवालात सादर करण्यात आले.

* विश्वनाथ आनंद याला आयआयटी कानपूरने दीक्षांत समारोहात डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देण्यात आली.

* इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, या कंपन्यांच्या साहाय्याने देशातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे. यासाठी कोकणात एक दोन ठिकाणी जागेचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती IOC चे संजीव सिंग यांनी सांगितले.

* खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक देशात ४०० बँक शाखा उघडणार आहे.

* जगातील सर्वात मोठी दुर्बीण चीनने तयार केली असून फाईव्ह हंड्रेड मीटर अर्पेचार असे या दुर्बिणीचे नाव आहे.

* महाराष्ट्र राज्यात एकाच दिवशी २ कोटी झाडे लावण्यात आले यासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड याची नोंद करण्यात आल.

* भारतीय दूरसंचार नियामक मंडळ यांनी माय नेटवर्क नावाचे ऍप लॉन्च केले असून या ऍपच्या साहाय्याने सर्व ग्राहकांना डाउनलोड स्पीड, मोबाईल नेटवर्क ची सर्व माहितीआपल्या मोबाईलवर दिसणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.