गुरुवार, ७ जुलै, २०१६

दृष्टिकोन

यशस्वी होण्याची इच्छाशक्ती असलेल्या मित्र-मैत्रिणीं साठी वेळेचे नियोजन एक महत्वाची बाब आहे. स्वामी विवेकानंदांच्या मते जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी कार्यात व्यस्त आहे, याचच अर्थ तो कार्यात व्यस्त नसून अस्ताव्यस्त आहे.

मित्र-मैत्रिणींनो, 'Busy man always find time' या इंग्रजी म्हणीनुसार जो वेळेचे नियोजन करतो तो त्याच्याकडे वेळचं वेळ असतो.
वेळ सर्वांना मोफत उपलब्ध असून आपल्या गरजा व ध्येयानुसार खर्च करण्याचे स्वातंत्र सर्वांनाच आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षासाठी वयोमर्यादा किमान २१ वर्ष असून कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८, मागास प्रवर्गासाठी ४३ आणि अपंग प्रवर्गासाठी ४५ आहे.

स्पर्धा परिक्षयेत आपली स्पर्धा इतर उमेदवारांशी नसून स्वतःशीच असते. त्यामुळे वयोमर्यादा, पदांची संख्या, या तत्सम घटक फारसे महत्वाचे नसतात.
ज्या परीक्षेची आपण तयारी करत आहोत त्या परीक्षेत एकाच प्रयत्नात यशस्वी असे ध्येय निश्चित करून वेळेचे नियोजन केल्यास सहज यशप्राप्ती होऊ शकते.

वेळेचे नियोजन करताना अचूकता या नेकमेपणा यांचे महत्व वादातीत आहे. आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित असल्याने नेमकेपणा ठेवून वेळेची बचत करणे सहज शक्य आहे.

आयोगाने अभ्यासक्रम निश्चित केला असला तरी उमेदवाराला त्याच्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करण्याची क्षमता देखील परीक्षेतून तपासली जाते. त्यासाठी वेळेच्या नियोजनात अचूकता असणे आवश्यक आहे. एखादी घटना/विषय याचे अध्ययन करताना त्यामध्ये अंतर्भूत असणारे संभाव्य प्रश्न-उपप्रश्न यांचे अचूक अध्ययन केल्यास पुन्हा-पुन्हा त्या विषयाकडे लक्ष्य देण्याची गरज भासत नाही.

थोडक्यात वेळेचे नियोजन व अंबलबजावणी जितकी प्रभावी असेल तितके यशाच्या दिशेने मार्गक्रमण गतिमान होईल यात शंका नाही.
    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.